मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Jan Dhan Account: 6 कोटी जन धन खाती झाली निष्क्रिय, यामध्ये तुमचं खातं देखील आहे का?

Jan Dhan Account: 6 कोटी जन धन खाती झाली निष्क्रिय, यामध्ये तुमचं खातं देखील आहे का?

Jan Dhan Account:केंद्र सरकारने मंगळवारी अशी माहिती दिली की पंतप्रधान जन धन योजनेअंतर्गत 5.82 कोटी खाती निष्क्रिय आहेत आणि यमध्ये महिलांच्या निष्क्रिय खात्यांची संख्या जवळपास 2.02 कोटी आहे.

Jan Dhan Account:केंद्र सरकारने मंगळवारी अशी माहिती दिली की पंतप्रधान जन धन योजनेअंतर्गत 5.82 कोटी खाती निष्क्रिय आहेत आणि यमध्ये महिलांच्या निष्क्रिय खात्यांची संख्या जवळपास 2.02 कोटी आहे.

Jan Dhan Account:केंद्र सरकारने मंगळवारी अशी माहिती दिली की पंतप्रधान जन धन योजनेअंतर्गत 5.82 कोटी खाती निष्क्रिय आहेत आणि यमध्ये महिलांच्या निष्क्रिय खात्यांची संख्या जवळपास 2.02 कोटी आहे.

    नवी दिल्ली, 12 ऑगस्ट: पंतप्रधान जन धन योजनेअंतर्गत  (Pradhan Mantri Jan Dhan Yojana PMJDY) कोट्यवधी जनतेनं बचत खाती उघडली आहेत. बँकिंग सुविधेपासून वंचित असणाऱ्यांना या योजनेचा विशेष फायदा झाला. या घटकासाठीच सरकारने ही योजना सुरू केली होती. केंद्र सरकारने मंगळवारी अशी माहिती दिली की पंतप्रधान जन धन योजनेअंतर्गत 5.82 कोटी खाती निष्क्रिय आहेत आणि यामध्ये महिलांच्या निष्क्रिय खात्यांची संख्या जवळपास 2.02 कोटी आहे. राज्यसभेत एका लेखी उत्तरात अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी अशी माहिती दिली की सार्वजनिक क्षेत्रातील बँकांद्वारे दिलेल्या सूचनेच्या आधारे 28 जुलै 2021 च्या स्थितीनुसार,  पंतप्रधान जन धन योजनेअंतर्गत  5.82 कोटी खाती निष्क्रिय आहेत. या निष्क्रिय खात्यांची टक्केवारी मार्च 2020 मध्ये 18.08 टक्के होती, जुलै 2021 पर्यंत त्यात घसरण होत टक्केवारी 14.02 टक्के आहे. हे वाचा-सोन्याचांदीच्या दरात जबरदस्त घसरण! सोनं रेकॉर्ड हायपेक्षा 10000 रुपयांनी स्वस्त कधी निष्क्रिय होतं खातं? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार, कोणत्याही खात्यात सातत्याने दोन वर्ष जर कोणता व्यवहार झाला नाही तर ते खात इन ऑपरेटिव्ह अर्थात निष्क्रिय होऊन जातं. अर्थात 5.82 कोटी खाती अशी आहेत की ज्यामध्ये गेल्या दोन वर्षात कोणताही व्यवहार झालेला नाही. ही चिंतेची  बाब आहे कारण सरकारच्या वेलफेअर स्कीम आणि ग्रामीण रोजगार गॅरंटीअंतर्गत याच खात्यांमध्ये पैसे पाठवले जातात. बचत खातं जन धन खात्यात बदला तुम्ही तुमचं बेसिक सेव्हिंग अकाउंट (Savings Account) देखील जन धन खात्यामध्ये ट्रान्सफर करू शकता. ज्यांच्याकडे Jan Dhan Account आहे त्यांना RuPay PMJDY कार्ड देण्यात येते. तुम्ही SBI मध्ये 28 ऑगस्ट 2018 पूर्वी जन धन खाते उघडले असेल तर तुम्हाला जारी करण्यात आलेल्या RuPay PMJDY कार्डवर 1 लाख रुपयांपर्यंतचा विमा मिळेल तर 28 ऑगस्ट 2018 नंतर जारी करण्यात आलेल्या रुपे कार्डावर 2 लाखांपर्यंतचा अॅक्सीडेंट कव्हर बेनिफिट मिळेल. हे वाचा-सामान्यांना दिलासा! सलग 25व्या दिवशीही नाही वाढले पेट्रोल-डिझेलचे दर आधार कार्ड तपशील देऊन निष्क्रिय खातं करा सक्रीय तुम्ही तुमच्या आधार कार्डावरील माहिती देऊन जन धन खातं सुरू करू शकता. जन धन खात्यात दोन वर्षात कोणताही व्यवहार झाला नाही तर ते बंद केलं जातं. खातं तुम्ही व्यवहार करून सक्रीय ठेवू शकता. 2014 मध्ये सुरू झाली होती योजना पंतप्रधान जन धन योजना (PM Jan Dhan Scheme) 2014 मध्ये सुरू झाली होती. पंतप्रधान जन धन योजनेअंतर्गत अनेक गरजू लोकांनी खाती उघडली आहेत. आर्थिकदृष्ट्या कमजोर असणाऱ्यांना आर्थिक सेवा, बचत खातं, क्रेडिट, विमा, पेन्शन यांसारख्या सेवांचा लाभ घेता यावा याकरता ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत कोणतीही व्यक्ती केवायसी प्रक्रिया पूर्ण करून ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष बँकेत जाऊन जन धन खातं उघडू शकतात. तुमच्या बचत खात्याचं रुपांतर देखील तुम्ही जन धन खात्यामध्ये करू शकता. यामध्ये बँकेकडून ग्राहकांना रुपे कार्ड दिलं जातं. हे डेबिट कार्ड अपघाती मृत्यू विमा, खरेदी संरक्षण कवच यासह अनेक फायद्यांसाठी वापरता येते.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Money, Pradhan mantri jan dhan yojana

    पुढील बातम्या