• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • मोदी सरकार या योजनेअंतर्गत मुलींना देतंय 2000 रुपये? वाचा सविस्तर माहिती

मोदी सरकार या योजनेअंतर्गत मुलींना देतंय 2000 रुपये? वाचा सविस्तर माहिती

सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत (Viral SMS on Social Media) आहे. ज्यामध्ये दावा केला जात आहे की सरकार 'प्रधानमंत्री कन्या आशीर्वाद योजने'अंतर्गत (Pradhan Mantri Kanya Ashirwad Yojana) मुलींना दरमहा 2000 रुपये देत आहे.

 • Share this:
  मुंबई, 09 ऑक्टोबर: केंद्र सरकारकडून मुलींसाठी (Central Government Schemes for Girls) विविध योजना राबवल्या जात आहेत. मुलींच्या जन्मापासून ते त्यांचे शिक्षण आणि लग्नापर्यंत सरकार विविध योजनांद्वारे मदत करते. आता काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत (Viral on Social Media) आहे. ज्यामध्ये दावा केला जात आहे की सरकार 'प्रधानमंत्री कन्या आशीर्वाद योजने'अंतर्गत  (Pradhan Mantri Kanya Ashirwad Yojana) दरमहा 2000 रुपये देत आहे. जाणून घ्या काय आहे या मेसेजमागील सत्य काय आहे व्हायरल मेसेज? व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये असा दावा केला जात आहे की, 'प्रधानमंत्री कन्या आशीर्वाद योजना' या स्कीमअंतर्गत, केंद्र सरकारकडून आर्थिक मदत म्हणून 2000 रुपये रक्कम दिली जाईल. आज पुन्हा कडाडले इंधनाचे दर, मुंबईत पेट्रोल 110 रुपयांवर तर डिझेलही शंभरीपार युट्यूब चॅनेलवरआहे ही व्हायरल पोस्ट एका यूट्यूब चॅनेलवर याबाबत व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता ज्यात 'प्रधानमंत्री कन्या आशीर्वाद योजने'बाबत अनेक दावे करण्यात आले आहेत. या चॅनेलमध्ये, एक व्यक्ती असा दावा करते की 'प्रधानमंत्री कन्या आशीर्वाद योजने'अंतर्गत कोणत्याही सरकारी बँकेत खाते उघडल्यावर केंद्र सरकार दरमहा 2000 रुपये त्या खात्यात हस्तांतरित करेल. सरकारने फेटाळला दावा दरम्यान अशाप्रकारे कोणतीही योजना नसल्याचे केंद्र सरकारच्या प्रेस इन्फरमेशन ब्युरो या संस्थेच्या फॅक्ट चेक (PIB Fact Check) टीमने स्पष्ट केले आहे. त्यांनी हा दावा फेटाळला आहे. हा मेसेज पूर्णपणे बनावट असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. Air India Sale:टाटांसमोर मोठं आव्हान, 4विमानसेवांचं शेड्यूलिंग सांभाळण्याची कसरत तुम्हीही करू शकता फॅक्टचेक जर तुम्हाला कोणत्याही सरकारी योजना किंवा धोरणांबाबतच्या सत्यतेबद्दल संशय असल्यास, तुम्ही पीआयबी फॅक्ट चेककडे ते पाठवू शकता. विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तसंच मेलद्वारेही पीआयबी फॅक्ट चेकशी संपर्क करू शकता. व्हॉट्सअपवर 8799711259 या क्रमांकावर संपर्क करता येईल. त्याशिवाय ट्वीटर @PIBFactCheck, फेसबुकवर PIBFactCheck आणि pibfactcheck@gmail.com ईमेलद्वारे संपर्क करू शकता.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: