मराठी बातम्या /बातम्या /मनी /रिलायन्स रिटेलमध्ये गुंतवणुकीचा ग्राफ वाढताच! आता General Atlantic करणार 3675 कोटींची गुंतवणूक

रिलायन्स रिटेलमध्ये गुंतवणुकीचा ग्राफ वाढताच! आता General Atlantic करणार 3675 कोटींची गुंतवणूक

अमेरिकन प्रायव्हेट इक्विटी फर्म जनरल अ‍टलांटिक (General Atlantic) रिलायन्स रिटेल व्हेंचरमध्ये (Reliance Retail Ventures) मध्ये 3675 कोटींची गुंतवणूक करणार आहे.

अमेरिकन प्रायव्हेट इक्विटी फर्म जनरल अ‍टलांटिक (General Atlantic) रिलायन्स रिटेल व्हेंचरमध्ये (Reliance Retail Ventures) मध्ये 3675 कोटींची गुंतवणूक करणार आहे.

अमेरिकन प्रायव्हेट इक्विटी फर्म जनरल अ‍टलांटिक (General Atlantic) रिलायन्स रिटेल व्हेंचरमध्ये (Reliance Retail Ventures) मध्ये 3675 कोटींची गुंतवणूक करणार आहे.

मुंबई, 30 सप्टेंबर : अमेरिकन प्रायव्हेट इक्विटी फर्म जनरल अ‍टलांटिक (General Atlantic) रिलायन्स रिटेल व्हेंचरमध्ये (Reliance Retail Ventures) मध्ये 3675 कोटींची गुंतवणूक करणार आहे. या गुंतवणुकीनंतर GAची  रिलायन्स रिटेलमध्ये 0.84 टक्के भागीदारी असेल. गेल्या महिनाभरातील रिलायन्स समूहातील (Reliance Industries Ltd - RIL) ही तिसरी महत्त्वाची आणि मोठी गुंतवणूक आहे. रिलायन्स रिटेल व्हेंचर्सची सबसिडिअरी रिलायन्स रिटेल देशभरात सर्वात मोठा रिटेल व्यवसाय चालवते आहे. रियालन्स रिटेलचे देशभरातील 7000 शहरांमध्ये 12000 हून अधिक स्टोअर्स आहेत, ज्याअंतर्गत रिलायन्स रिटेलशी 640 मिलियन ग्राहक जोडले गेले आहेत. अशा प्रकारे विस्तारलेल्या या व्यवसायासाठी हा करार अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

या गुंतवणुकीनंतर रिलायन्स रिटेलचे प्री-मनी इक्विटी मुल्य 4.28 लाख कोटी रुपये होईल. या महिन्यामध्ये याआधी केलेल्या 2 करारांपेक्षा हे मुल्य थोडे अधिक असणार आहे. आधीच्या दोन करारानंतर रिलायन्स रिटेलचे प्री-मनी इक्विटी मुल्य 4.21 लाख कोटी होते.

(हे वाचा-SBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज! आज रात्रीपासून बंद होणार ही सेवा)

रिलायन्स समूह अ‍ॅमेझॉन इंडिया आणि वॉलमार्टच्या मालकीचे असणाऱ्या फ्लिपकार्टशी स्पर्धा करण्यासाठी जगभरातील महत्त्वाच्या कंपन्यांशी करार करत आहे. तेल कंपन्या ते अगदी टेलिकॉम, आरआयएल त्यांच्या रिटेल बिझनेसचा विस्तार करत आहे. या स्पर्धकांशी स्पर्धा करण्यासाठी रिलायन्स रिटेलच ग्लोबल गुंतवणुकदारांना आकर्षित करण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे.

जनरल अ‍टलांटिक ही गुंतवणूक क्षेत्रातील एक मोठी प्रायव्हेट इक्विटी फर्म आहे. या फर्मचा 40 वर्षांचा चांगला रेकॉर्ड आहे. जीएकडून तंत्रज्ञान, कन्झ्यूमर, आर्थिक सेवा आणि हेल्थकेअर फर्म्समध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते.  या गुंतवणुकीनंतर भारतीय रिटेल व्यवसाय वृद्धींगत करण्यासाठी रिलायन्स रिटेल आघाडीवर राहिल

(हे वाचा-खरीप पिकाच्या विक्रीनंतर शेतकऱ्यांना त्वरित मिळणार पैसे, सरकारचा मोठा निर्णय)

जनरल अ‍टलांटिकची रिलायन्स समूहातील ही दुसरी मोठी गुंतवणूक असणार आहे. मे महिन्यामध्ये जीएने अशी घोषणा केली होती की ते रिलायन्स समूहाच्या जिओ प्लॅटफॉर्ममध्ये 6598 कोटींची गुंतवणूक करणार आहे.

या कराराविषयी बोलताना रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी म्हणाले की, 'आम्ही जनरल अटलांटिकशी असलेले आपले संबंध वाढवण्यास खूश आहोत कारण आम्ही व्यापारी आणि ग्राहक दोघांना सबल बनविण्याच्या दृष्टीने कार्य करीत आहोत, जेणेकरून भारतीय रिटेलमध्ये बदल होईल. रिलायन्स रिटेलप्रमाणेच, जनरल अटलांटिक संपूर्ण भारतासह जगभरात प्रगती आणि वाढ होण्यासाठी डिजिटल सक्षमतेच्या मूलभूत क्षमतेवर विश्वास ठेवते.'

जनरल अटलांटिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी बिल फोर्ड म्हणाले की, 'डिजिटल इंडिया सक्षम करण्याच्या उद्देशाने देशाच्या किरकोळ क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणण्यासाठी मुकेश यांच्या नवीन वाणिज्य मोहिमेचे समर्थन करण्यासाठी जनरल अटलांटिक अत्यंत आनंदित आहे.'

(हे वाचा-बँकेत एकही रुपया नसला तरी देखील गरजेसाठी काढता येतील पैसे, या बँकेची खास योजना)

रिलायन्स रिटेलच्या संचालक ईशा अंबानी म्हणाल्या, 'सर्व भारतीय ग्राहक आणि व्यापार्‍यांच्या हितासाठी इंडियन रिटेल इकोसिस्टम विकसित करण्यासाठी महत्त्वाचा भागीदार म्हणून जनरल अटलांटिकचे स्वागत करण्यास आम्हाला आनंद होत आहे. जनरल अटलांटिकला जागतिक स्तरावर जगभरातील अग्रगण्य ग्राहक आणि रिटेल कंपन्यांसह काम करून विकसित केलेल्या रिटेल स्पेसविषयी प्रचंड ज्ञान आहे आणि आम्ही आमच्या प्रवासामध्ये प्रगती करीत असताना त्याचा फायदा होण्याची आशा आहे.'

23 सप्टेबर रोजी अमेरिकन बायआऊट फर्म केकेआर अँड कं. (KKR & Co)रिलायन्स समूहाच्या रियालन्स रिटेलमध्ये 5,550 कोटी रुपयांची गुंतवणूक करून 1.28 टक्क्यांची भागीदारी खरेदी करणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. तर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला प्रायव्हेट इक्विटी क्षेत्रातील मोठी फर्म असणाऱ्या सिल्ह्वर लेक पार्टनर्सने देखील रिलायन्स रिटेलमध्ये 7500 कोटींची गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती. रिलायन्स रिटेल व्हेंचर्समध्ये त्यांनी 1.75 टक्के भागीदारीत गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. रिलायन्स समूहाकडे ही रक्कम प्राप्त झाली आहे.

तर याआधी रिलायन्स समुहाची (Reliance Industries) उपकंपनी असलेल्या रिलायन्स रिटेल व्हेन्चर्स (RRVL) ने किशोर बियानी प्रमोटेड फ्यूचर ग्रुप (Future Group)च्या रिटेल, होलसेल व्यवसाय, लॉजिस्टिक आणि वेअरहाऊस व्यवसायाचे संपादन करण्याची घोषणा केली होती. रिलायन्स रिटेल आणि फ्यूचर ग्रृपमध्ये हा करार 24,713 कोटींमध्ये करण्यात आला.

First published:
top videos

    Tags: Reliance, Reliance Industries Limited