मुंबई, 23 जुलै : लग्नात कितीही मजामस्ती असली तरी शेवटचा क्षण भावनिक असतो. तो म्हणजे नवरी मुलीची पाठवणी. नवरीसह तिच्या माहेरच्या सर्व नातेवाईकांच्या डोळ्यात पाणी येतं. पण सर्वात भावुक होतो तो बाप. लेक ही वडिलांची खूप लाडकी असते. आपल्या काळजावर दगड ठेवून फुलासारख्या जपलेल्या लेकीला ते सासरी पाठवतात. आयुष्यात कितीही संकट, दुःख आली तरीही कधीच न रडणारा खंबीर मनाचा बाप या क्षणी मात्र खूप हळवा होतो. अशाच बापलेकीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. लग्नातील पाठवणीचे व्हिडीओ पाहून अनेकांना रडू येतं. या व्हिडीओतही सुरुवातीला तसंच होईल पण त्यानंतर नवरीच्या वडिलांनी जे केलं ते पाहून तुम्ही हैराण व्हाल. वडिलांचं हे कृत्य कॅमेऱ्यात कैद झालं, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आणि तो तुफान व्हायरल होतो आहे. हे वाचा - Wedding Fight : एकाच महिलेसोबत डान्स करण्यासाठी लग्नात 2 पुरुषांचा राडा; शेवटी काय झालं पाहा VIDEO व्हिडीओत पाहू शकता नवरी सासरी चालली आहे. तिला निरोप द्यायला तिची माहेरची मंडळी उभी आहेत. नवरी आपल्या वडिलांना घट्ट मिठी मारते आणि रडते. तिचे वडीलही भावुक होता. लेकीला घट्ट धरून तेसुद्धा ढसाढसा रडतात. त्यानंतर नवरी नवऱ्यासोबत जाण्यासाठी निघते. जशी ती फिरते, तसं वडील असं काही करतात ज्याचा आपण विचारही केला नसेल.
Emotional Dad 😂 pic.twitter.com/tYmCubQgtL
— Sabji Hunter (@SabjiHunter) July 21, 2022
तिचे वडील चक्क आनंदाने नाचताना दिसतात. अवघ्या काही क्षणापूर्वीच अश्रू ढाळणारे वडील अचानक उत्साहात असे नाचू लागले. मुलगी पुन्हा मागे फिरते तसं ते पुन्हा रडण्याचं नाटक करताना दिसतात. हे वाचा - VIDEO - हिंदी मीडियम दहावी पास, फाडफाड इंग्रजी बोलून विकतो चणे; हटके स्टाइल पाहून तुम्हीही फॅन व्हाल @SabjiHunter ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. लेकीच्या लग्नात वडिलांच्या अशा कृत्यामुळे सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलं आहे. काही युझर्सना वडिलांचा हा अंदाज आवडला आहे, काहींनी त्यांना ड्रामेबाज म्हटलं आहे. तर काहींनी आपल्या मुलीच्या लग्नात असं कोण करतं?, असंही विचारलं आहे. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटलं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.