Home /News /money /

Gold Price Today: सोन्याचांदीच्या दरात जबरदस्त घसरण! सोनं रेकॉर्ड हायपेक्षा 10000 रुपयांनी स्वस्त

Gold Price Today: सोन्याचांदीच्या दरात जबरदस्त घसरण! सोनं रेकॉर्ड हायपेक्षा 10000 रुपयांनी स्वस्त

Gold Price Today: यावर्षी ऑगस्टमध्ये सोन्याचे दर गेल्या 4 महिन्यातील निचांकी पातळीवर आहेत. सातत्याने सोन्यामध्ये घसरण पाहायला मिळते आहे.

    नवी दिल्ली, 12 ऑगस्ट: यावर्षी ऑगस्टमध्ये सोन्याचे दर गेल्या 4 महिन्यातील निचांकी पातळीवर आहेत. सातत्याने सोन्यामध्ये घसरण पाहायला मिळते आहे. या आठवड्यामध्ये सलग घसरण होत आहे. सोन्याची वायदे किंमत (Gold Price Today) तीन ट्रेडिंग सेशनमध्ये जवळपास 1.3 टक्के तर चांदीची किंमत (Silver Price Today) 1.5 टक्क्यांनी कमी झाली आहे. गुरुवारी 12 ऑगस्ट रोजी (Gold price on 12 August) मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) ऑक्टोबरच्या डिलिव्हरीच्या सोन्याचे दर सकाळी 9.30 वाजता 0.12 टक्क्यांनी कमी झाले आहेत. यानंतर सोन्याचे दर 46,334 रुपये प्रति तोळावर ट्रेड करत आहेत. दरम्यान सप्टेंबरच्या डिलिव्हरीसाठी चांदीची वायदे किंमत 0.36 टक्क्यांनी कमी झाली आहे. या घसरणीनंतर चांदीचे दर 62,544 रुपये प्रति किलो आहेत. सोन्याचे दर गेल्यावर्षीच्या ऑल टाइम हायपेक्षा अद्यापही 10000 रुपयांनी कमी आहेत. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये सोन्याचे दर 56200 रुपये प्रति तोळाच्या स्तरावर पोहोचले होते. आणि आता  सोन्याचे दर जवळपास 46,334 रुपये प्रति तोळा आहेत. गुंतवणुकदारांसाठी सुवर्णसंधी गुड रिटर्न्स वेबसाइटच्या एका अहवालानुसार, सोन्याच्या किंमतीत आलेली घसरण खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी आहे आणि गुंतवणुकदारांना त्यांचे पैसे होल्ड करण्याची संधी मिळते आहे. भारतात आज सोन्याचे दर कमी झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र दर स्थिर आहेत. रॉयटर्सच्या अहवालानुसार, सोन्याचे दर 1,750.34 डॉलर प्रति औंस आहेत. तर अमेरिकेत सोन्याची वायदे किंमत 1,753.40 डॉलरवर आहे. हे वाचा-PM Modi आज करणार 1625 कोटी रुपयांचे वाटप, वाचा कुणाला मिळणार फायदा? काय आहे तज्ज्ञांचा सल्ला? तज्ज्ञांच्या मते, दीर्घ कालावधीसाठी सोन्याबाबत दृष्टीकोन पॉझिटिव्ह आहे आणि किंमती कमी झाल्यावर यामध्ये खरेदी केली पाहिजे. दरम्यान काही कारणांमुळे सोन्यात तेजी येऊ शकते. अमेरिका आणि चीनमधल्या वाढत्या कोरोना संक्रमणामुळे ग्लोबल इकॉनॉमीच्या रिकव्हरीबाबत चिंता आहे. अनेक देशात इक्विटी इंडेक्स रेकॉर्ड हाय लेव्हलच्या जवळपास आहे. यामुळे गुंतवणूकदारांचा सोन्याकडे कल वाढू शकतो. महागाईविरोधात हेजिंगसाठी देखील सोन्याची खरेदी होऊ शकते. महत्त्वाच्या शहरातील सोन्याचे भाव >> चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 43,720 रुपये प्रति तोळा आहे >> मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 45,280 रुपये प्रति तोळा आहे >> दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 45,500 रुपये प्रति तोळा आहे >> कोलकातामध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 45,700 रुपये प्रति तोळा आहे >>बंगळुरूमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 43,350 रुपये प्रति तोळा आहे हे वाचा- पोस्टाच्या 8 योजनांमध्ये पैसे होतील डबल! कोणत्या स्कीमसाठी किती लागेल कालावधी? >> हैदराबादमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 43,350 रुपये प्रति तोळा आहे >> केरळमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 43,350 रुपये प्रति तोळा आहे >> पुण्यामध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 44,440 रुपये प्रति तोळा आहे >> जयपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 45,300 रुपये प्रति तोळा आहे >> उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये कॅरेट सोन्याचा भाव 45,500 रुपये प्रति तोळा आहे >> पाटणामध्ये में 22 कॅरेट सोन्याचा भाव 44,440 रुपये प्रति तोळा आहे >> नागपुरमध्ये कॅरेट सोन्याचा भाव 45,280 रुपये प्रति तोळा आहे (हे दर गुड रिटर्न वेबसाइटनुसार आहेत)
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today, Silver, Silver prices today

    पुढील बातम्या