जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Free Aadhaar Update: फ्री आधार कार्ड अपडेट करण्याची तारीख वाढली! पाहा कधीपर्यंत मिळणार सुविधा

Free Aadhaar Update: फ्री आधार कार्ड अपडेट करण्याची तारीख वाढली! पाहा कधीपर्यंत मिळणार सुविधा

आधार कार्ड फ्री अपडेट

आधार कार्ड फ्री अपडेट

Aadhaar Card Update : आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची डेडलाइन गुरुवारी संपणार होती. मात्र आता ही तारीख पुन्हा वाढवण्यात आली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

Aadhaar Card Latest News: केंद्र सरकारने आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची सुविधा पुन्हा एकदा वाढवली आहे. UIDAI द्वारे जारी केले जाणारे हे डॉक्यूमेंट अपडेट करण्याची अंतिम मुदत 14 जून 2023 पर्यंत होती, जी वाढवण्यात आली आहे. आता तुमच्याकडे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तीन महिने आहेत. जे तुम्ही ऑनलाइन अपडेट करू शकता. UIDAI ने माहिती दिली आहे की तुम्ही 14 सप्टेंबरपर्यंत ओळखपत्र आणि अॅड्रेस प्रूफ अपलोड करू शकता. UIDAI वेबसाइटनुसार आधार कार्डची माहिती अचूक ठेवण्यासाठी तुमचे डेमोग्राफिक डॉक्यूमेंट अपलोड करा आणि तुमचे आधार कार्ड अपडेट करा. तुमचे आधार कार्ड फ्रीमध्ये अपडेट करण्यासाठी तुम्ही https://myaadhaar.uidai.gov.in ला भेट देऊ शकता. यासोबतच सीएससी केंद्रावर जाऊन अपडेट करण्यासाठी 25 रुपये चार्ज भरावे लागेल. या गोष्टी आहेत आवश्यक UIDAI ने जारी केलेल्या या पोर्टलवर आधार कार्डमध्ये पत्ता, नाव इत्यादी माहिती अपडेट केली जाऊ शकते. यासाठी यूझर्सला आधार नंबर आणि मोबाइल नंबर आवश्यक आहे. मोबाईल नंबरवर OTP द्वारे तुम्ही पत्ता आणि इतर गोष्टी बदलू शकता. आधारकार्ड हरवलं अन् नंबरही लक्षात नाही? डोंट वरी, घरबसल्या असं मिळवा आधार कार्ड कसं अपडेट करायचं? सर्वप्रथम आधारची वेबसाइट myaadhaar.uidai.gov.in वर जा. आता लॉग इन करा आणि नाव, जेंडर, जन्मतरीख आणि अॅड्रेसचा पर्याय निवडा. आधार अपडेटचा ऑप्शन निवडा. आता पत्ता किंवा इतर माहिती अपडेट करण्यासाठी ऑप्शनवर क्लिक करा. यानंतर स्कॅन कॉपी अपलोड करा आणि डेमोग्राफिक डेटा माहिती अपलोड करा. आता पेमेंट करा, त्यानंतर तुम्हाला एक नंबर मिळेल. हा नंबर सांभाळून ठेवा. स्टेटस चेक करण्यासाठी फायदेशीर ठरेल. Aadhaar नंबरवरुन तुमचं बँक अकाउंट हॅक होऊ शकतं का? पाहा काय आहे सत्य आधार अपडेट कसे ट्रॅक करावे जेव्हा तुम्ही आधार कार्डमध्ये पत्ता बदलण्याची रिक्वेस्ट सबमिट करता तेव्हा तुम्हाला एक URN नंबर दिला जातो. तो तुमच्या स्क्रीनवर दिसेल आणि तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर एसएमएसद्वारे पाठवला जाईल. आता तुम्ही https://ssup.uidai.gov.in/checkSSUPStatus/checkupdatestatus वर जाऊन तुमच्या आधार कार्ड अपडेट स्टेटसला ट्रॅक करु शकता. डेमोग्राफिक डेटा कधी बदलावा लागतो? एखाद्या महिलेचं लग्न झाल्यावर आडनाव बदलले जाते. दुसरीकडे, जन्मतारीख, नाव आणि पत्त्यामध्ये बदल असला तरी तुम्ही तुमचे आधार कार्ड अपडेट करू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात