मराठी बातम्या /बातम्या /मनी /EXCLUSIVE: Tax Slab मध्ये बदल केले नाहीत कारण... अर्थमंत्र्यांनी प्रथमच केला खुलासा

EXCLUSIVE: Tax Slab मध्ये बदल केले नाहीत कारण... अर्थमंत्र्यांनी प्रथमच केला खुलासा

Budget 2022: 'नेमस्त किंवा Conservative दृष्टिकोन ठेवणं चुकीचं नक्कीच नाही. उलट हा दृष्टिकोन अधिक जबाबदारीचा आहे.' अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा Exclusive Interview..

Budget 2022: 'नेमस्त किंवा Conservative दृष्टिकोन ठेवणं चुकीचं नक्कीच नाही. उलट हा दृष्टिकोन अधिक जबाबदारीचा आहे.' अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा Exclusive Interview..

Budget 2022: 'नेमस्त किंवा Conservative दृष्टिकोन ठेवणं चुकीचं नक्कीच नाही. उलट हा दृष्टिकोन अधिक जबाबदारीचा आहे.' अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा Exclusive Interview..

  नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी : Budget 2022 सादर केल्यानंतर त्यामध्ये नवीन काहीच नाही. करदात्यांसाठी काहीच वेगळं केलेलं नाही, अशी टीका होत आहे. त्यावर प्रथमच भाष्य करताना देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FM Nirmala Sitharaman on Tax regime) म्हणाल्या, "नेमस्त किंवा Conservative दृष्टिकोन ठेवणं चुकीचं नक्कीच नाही. उलट हा दृष्टिकोन अधिक जबाबदारीचा आहे. देशाच्या अर्थकारणाचा (India Economy post Budget 2022) गाडा हाकताना अनेक आश्चर्यकारक बदल, अनपेक्षित संकटं येत असतात. अशा वेळी नेमस्त भूमिक घेत धडाडीने हा गाडा पुढे नेणंच आवश्यक असतं."

  अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FM Nirmala Sitharaman Exclusive on Budget 2022) यांनी मांडलेल्या ताज्या अर्थसंकल्पानंतर (Budget 2022) त्यांनी प्रथमच माध्यमांना प्रदीर्घ मुलाखत दिली. Network18 चे राहुल जोशी यांनी ही मुलाखत घेतली. अर्थसंकल्पामागची भूमिका, कररचनेत न केलेले बदल, पायाभूत सुविधा वाढीला दिलेलं महत्त्व आणि एकूणच वाढीकडे चाललेली अर्थव्यवस्था या सर्वांवर अर्थमंत्र्यांनी भाष्य केलं.

  पुढची पाच वर्षं 8 टक्क्यांचा विकासरदर कायम राहू शकतो. सगळ्या क्षेत्रांनी जोर लावून काम करायला हवं, असा विश्वास या वेळी अर्थमंत्र्यांनी व्यक्त केला.

  पेट्रोल-डिझेलच्या किंमती आपल्या हातात नसतात. या वेळी युरियाच्या किमतीतही अचानक वाढ झाली. या सगळ्या अस्थिरतेमध्ये काहीतरी स्थिर रचना देणं हे खरं आव्हान असतं, असं सीतारामन म्हणाल्या. त्यात आता कोरोना महसाथीने अर्थव्यवस्थेला खिळ घातली. अशा वेळी स्थिर करव्यवस्था आणि धोरण असेल तरच अर्थव्यवस्थेची गती कायम राहील, असं त्या म्हणाल्या.

  कररचाना किंवा Tax Slabs मध्ये कुठलेही बदल केलेले नाहीत. कारण दर वेळी बदल केले म्हणजेच चांगलं असं म्हणून चालणार नाही. खरं तर करदात्यांना Predictability हवी असते. स्थैर्य हवं असतं. दरवर्षी छोटे-मोठे बदल करून धक्का देण्याऐवजी ही प्रेडिक्टिबिलिटी देणं हे सध्याच्या काळात आवश्यक आहे, असं निर्मला सीतारामन म्हणाल्या.

  Budget 2022 | देशात तुटीचाच अर्थसंकल्प का होतो सादर? याचे फायदे तोटे काय?

  अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी, 1 फेब्रुवारी रोजी चौथा अर्थसंकल्प सादर केला. त्यामध्ये त्यांनी सामान्य करदात्यांच्या करररचनेत बदल केलेला नसला तरी कॉर्पोरेट विश्वाला खूश केलेलं आहे. कॉर्पोरेट टॅक्स 18 टक्क्यांवरून 15 टक्के केला त्याच बरोबर कॉर्पोरेट टॅक्सवरील सरचार्ज 12 वरून 7 टक्क्यांवर आणला आहे.

  महत्त्वाच्या घोषणा

  अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या. त्यातल्या महत्त्वाच्या घोषणा अशा...

  60 लाख नोकऱ्या दिल्या जातील.

  पुढील 3 वर्षांत 400 नवीन वंदे भारत रेल्वे चालवल्या जातील.

  3 वर्षात 100 PM गति शक्ती कार्गो टर्मिनल विकसित केले जातील.

  क्रिप्टोच्या उत्पन्नावर 30 टक्के कर लागणार.

  1.5 लाख पोस्ट ऑफिस कोअर बँकिंग अंतर्गत येतील. पोस्ट ऑफिसमध्येही आता ऑनलाइन ट्रान्सफर शक्य होणार आहे.

  2022-23 मध्ये 80 लाख नवीन घरे बांधली जातील.

  देशात डिजिटल विद्यापीठ तयार केले जाईल.

  20,000 कोटी रुपये खर्चून 25 हजार किमीचे राष्ट्रीय महामार्ग बांधले जातील.

  देशातील 5 मोठ्या नद्यांना जोडण्यासाठी जलसंपदा विकास मंत्रालयाच्या मदतीनेही काम केले जाईल.

  75 जिल्ह्यांमध्ये डिजिटल बँकिंग सुरू करण्यात येणार आहे.

  2022-23 मध्ये ई-पासपोर्ट लागू केला जाईल.

  Digital Rupee : RBI कडून लॉन्च केली जाणारी डिजिटल करन्सी कशी असेल?

  शहरांच्या विकासासाठी सेंटर ऑफ एक्सलन्सची (Center of Excellence) स्थापना केली जाईल.

  एक राष्ट्र, एक नोंदणी योजना (One Nation, One Registration) सुरू केली जाईल. त्यामुळे व्यवसाय करणे सोपे जाईल.

  इलेक्ट्रिक वाहन इकोसिस्टमला प्रोत्साहन देण्यासाठी खाजगी क्षेत्राला प्रोत्साहन दिले जाईल

  First published:
  top videos

   Tags: Budget, Finance, Network18, Nirmala Sitharaman, Union Finance Minister