नवी दिल्ली, 30 सप्टेंबर: महागाई भत्ता (DA), महागाई सवलत (DR), घरभाडे भत्ता (HRA) मध्ये वाढ केल्यानंतर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आज केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणखी एक आनंदाची बातमी देणार आहे. खरं तर, कोरोना संकटाच्या (Coronavirus in India) दरम्यान सरकारने कर्मचाऱ्यांना दीड वर्षासाठी महागाई भत्त्याची थकबाकी दिली नव्हती. या परिस्थितीत आज केंद्रीय कर्मचाऱ्यांना थोडा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना आज दुप्पट बोनस मिळू शकतो. सरकारने लाखो कर्मचाऱ्यांचा डीए 28 टक्के केला आहे. यासोबतच घरभाडे भत्ता (एचआरए) मध्येही वाढ करण्यात आली आहे.
कशाप्रकारे येणार वाढलेला पगार?
सरकारी कर्मचाऱ्यांना कोरोना काळात नुकसान सहन करावे लागले असले तरी या बातमीमुळे त्यांच्या आनंदात वाढ होणार आहे. केंद्र सरकारने आदेश जारी करताना सांगितले की, सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ पगाराच्या आधारावर घरभाडे भत्ता आणि डीएमध्ये वाढ केली जावी. नियमानुसार, डीए 25 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास एचआरए वाढवावा लागेल. त्यामुळे केंद्र सरकारने एचआरए वाढवून 27 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. 7 जुलै 2017 रोजी खर्च विभागाने जारी केलेल्या आदेशात असे म्हटले होते की, जेव्हा DA 25 टक्क्यांपेक्षा जास्त असेल, तेव्हा HRA मध्येही सुधारणा केली जाईल. अशा परिस्थितीत 1 जुलै 2021 पासून महागाई भत्ता 28 टक्क्यांपर्यंत वाढला आहे, त्यानंतर एचआरए वाढवणे देखील आवश्यक आहे.
वाचा-बदलायच्या आहेत फाटलेल्या नोटा? बदल्यात बँकांकडून किती मिळतील पैसे; वाचा सविस्तर
किती जास्त मिळणार एचआरए?
केंद्रीय कर्मचाऱ्यांना शहराच्या हिशोबाने 27 टक्के, 18 टक्के आणि 9 टक्के एचआरए दिला जात आहे. 1 जुलै 2021 पासून लागू करण्यात आलेल्या डीए वाढीनंतर एचआरएमधील ही वाढ लागू करण्यात आली आहे. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर एक्स कॅटेगरीतील कर्मचाऱ्यांना आता दरमहा 5400 रुपयांपेक्षा जास्त एचआरए मिळेल. यानंतर वाय क्लासमधील कर्मचाऱ्यांना दरमहा 3600 रुपये तर झेड क्लास कर्मचाऱ्यांना 1800 रुपये प्रति महिना पेक्षा जास्त एचआरए मिळेल.
वाचा-नोकरी बदलताना Salary Slip आवश्यक, आणखीही अनेक कामासाठी आवश्यक आहे हा दस्तावेज
काय आहे वाढलेल्या पगाराचं गणित?
7 व्या वेतन आयोगानुसार केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे किमान मूलभूत वेतन 18,000 रुपये आहे. सध्या, खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 15000 रुपयांपासून सुरू होते. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना जून 2021 पर्यंत 17 टक्के दराने 18,000 रुपयांच्या मूळ पगारावर 3060 रुपये महागाई भत्ता मिळत होता. जुलै 2021 पासून केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना 28 टक्के डीएनुसार दरमहा 5040 रुपये मिळतील. या आधारावर, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनात 1980 रुपयांची वाढ करण्यात आली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Job