जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Stocks Return: 'या' स्टॉकने 1 लाखाचे केले 50 लाख, एका वर्षात दिला 4,947% रिटर्न

Stocks Return: 'या' स्टॉकने 1 लाखाचे केले 50 लाख, एका वर्षात दिला 4,947% रिटर्न

Stocks Return: 'या' स्टॉकने 1 लाखाचे केले 50 लाख, एका वर्षात दिला 4,947% रिटर्न

गेल्या दोन वर्षांत मोठ्या संख्येने शेअर्सनी (shares market update) त्यांच्या भागधारकांना मल्टिबॅगर रिटर्न (Multibagger return) दिला आहे. 2021 मधील मल्टिबॅगर स्टॉकच्या यादीमध्ये केवळ स्मॉल-कॅप, मिड-कॅप आणि लार्ज-कॅप मधील दर्जेदार स्टॉकचा समावेश नाही तर पेनी स्टॉक्सचाही (Penny stock) समावेश आहे

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी: गेल्या दोन वर्षांत मोठ्या संख्येने शेअर्सनी (shares market update) त्यांच्या भागधारकांना मल्टिबॅगर रिटर्न (Multibagger return) दिला आहे. 2021 मधील मल्टिबॅगर स्टॉकच्या यादीमध्ये केवळ स्मॉल-कॅप, मिड-कॅप आणि लार्ज-कॅप मधील दर्जेदार स्टॉकचा समावेश नाही तर पेनी स्टॉक्सचाही (Penny stock) समावेश आहे. फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिक शेअर्स (Flomic Global Logistics shares) हे भारतातील मल्टिबॅगर स्टॉक्सपैकी एक आहेत जे मल्टिबॅगर पेनी स्टॉकच्या यादीमध्ये समाविष्ट आहेत. गुंतवणूकदारांच्या 1 लाखांचे झाले 50 लाख गेल्या एका वर्षात फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिकच्या शेअर्समध्ये (Flomic Global Logistics Shares) 4,947% वाढ झाली आहे. 8 फेब्रुवारी 2021 रोजी 2.93 वर बंद झालेला हा पेनी स्टॉक (penny stock) आज BSE वर 147.90 रुपयांच्या स्तरावर पोहोचला आहे. फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिक्सच्या (Flomic Global Logistics) शेअर्समध्ये वर्षभरापूर्वी ज्यांनी 1 लाख रुपये गुंतवले होते, त्यांचे आज 49.40 लाख रुपये झाले आहेत. हे वाचा- Life Insurance : पहिल्यांदा विमा पॉलिसी खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवाच 9 फेब्रुवारीला BSE वर मायक्रोकॅप स्टॉक 2.18% वाढून रुपयांच्या वाढीसह 147.90 च्या इंट्राडे हाय वर पोहोचला. BSE वर शेअर 2.18% च्या वाढीसह 144.75 रुपयांवर उघडला होता. शेअर 200 दिवसांच्या मूव्हिंग सरासरीपेक्षा (Moving Average) जास्त आहे परंतु 5 दिवस, 20 दिवस, 50 दिवस आणि 100 दिवसांच्या चलन सरासरीपेक्षा कमी ट्रेड करतोय. बीएसईवर कंपनीच्या एकूण 3,910 शेअर्सने 5.35 लाख रुपयांचा व्यवसाय केला. बीएसईवर कंपनीचे मार्केट कॅप 99.18 कोटी रुपये राहिला. दरम्यान, या वर्षाच्या सुरुवातीपासून शेअर 26.76 टक्क्यांनी घसरला आहे. हा शेअर 28 ऑक्टोबर 2021 रोजी 52 आठवड्यांतील उच्च स्तरावर गेला आणि त्याने 216 रुपयांचा टप्पा गाठला आणि 15 फेब्रुवारी 2021 रोजी 2.98 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या नीचांक स्तरावर पोहोचला. हे वाचा- Tata Group साम्राज्यातील कंपन्यांची संपूर्ण लिस्ट, अनेक कंपन्या माहितही नसतील शेअर मार्केटमधील गुंतवणूक जिकिरीची असते. कोविड काळात शेअर्समध्ये मध्यमवर्गीयांचं शेअर मार्केटमधील गुंतवणुकीचं प्रमाण वाढलंय. अनेक लोकांनी युट्यूब चॅनेल बघून शेअर ट्रेडिंग सुरू केलंय. शेअर ट्रेडिंगमध्ये तरुणांचं प्रमाण वाढतंय. थोड्याफार प्रमाणात का होईना, सर्वजण शेअर्समध्ये गुंतवणूक करत आहेत. त्यामुळे ज्यांना शेअर मार्केटचं गणित समजलंय आणि मार्केट कळू लागलंय, ते लोक गुंतवणूक करून चांगले रिटर्न मिळवत आहे. पण शेअर ट्रेडिंग करताना खूप काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे व्यवस्थित प्रशिक्षण घेऊन टप्प्याटप्प्याने शेअर मार्केटमधील गुंतवणूक कधीही हिताचं ठरतं. फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिक्सच्या शेअर्सने तर वर्षभरात खूप चांगला रिटर्न दिला आहे. त्यामुळे तुम्हीही विचारपूर्वक गुंतवणूक करू शकता.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात