Home /News /money /

Flipkart आणि Amazon मध्ये बंपर भरती! फेस्टिव्ह सीझनमध्ये देणार 3 लाख जणांना नोकरी

Flipkart आणि Amazon मध्ये बंपर भरती! फेस्टिव्ह सीझनमध्ये देणार 3 लाख जणांना नोकरी

फ्लिपकार्ट (Flipkart) आणि अ‍ॅमेझॉन (Amazon) सारख्या महत्त्वाच्या ई-कॉमर्स कंपन्या देशात जवळपास 3 लाख जणांना नोकरी देणार आहेत.

     नवी दिल्ली, 30 सप्टेंबर : ई-कॉमर्स कंपन्या (e-commerce companies) या फेस्टिव्ह सीझनमध्ये त्यांची विक्री आणखी जास्त व्हावी, याकरता मोठ्या प्रमाणात नोकरभरती करणार आहे. फ्लिपकार्ट (Flipkart) आणि अ‍ॅमेझॉन  (Amazon) सारख्या महत्त्वाच्या ई-कॉमर्स कंपन्या देशात जवळपास 3 लाख जणांना नोकरी देणार आहेत. RedSeer च्या अहवालानुसार, फेस्टिव्ह सीझन लक्षात घेता ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात तात्पुरत्या स्वरूपासाठी नियुक्ती करण्यात येण्यात आहे. एवढेच नव्हे तर ई-कॉमर्स कंपन्यांचा माल लोकांपर्यंत पोहोचवणारी लॉजिस्टिक कंपनीने देखील  ईकॉम एक्सप्रेस ने 30,000 नोकऱ्यांची घोषणा केली आहे. या कंपन्यांमध्ये ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात नोकरभरती होण्याची शक्यता आहे. RedSeer च्या मते यावेळी नियुक्त करण्यात येणाऱ्या तात्पुरत्या कर्मचाऱ्यांपैकी 20 टक्के लोकांना फेस्टिव्ह सीझन संपल्यावर देखील कामावरून कमी केले जाणार नाही. गेल्या काही दिवसात ऑनलाइन खरेदी वाढली आहे. (हे वाचा-General Atlantic करणार रिलायन्स रिटेलमध्ये 3675 कोटींची गुंतवणूक, वाचा सविस्तर) वाढणारी मागणी पूर्ण करण्यासाठी देशातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी Amazon भारतात 1 लाख लोकांना नोकरीची संधी देणार आहे. हे नवीन कर्मचारी सामान पॅक करणे, ते पाठवणे यासांरख्या कामासाठी निवडण्या येतील. ही नोकरभरती फुलटाइम किंवा पार्ट टाइम कामासाठी केली जाईल. यासाठी केली जाईल भरती या अहवालात असे म्हटले आहे की, 3 लाख नोकऱ्यांपैकी 70 टक्के नोकरभरती Amazon आणि Flipkart मध्ये केली जाणार आहे. तर इतर नोकरभरती Ecom Express सारख्या लॉजिस्टिक कंपन्यांद्वारे केली जाईल. या नोकऱ्यांमध्ये 60 टक्के लॉजिस्टिक फंक्शन्समध्ये काम करण्यासाठी माणसांची आवश्यकता आहे. 20 टक्के नोकरभरती वेअरहाऊस आणि 20 टक्के कस्टमर सर्व्हिस फंक्शन्ससाठी नोकरभरती होऊ शकते. Flipkart देणार इतके जॉब महिन्याच्या सुरूवातीला फ्लिपकार्टने म्हटले होते की या फेस्टिव्ह सीझनमध्ये 70,000 लोकांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या नोकरी मिळण्यास मदत होईल. (हे वाचा-SBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज! आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा) फ्लिपकार्टमधील थेट नोकर्‍या सप्लाय चेन विभागात देण्यात येतील. त्याअंतर्गत कंपनी डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह, पिकर्स, पॅकर्स आणि शॉट्र्सची भरती करणार आहे. याशिवाय, कंपनी फ्लिपकार्टचे सेलर पार्टनर लोकेशन आणि किराणा दुकानात अप्रत्यक्षपणे लोकांना नोकर्‍या देईल.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Money

    पुढील बातम्या