मराठी बातम्या /बातम्या /मनी /

सणासुदीच्या काळात या 10 बँका देताहेत स्वस्त गृहकर्ज, जाणून घ्या किती असेल EMI?

सणासुदीच्या काळात या 10 बँका देताहेत स्वस्त गृहकर्ज, जाणून घ्या किती असेल EMI?

आपली काही बचत आणि बँकेकडून मिळणारं गृहकर्ज यामुळे घराचं स्वप्न सर्वसामान्यांच्या आवाक्यात येऊ शकतं.

आपली काही बचत आणि बँकेकडून मिळणारं गृहकर्ज यामुळे घराचं स्वप्न सर्वसामान्यांच्या आवाक्यात येऊ शकतं.

आपली काही बचत आणि बँकेकडून मिळणारं गृहकर्ज यामुळे घराचं स्वप्न सर्वसामान्यांच्या आवाक्यात येऊ शकतं.

नवी दिल्ली, 09 ऑक्टोबर: आता घरांच्या किंमती इतक्या वाढल्या आहेत, की घर (Home) घेणं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे; मात्र आपलं स्वतःचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. त्यामुळे तो आपली जमापुंजी घरात गुंतवत असतो. आपली काही बचत आणि बँकेकडून मिळणारं गृहकर्ज यामुळे घराचं स्वप्न सर्वसामान्यांच्या आवाक्यात येऊ शकतं. या सणासुदीच्या काळात तुम्हीही घर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर एक चांगली संधी आहे. सध्या अनेक बँका, गृहनिर्माण वित्त कंपन्यांनी गृह कर्जाचा व्याजदर (Home loan interest rate) कमी केला आहे. बँक ऑफ बडोदा ( Bank of Baroda), स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), येस बँक (Yes Bank), पंजाब नॅशनल बँक (PNB), बँक ऑफ बडोदा (BOB), कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank), एचडीएफसी बँक (HDFC) आणि एलआयसी हाउसिंग फायनान्स (LIC Housing Finance) सर्वांत स्वस्त गृहकर्ज देत आहेत. 1. बँक ऑफ बडोदा सार्वजनिक क्षेत्रातल्या बँक ऑफ बडोदाने (BOB) आपल्या गृहकर्जाचा व्याजदर 0.25 टक्क्यांनी कमी करून 6.50 टक्क्यांवर आणला आहे. 31 डिसेंबर 2021 पर्यंत ग्राहकांना या नवीन दरांचा लाभ मिळेल. हे नवीन दर गृहकर्जासाठी अर्ज करणाऱ्या सर्व ग्राहकांना उपलब्ध असतील. बँकेने गृहकर्जावरील प्रक्रिया शुल्क आधीच माफ केलं आहे. ही सवलत 31 डिसेंबर 2021 पर्यंत लागू राहील. 2. कॅनरा बँक सार्वजनिक क्षेत्रातल्या कॅनरा बँकेने एक वर्षाचा एमसीएलआर दर 0.10 टक्क्यांनी कमी करून 7.25 टक्के केला आहे. नवीन दर 7 ऑक्टोबरपासून लागू झाले आहेत. कॅनरा बँकेने याआधी एमसीएलआरमध्ये (MCLR) 0.15 टक्क्यांपर्यंत कपात करण्याची घोषणा केली होती. बँकेने एक दिवसासाठी आणि एक महिन्यासाठी एमसीएलआर 0.15 टक्क्यांवरून 6.55 टक्के केला आहे. 3. डीसीबी डीसीबी (DCB) बँकेने 6 ऑक्टोबरपासून MCLR दरात 0.05 टक्के कपात केली आहे. हेही वाचा-  Aryan Khanच्या अटकेनंतर शाहरुख खानचं कोट्यवधींचं नुकसान, या कंपनीने थांबवल्या सर्व जाहिराती
4. येस बँक
सणासुदीचा काळ लक्षात घेऊन येस बँकेने होम लोन ग्राहकांसाठी खास ऑफर दिली आहे. मर्यादित कालावधीसाठी सुरू करण्यात आलेल्या या ऑफरमध्ये बँक फक्त 6.7 टक्के दराने गृहकर्ज देत आहे. 5. एलआयसी हाउसिंग फायनान्स एलआयसी हाउसिंग फायनान्सने 2 कोटी रुपयांपर्यंतच्या गृहकर्जासाठी व्याजदर 6.66 टक्क्यांवर आणला आहे. यापूर्वी जुलै महिन्यात कंपनीने 50 लाख रुपयांपर्यंतच्या गृहकर्जाचा दर 6.66 टक्के केला होता. आता हा दर 2 कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जाला लागू असेल. ही सवलत 22 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत घेतलेल्या गृहकर्जावर लागू राहील. हेही वाचा- मोदी सरकार या योजनेअंतर्गत मुलींना देतंय 2000 रुपये? वाचा सविस्तर माहिती
 6. एचडीएफसी
एचडीएफसी या गृहनिर्माण वित्त कंपनीने गृहकर्जाचा दर कमी करून 6.70 टक्क्यांवर आणला आहे. हा व्याजदर 20 सप्टेंबर 2021 पासून लागू झाला आहे. ही विशेष योजना 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत उपलब्ध असेल. 7. पंजाब नॅशनल बँक पंजाब नॅशनल बँकेने (PNB) 50 लाख रुपयांवरच्या गृहकर्जाचा व्याज दर 0.50 टक्क्यांनी कमी करून 6.60 टक्के केला आहे. या रकमेपेक्षा कमी गृहकर्जावर आधीच 6.60 टक्के दर लागू आहे. 8. कोटक बँक कोटक बँकेने गृहकर्जाचे दर 6.50 टक्क्यांपर्यंत कमी केले आहेत. सणासुदीचा काळ लक्षात घेऊन बँकेची ही सवलत 60 दिवस सुरू राहणार आहे. हेही वाचा-  नोकरीची चिंता सोडून AMUL सह सुरू करा स्वत:चा व्यवसाय, महिन्याला होईल 5 लाखांची कमाई
 9. एसबीआय
देशातली सर्वांत मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) गृहकर्ज ग्राहकांसाठी उत्सव ऑफर सुरू केल्या आहेत. एसबीआयने गृहकर्जावरचे व्याजदर कमी केले आहेत. यासह केवळ 6.70 टक्के दराने क्रेडिट स्कोअर लिंक्ड होम लोन देण्याची ऑफर दिली आहे. कर्जाची रक्कम कितीही असली तरी आता कर्जदारांना किमान 6.70 टक्के दराने गृहकर्ज घेता येईल. 10. कोटक महिंद्रा बँक खासगी क्षेत्रातल्या कोटक महिंद्रा बँकेने गृह कर्जाचा व्याजदर 0.15 टक्के कमी केला आहे. त्यामुळे बँकेचा व्याजदर आता 6.65 टक्क्यांवरून 6.50 टक्के झाला आहे. हे नवीन दर 8 नोव्हेंबर 2021 पर्यंत लागू असतील. सध्या सर्वच बँकांचे हे गृहकर्जाचे व्याजदर गेल्या 10 वर्षांतले सर्वांत कमी आहेत. त्यामुळे घर घेणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधीच असेल. सणासुदीनंतर हे दर थोडे वाढण्याची शक्यता आहे.
First published:

Tags: Home Loan

पुढील बातम्या