जाहिरात
मराठी बातम्या / मनी / बँक ऑफ बडोदाचे चेकसंबंधी नवीन नियम तपासा, अन्यथा चेक क्लिअर होणार नाही

बँक ऑफ बडोदाचे चेकसंबंधी नवीन नियम तपासा, अन्यथा चेक क्लिअर होणार नाही

बँक ऑफ बडोदाचे चेकसंबंधी नवीन नियम तपासा, अन्यथा चेक क्लिअर होणार नाही

नवीन नियमानुसार बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांना आता कोणत्याही व्यक्तीच्या नावाने चेक देण्यापूर्वी बँकेला त्याबाबतची महत्त्वाची माहिती द्यावी लागेल. याद्वारे बँका कोणत्याही व्हेरिफिकेशन कॉलशिवाय मोठ्या रकमेचे धनादेश सहज पेमेंट करू शकतील.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 6 जुलै : बँकांचे व्यवहार (Bank Transaction) करताना बँकांच्या बदललेल्या नियमांची माहिती असणे आवश्यक आहे. अन्यथा ग्राहकांना मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागू शकतं. तुम्ही बँक ऑफ बडोदाचे (Bank Of Baroda) ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. बँक ऑफ बडोदाने आपल्या चेकच्या नियमात बदल केले आहेत. बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांना आता पाच लाखांपेक्षा जास्त रकमेच्या चेक व्हेरिफाय करावे लागणार आहेत. बँक येत्या 1 ऑगस्टपासून पॉझिटिव्ह पे कन्फर्मेशन (Positive Pay System) नियम लागू करणार आहे. नवीन नियमानुसार बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांना आता कोणत्याही व्यक्तीच्या नावाने चेक देण्यापूर्वी बँकेला त्याबाबतची महत्त्वाची माहिती द्यावी लागेल. बँकेने याबाबचं नोटिफिकेशन जारी केलं आहे. या नोटिफिकेशननुसार, पॉझिटिव्ह पे कन्फर्मेशन नियम 1 ऑगस्ट 2022 पासून लागू होईल. याअंतर्गत पाच लाख रुपयांवरील चेकसाठी नवीन नियम अनिवार्य असणार आहे. प्रवाशांच्या रेल्वेत विसरलेल्या सामनाचा पुढे काय होतं? तुमचं हरवलेलं सामान परत कसं मिळवायचं? जर एखाद्या ग्राहकाने नियमाचं पालन न करता चेक व्हेरिफाय केला नाही, तर बँकेकडून चेक क्लिअर केला जाणार नाही.

जाहिरात

बँकेला कोणती माहिती द्यावी लागेल? चेकची तारीख, प्राप्तकर्त्याचे नाव, रक्कम, खाते क्रमांक, चेक नंबर, ट्रान्झॅक्शन कोड ही माहिती तुम्हाला बँकेला द्यावी लागेल. अवघ्या काही मिनिटात कागदपत्रांशिवाय कर्जाचे पैसे अकाऊंटमध्ये येतील, ‘या’ सरकारी बँकेची खास सुविधा पॉझिटिव्ह पे व्हेरिफिकेशन सिस्टम? पॉझिटिव्ह पे सिस्टीममध्ये बँकेला निश्चित रकमेपेक्षा जास्त चेक अमाउंट असल्यास माहिती द्यावी लागते. बँक पेमेंट करण्यापूर्वी दिलेली माहिती आणि चेकचे डिटेल्स एकत्र तपासते. हे एक ऑटोमेटेड फ्रॉड डिटेक्शन टूल आहे. चेकचा गैरवापर होऊ नये म्हणून हा नियम लागू करण्यात आला आहे. पॉझिटिव्ह पे सिस्टीम अंतर्गत, चेक जारी करणाऱ्याला एसएमएस, इंटरनेट बँकिंग, एटीएम किंवा मोबाइल बँकिंगद्वारे बँकेला कळवावे लागेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात