Home /News /money /

Aadhaar Card फ्रॉडमुळे रिकामं होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट, आधार लॉक करु धोका टाळा

Aadhaar Card फ्रॉडमुळे रिकामं होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट, आधार लॉक करु धोका टाळा

बँकिंग आणि आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी, UIDAI आधार कार्डधारकांना ऑनलाइन आधार लॉकिंग आणि अनलॉक करण्याची सुविधा देत आहे. डेटा सुरक्षा आणि गोपनीयता मजबूत करण्यासाठी आधार कार्ड धारक UIDAI द्वारे आधार क्रमांक लॉक आणि अनलॉक करू शकतात.

    मुंबई, 10 मार्च : आधार कार्डची (Aadhaar Card ) गरज वाढत आहे, तसतशी त्यासंबंधीची फसवणूकही (Online Fraud) वाढत आहे. आता सरकारी योजना, बँका, अनुदाने सर्वत्र आधारकार्ड असणे गरजेचे आहे. यासोबतच त्यासंबंधीची फसवणूकही वाढत आहे. जर तुमचे आधार कार्ड हरवले किंवा तुमचा डेटा चोरीला गेला तर त्याचा गैरवापर होण्याचा धोका वाढतो. तुमच्या बँक खात्यातून सर्व पैसे कधीही गायब केले जाऊ शकतात. बँकिंग आणि आर्थिक फसवणूक (Banking and Financial Fraud) टाळण्यासाठी, UIDAI आधार कार्डधारकांना ऑनलाइन आधार लॉकिंग आणि अनलॉक करण्याची सुविधा देत आहे. डेटा सुरक्षा आणि गोपनीयता मजबूत करण्यासाठी आधार कार्ड धारक UIDAI द्वारे आधार क्रमांक लॉक आणि अनलॉक करू शकतात. एकदा ही सुविधा वापरल्यानंतर फसवणूक करणारे तुमची आधार कार्डद्वारे फसवणूक करु शकणार नाहीत. Gold Price:सततच्या वाढीनंतर आज सोने-चांदी दरात मोठी घसरण, तपासा 22 कॅरेटचा आजचा भाव आधारकार्ड लॉक कसे करावे? एखाद्याचे आधार कार्ड लॉक करण्यासाठी, कार्डधारकांना 16 अंकी व्हर्च्युअल आयडी आवश्यक आहे. आधार कार्ड लॉक करण्यासाठी हे आवश्यक आहे. तुमच्याकडे 16-अंकी व्हर्च्युअल आयडी नसल्यास, तुम्ही 1947 वर एसएमएस पाठवून ते मिळवू शकता. सरकारी कर्मचाऱ्यांना पंतप्रधान मोदी देणार होळीची भेट! DA मध्ये वाढीची शक्यता एसएमएसद्वारे लॉक करा सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून 1947 वर GETOTP टाइप करून एसएमएस पाठवावा लागेल. यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. हा OTP पुन्हा LOCKUID आधार क्रमांक टाइप करून 1947 क्रमांकावर पाठवावा लागेल. यानंतर तुमचा आधार क्रमांक लॉक होईल आणि हरवल्यास त्याचा कोणत्याही प्रकारे गैरवापर होणार नाही. अनलॉक कसे करावे जर तुम्हाला आधार क्रमांक अनलॉक करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून एसएमएस पाठवावा लागेल. यासाठी तुम्हाला व्हर्च्युअल आयडी लागेल. तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून GETOTP स्पेस आणि व्हर्च्युअल आयडीचे शेवटचे 6 अंक लिहून 1947 वर एसएमएस करा. आता OTP आल्यानंतर पुन्हा 1947 ला UNLOCKUID व्हर्च्युअल आयडी आणि OTP चे शेवटचे 6 अंक मेसेज करावे लागतील. यानंतर तुमचे आधार कार्ड अनलॉक होईल.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Aadhar card, Digital services, Online crime

    पुढील बातम्या