मराठी बातम्या /बातम्या /मनी /प्रत्येक महिन्याला फक्त 1000 रुपये करा जमा; मिळतील तब्बल 12 लाख रुपये; आजच करा गुंतवणूक

प्रत्येक महिन्याला फक्त 1000 रुपये करा जमा; मिळतील तब्बल 12 लाख रुपये; आजच करा गुंतवणूक

PPF या नावाने ही गुंतवणूक ओळखली जाते.

PPF या नावाने ही गुंतवणूक ओळखली जाते.

PPF या नावाने ही गुंतवणूक ओळखली जाते.

    अजिबात धोका नसलेला गुंतवणकीचा उत्तम पर्याय तुम्ही शोधताय का? मग असा एकमेव पर्याय म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (Public Provident Fund) अर्थात सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी. PPF या नावाने ही गुंतवणूक ओळखली जाते.

    PPFमध्ये गुंतवणूक करण्यात अजिबात कोणतीही जोखीम (Risk Free) नाही. कारण PPF ला सरकारकडून सर्व प्रकारे संरक्षण मिळालेलं आहे. यात गुंतवणूक केल्यामुळे तुम्हाला चांगला फायदा मिळू शकतो. फक्त यासाठी दीर्घकालीन गुंतवणूक (Long Term Investment) आवश्यक आहे.

    PPFमध्ये दर महिन्याला अवघे 1000 रुपये जमा करूनही तुम्ही काही वर्षांनंतर 12 लाख रुपये मिळवू शकता. 1968 साली राष्ट्रीय बचत संस्थेने एका छोट्या बचतीच्या रूपात PPF ची सुरुवात केली होती.

    PPF खात्यावर मिळणाऱ्या व्याजाचा दर प्रत्येक तिमाहीला सरकारकडून आर्थिक स्थितीचा आढावा घेऊन त्यानुसार ठरवला जातो; पण तरीही सर्वसामान्यपणे हा व्याजदर सुमारे सात ते आठ टक्क्यांच्या आसपास असतो. सध्या हा व्याजदर 7.1 टक्के आहे. चक्रवाढ (Compounding Interest) दराने व्याज मिळत असल्याने ही योजना लाभदायक ठरते. तसंच, हा व्याजदर बहुतांश बँकांच्या फिक्स्ड डिपॉझिटच्या व्याजदरापेक्षा जास्त आहे.

    PPFमध्ये दर वर्षी कमीत कमी 500 रुपये भरावे लागतात आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपये भरता येतात. या खात्याचा मॅच्युरिटी पीरियड 15 वर्षांचा असतो. त्यानंतर जमा झालेले पैसे एक तर काढून घेता येतात किंवा पुढे दर पाच वर्षांसाठी योजनेचा कालावधी वाढवता येतो.

    हे वाचा - आता मालमत्ता खरेदी अधिक सुरक्षित; फसवणूक टाळण्यासाठी विमा कंपन्या आणणार योजना

    दर महिन्याला 1000 रुपये भरत असाल, तर 15 वर्षांत 1.80 लाख रुपये एवढी गुंतवणूक होईल. त्यावर 1.45 लाख रुपये व्याज (Interest) मिळेल. म्हणजेच मॅच्युरिटीनंतर तुम्हाला एकूण 3.25 लाख रुपये मिळतील. आणखी पाच वर्षांनी कालावधी वाढवलात आणि मासिक 1000 रुपये गुंतवणूक सुरू ठेवलीत, तर एकूण गुंतवणूक 2.40 लाख रुपये होईल. त्या रकमेवर 2.92 लाख रुपये व्याज मिळेल. म्हणजेच मॅच्युरिटीनंतर (एकूण 20 वर्षांनी) एकूण 5.32 लाख रुपये मिळतील.

    15 वर्षांच्या मॅच्युरिटीनंतर तुम्ही तीन वेळा प्रत्येकी पाच वर्षांनी कालावधी वाढवलात (म्हणजे एकूण 30 वर्षं) आणि 1000 रुपयांची मासिक गुंतवणूक सुरू ठेवलीत, तर एकूण गुंतवणूक 3.60 लाख रुपये होईल. त्यावर 8.76 लाख रुपये व्याज मिळेल. म्हणजेच मॅच्युरिटीनंतर एकूण 12.36 लाख रुपये तुम्हाला मिळतील.

    PPFमध्ये गुंतवणूक केली असेल, तर त्या अकाउंटवर कर्जही घेता येतं; मात्र असा लाभ खातं सुरू झाल्यानंतर तिसऱ्या किंवा सहाव्या वर्षी घेता येतो. सहा वर्षं पूर्ण झाल्यानंतर या खात्यातली रक्कम काही प्रमाणात काढताही येते.

    First published:
    top videos

      Tags: Investment, PPF