नवी दिल्ली, 25 मे : गेल्या अनेक वर्षांपासून लोकांचा फिक्स्ड डिपॉझिटवर विश्वास आहे. लोक दोन कारणांसाठी एफडीमध्ये गुंतवणूक करतात. पहिली म्हणजे यात रिस्क कमी असते आणि गॅरंटीड रिटर्न मिळते. FD चा आणखी एक फायदा आहे. गरज भासल्यास, तुम्ही तुमचे पैसे कधीही त्यातून काढू शकता. याला प्री-मॅच्युअर विथड्रॉवल म्हणतात. FD तोडण्याचे काही तोटे आहेत. असे केल्याने जिथे व्याज कमी असेल तिथे दंडही भरावा लागतो. वेगवेगळ्या बँकांचा दंडही वेगळा आहे. दंड 0.5 फ टक्के ते 1 टक्के असू शकतो. एकूण रकमेवर नव्हे तर मिळालेल्या व्याजावर दंड आकारला जातो.
जर तुम्ही मुदतीपूर्वी एफडी मोडत असाल. तर एफडी उघडताना तुम्ही ठरवलेला व्याजदर तुम्हाला मिळणार नाही. बँकिंग भाषेत, त्याला बुक्ड रेट म्हणतात. एफडी तोडल्यावर, बुक केलेल्या दराऐवजी कार्ड रेटवर व्याज दिले जाते. कार्ड रेट म्हणजे ज्या कालावधीनंतर FD मोडली गेली आहे, त्या कालावधीसाठी बँक FD वर जे व्याज देत आहे, तेवढेच व्याज दिले जाईल. यासोबतच त्या व्याजावर दंडही आकारण्यात येणार आहे. दंडामुळे प्रभावी व्याजदर कमी झाल्यामुळे FD वेळेपूर्वीच मोडणं महागात पडू शकतं.
कधीच हँग होणार नाही फोन; 1 मिनिटात प्रॉब्लम सॉल्व, या ट्रिक आहेत बेस्ट
FD चा कालावधी 5 वर्षांचा असतो. पण जर तुम्ही ही एफडी एक वर्षानंतर मोडली तर तुम्हाला किती नुकसान होईल ते पाहूया. समजा तुम्ही 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. एफडीचा कालावधी 5 वर्षांचा आहे. तर 5 वर्षांवर 7 टक्के व्याज असेल. पण 1 वर्षावर तुम्हाला 6 टक्केच व्याज मिळेल.
स्वस्तात मस्त फ्रीज खरेदी करायचंय? येथे सुरु आहे बंपर ऑफर, उशीर करु नका
आता येथे एक वर्षानंतर तुम्हाला FD तोडण्यावर 7% व्याज मिळणार नाही. त्याऐवजी, कार्ड रेटनुसार तुम्हाला 6 टक्के व्याज मिळेल. आता या सहा टक्के व्याजावरही तुम्हाला 1 टक्के पेनल्टी भरावी लागणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला फक्त पाच टक्के प्रभावी व्याज मिळेल. जर तुम्ही 5 वर्षांनंतर पैसे काढले असते, तर तुम्हाला वार्षिक 7% दराने 7000 रुपये व्याज मिळाले असते. दुसरीकडे, प्री-मॅच्युअर विथड्रॉवलवर तुम्हाला 5 टक्केनुसार फक्त 5 हजार रुपये मिळतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.