नवी दिल्ली, 16 ऑगस्ट: तुम्ही देखील गुंतवणूक (Investment Options) करण्याचा विचार करत असाल तर फिक्स्ड डिपॉझिट (Fixed Deposit) हा एक सुरक्षित आणि कमी जोखीम असणारा पर्याय आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक बँकांनी फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याज कमी केले आहे. दरम्यान ज्याठिकाणी जास्त व्याज (Highest Interest Rates on FD) दर आहे अशाठिकाणी गुंतवणूक करण्याला पसंती दिली जाते. विशेषत: ज्येष्ठ नागरिकांसाठी हा पर्याय अधिक फायद्याचा आहे. कारण इतर वयोगटातील नागरिकांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना अधिक व्याजदराने एफडी करता येते.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) गेल्या वर्षभरात रेपो रेटमध्ये बदल केलेला नाही. आताही रेपो रेट 4 टक्क्यांवर आहे. यामुळे अधिकतर बँकांना एफडीवरील व्याजदर कमीच ठेवले आहेत. गेल्या काही महिन्याच महत्त्वाच्या बँकांनी एफडीवरील व्याजदरात कपात केली आहे. मात्र काही खासगी बँका अशा आहेत ज्या विविध कालावधीसाठी एफडीवर चांगला व्याजदर देत आहेत. तुम्ही गुंतवणूक करण्यासाठी या खासगी बँकांचा विचार करू शकता.
हे वाचा-कमी उत्पन्न असेल तरी नो टेन्शन! पूर्ण करता येईल स्वत:च्या घराचं स्वप्न
तुम्ही एफडीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर या 10 खासगी बँका (Top 10 Privates banks with Highest FD Rates) सर्वाधिक व्याजदर देतात. या यादीमध्ये देण्यात आलेले दर 1 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवीसाठी आणि पाच वर्षांपर्यंतच्या एफडीवरील व्याजदर आहेत. ज्येष्ठ नागरिकांना 50 बेसिस पॉइंट्स अधिक दराने व्याज मिळते.
ही आहे सर्वाधिक व्याजदर देणाऱ्या टॉप बँकांची यादी
1 डीबीएस बँक– 5.70-6.50 टक्के
2 इंडसइंड बँक– 5.50-6.50 टक्के
3 आरबीएल बँक– 5.40-6.50 टक्के
4 येस बँक– 5.25-6.50 टक्के
5 TNSC बँक– 5.75-6.00 टक्के
हे वाचा-1 लाख रुपयांच्या Lucky Winnerचा मेसेज तुम्हालाही आलाय का? PNB ने जारी केला अलर्ट
6 IDFS फर्स्ट बँक– 5.25-6.00 टक्के
7 करुर वैश्य बँक– 4.25-6.00 टक्के
8 अॅक्सिस बँक– 4.40-5.75 टक्के
9 साउथ इंडियन बँक – 4.50-5.65 टक्के
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.