• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • कोणत्याही कागदपत्रांशिवाय घरबसल्या मोफत मिळवा इन्स्टंट PAN Card, पाहा सोपी पद्धत

कोणत्याही कागदपत्रांशिवाय घरबसल्या मोफत मिळवा इन्स्टंट PAN Card, पाहा सोपी पद्धत

इन्स्टंट पॅन (Instant Pan) किंवा ई-पॅनसाठी (E-Pan) ऑनलाइन अर्ज करू शकतात आणि प्राप्तिकर विभागाच्या अधिकृत वेबसाइटवरून फक्त 10 मिनिटांत ते पॅन कार्ड मिळवू शकतात.

  • Share this:
नवी दिल्ली, 15 सप्टेंबर : आधार कार्डप्रमाणे (Aadhaar Card) पॅन कार्ड हे देखील (Pan Card) अत्यावश्यक सरकारी कागदपत्र आहे. इन्कम टॅक्स विभागाने जारी केलेलं पॅन कार्ड अनेक सरकारी कामांमध्ये, त्याचप्रमाणे बँकेतल्या कामांसाठी, तसंच गुंतवणुकीसंदर्भातल्या (Investment) कामांसाठी आवश्यक असतं. ओळखीचा पुरावा म्हणून देखील पॅन कार्ड काही ठिकाणी चालतं. त्यामुळे प्रत्येकाकडे पॅन कार्ड असणं गरजेचं आहे. जर अजूनही तुमचं पॅन नसेल तर आता तुम्ही अगदी घरबसल्या ऑनलाइन (Online) पद्धतीने अवघ्या दहा मिनिटांत तुमचं पॅन कार्ड बनवून घेऊ शकता. एवढंच नव्हे, तर पॅन कार्डचं व्हेरिफिकेशनदेखील ऑनलाइन करता येतं. प्राप्तिकर विभागाने (Income Tax Department) ही माहिती दिली आहे. ज्यांच्याकडे वैध आधार क्रमांक आणि UIDAI मध्ये नोंदणी केलेला मोबाइल नंबर आहे, ते इन्स्टंट पॅन (Instant Pan) किंवा ई-पॅनसाठी (E-Pan) ऑनलाइन अर्ज करू शकतात आणि प्राप्तिकर विभागाच्या अधिकृत वेबसाइटवरून फक्त 10 मिनिटांत ते पॅन कार्ड मिळवू शकतात. ई-पॅन (e-PAN ) हे डिजिटल स्वाक्षरी केलेलं पॅन कार्ड असतं. आधार कार्डवर आधारित ई-केवायसी (E-KYC) पडताळून ते जारी केले जातं. हे ई-पॅन पीडीएफ (PDF) स्वरूपात जारी केलं जातं. पॅनची ही पद्धत वेळ वाचवणारी असून, यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जात नाही. अर्ज करण्यापूर्वी काही निकषांची पूर्तता करावी लागते. तुम्हाला याआधी पॅनकार्ड मिळालेलं नसणं आवश्यक आहे. तुमचा वापरात असलेला मोबाइल क्रमांक आधारशी जोडलेला असणं आवश्यक आहे. जन्मतारीख व इतर माहिती आधारवर उपलब्ध असली पाहिजे. तुम्ही अल्पवयीन असता कामा नये.

प्रत्येक महिन्याला फक्त 1000 रुपये करा जमा; मिळतील तब्बल 12 लाख रुपये

प्राप्तिकर विभागाच्या https://www.incometax.gov.in/iec/foportal/ या पोर्टलवर जाऊन लॉग-इन करावं. होमपेजवरच्या ‘Verify Your PAN’ या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्हाला पॅनचा तपशील विचारला जाईल. यामध्ये तुम्हाला जन्मतारीख, मोबाईल क्रमांक आणि नाव ही माहिती भरावी लागेल. त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ओटीपी येईल. तो भरल्यानंतर 15-अंकी पावती क्रमांक तयार केला जाईल. ई-पॅन तयार झाल्यांनतर ते तुम्ही आधारशी लिंक केलेल्या तुमच्या ई-मेल आयडीवर पाठवलं जाईल. ई-पॅनचं स्टेटस (E-Pan Status) बघण्यासाठी किंवा डाउनलोड करण्यासाठी वेबसाइटच्या होमपेजवर जावं आणि ई-पॅनशी संबंधित टॅबवर क्लिक करावं. त्यानंतर एका नवीन विंडोवर ‘Check Status/ Download PAN’ चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. नवीन पेजवर तुम्हाला आधार क्रमांक भरण्यास सांगितलं जाईल. याची पडताळणी करण्यासाठी मोबाइल क्रमांकावर ओटीपी येईल, त्याद्वारे तुम्ही तुमच्या पॅनचं स्टेटस सहज तपासू शकाल. तुमचं ई-पॅन तयार झालं आहे की नाही, याची खात्री तुम्ही करून घेऊ शकाल. अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या मोफत आणि कोणत्याही कागदपत्रांशिवायपॅन कार्ड मिळवू शकता. तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल तर तत्काळ ही प्रक्रिया करा आणि आर्थिक व्यवहारांमधल्या अडचणी आणि पॅन कार्ड नसल्यानं भराव्या लागणाऱ्या दंडापासून मुक्तता मिळवता येईल.
First published: