मुंबई, 6 जुलै : आर्थिक अडचणीच्या काळात पैसे उभे करण्यासाठी अनेकजण बँक लोनचा (Bank Loan) विचार करतात. मात्र बँक लोनची प्रक्रिया काही किचकट असल्याने तेथे पैसे मिळण्यासाठी उशीर लागू शकतो. मात्र तुम्ही जर पंजाब नॅशनल बँकेचे ग्राहक (PNB Customer) असाल तर तुमच्या आनंदाची बातमी आहे. कारण अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही कर्ज मिळवू शकता.
पंजाब नॅशनल बँकेने ग्राहकांच्या सुविधेसाठी यासाठीच्या प्रक्रियेची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. कागदपत्रांशिवाय कर्ज मिळवण्यासाठी ग्राहकांना फक्त काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. त्यानंतर कर्जाचे पैसे खात्यात त्वरित जमा होतील.
प्रवाशांच्या रेल्वेत विसरलेल्या सामनाचा पुढे काय होतं? तुमचं हरवलेलं सामान परत कसं मिळवायचं?
पंजाब नॅशनल बँकेकडून हे प्री अप्रुव्ह्ड लोन (Pre Approved Loan) ग्राहकांना ऑफर केलं जात आहे. यासाठी फक्त एक OTP आवश्यक आहे त्यानंतर हे कर्ज मंजूर होईल. पीएनबीने ग्राहकांना याची सर्व माहिती मिळावी यासाठी अधिकृत ट्विटर हँडलवरून देखील माहिती दिली आहे. पीएनबीच्या ट्वीटनुसार OTP नंतर ग्राहक फक्त 4 क्लिकमध्ये कर्ज घेऊ शकतात. विशेष बाब म्हणजे बँकेने यासाठी यूट्युबवर ट्यूटोरियल व्हिडिओही उपलब्ध करून दिले आहेत.
It's Instant. It's Paperless. It's Pre-Approved Personal Loan.
All it takes is 1 OTP and 4 clicks. Scan the given code to apply now or watch YouTube tutorial here: https://t.co/gyEsvynVnR#LoanOnTheGo #PreApprovedLoan #AmritMahotsav pic.twitter.com/YPKBHhzwne — Punjab National Bank (@pnbindia) July 5, 2022
PM Ujjwala Yojana: ‘या’ ग्राहकांना गॅस सिलिंडरवर पुन्हा मिळणार सबसिडी, फॉलो करा सोपी प्रोसेस
कसा कराल अर्ज?
>> प्री अप्रुव्ह्ड कर्ज मिळवण्यासाठी ग्राहकाला पीएनबी वन अॅप (PNB One App) ओपन करावे लागेल.
>> होम पेजवर ऑफर्सचा पर्याय निवडावा लागेल.
>> सर्व डिटेल्स व्हेरिफाय केल्यानंतर Next वर क्लिक करा.
>> कर्जाची रक्कम स्क्रीनवर टाकावी लागेल.
>> सर्व अटी वाचल्यानंतर, Accept आणि Procced वर क्लिक करा.
>> यानंतर रजिस्टर मोबाइल क्रमांकावर प्राप्त झालेला ओटीपी एंटर करा.
>> तुम्ही OTP सबमिट करताच तुमची लोनसाठी अर्जाची प्रोसेस पूर्ण होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Instant loans, Money, Pnb bank