मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Aryan Khanच्या अटकेनंतर शाहरुख खानचं कोट्यवधींचं नुकसान, या कंपनीने थांबवल्या सर्व जाहिराती

Aryan Khanच्या अटकेनंतर शाहरुख खानचं कोट्यवधींचं नुकसान, या कंपनीने थांबवल्या सर्व जाहिराती

Aryan Khan Arrest: क्रूज पार्टी ड्रग्ज प्रकरणात स्वत:च्या मुलाला अटक होण्याबरोबरच शाहरुखला आणखी एक मोठा झटका बसला आहे. देशातील सर्वात मोठी एडटेक स्टार्ट-अप कंपनी बायजूस (Byju’s) शाहरुख खानला दिलेल्या सर्व जाहिराती बंद केल्या आहेत.

पुढे वाचा ...
    मुंबई, 09 ऑक्टोबर: अभिनेता शाहरुख खानचा मुलगा (Shah Rukh Khan Sons Arrest) आर्यन खान याच्या अटकेनंतर (Aryan Khan Drug Case) आतापर्यंत या प्रकरणात विविध अपडेट्स समोर आले आहेत. दरम्यान क्रूज पार्टी ड्रग्ज प्रकरणात स्वत:च्या मुलाला अटक होण्याबरोबरच शाहरुखला आणखी एक मोठा झटका बसला आहे. देशातील सर्वात मोठी एडटेक स्टार्ट-अप कंपनी बायजूस (Byju’s Pause Shah Rukh Khans Ads) शाहरुख खानला दिलेल्या सर्व जाहिराती बंद केल्या आहेत. शाहरुख खान 2017 पासून बायजूसचा ब्रँड अॅम्बेसिडर आहे. मीडिया रिपोर्टनुसार, बायजूसने आगाऊ बुकिंग असूनही त्यांच्या सर्व जाहिराती बंद केल्या आहेत. किंग खानच्या स्पॉन्सरशिप डील्समध्ये बायजूस हा सर्वात मोठा ब्रँड होता. याशिवाय शाहरुख खानकडे हुंदाई, रिलायन्स जिओ, एलजी, दुबई टुरिझमसारख्या कंपन्यांच्या जाहिराती आहेत. अहवालांनुसार, बायजूस किंग खानला ब्रँडचे प्रमोट करण्यासाठी वर्षाला 3-4 कोटी रुपये देते. Aryan Khan Case: NCB चा प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याच्या घरावर छापा, आढळले अमली.. आर्थर रोड जेलमध्ये आर्यन आर्यन खानसह अन्य आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आर्यन खान सध्या आर्थर रोड तुरुंगात आहे. आर्यनसह या प्रकरणात अटक केलेल्या 5 आरोपींना देखील तुरुंगात पाठवण्यात आले आहे. तर मुनमुन धमेचा सहित दोन महिला आरोपींची रवानगी भायखळा जेलमध्ये करण्यात आली आहे. एनसीबीच्या माहितीनुसार, आर्यन खानने एनसीबी अधिकाऱ्यांसमोर कबूल केले आहे की तो चरसचं सेवन करतो. त्याचा मित्र अरबाज मर्चंट त्याच्या शूजमध्ये 6 ग्रॅम चरस लपवून लक्झरी क्रूझवर गेला होता. जेणेकरून त्यांना क्रूझवर धमाकेदार पार्टी करता येईल. NCB चा पंचनामा, आर्यन खाननं ड्रग्स घेतले होते का? मिळालं उत्तर यापूर्वीदेखील आर्यनचा जामीन अर्ज किल्ला कोर्टानं दोनदा फेटाळला आहे. परिणामी मुलाची परिस्थिती पाहता त्याची आई गौरी खान (Aryan Khan's mother Gauri Khan) हिला स्वत:ला सांभाळणं कठीण झालं आहे. शुक्रवारी गौरीच्या वाढदिवशी तिचा रडतानाचाही व्हिडीओ समोर आला होता. इम्तियाज खत्रीच्या घरावर छापा प्रोड्युसर इम्तियाज खत्री याच्या घरावर एनसीबीनं छापा टाकला आहे. NCBने मुंबईतील बांद्रा येथे छापा मारला आहे. दरम्यान इम्तियाज खत्री या प्रोड्युसरला ताब्यात घेतलं आहे. त्याच्याकडे काही प्रमाणात ड्रग्स आढळून आले आहेत. रात्रीपासून NCB ही कारवाई करत होती . क्रूझ पार्टीत इम्तियाज खत्रीने हे ड्रग्स पुरवल्याचं म्हटलं जात आहे. कारण तो अटक केलेल्या एका आरोपीच्या संपर्कात होता. त्याच्याशी व्हॉट्सऍप चॅट करत असल्याचंही आढळून आलं आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Shah Rukh Khan

    पुढील बातम्या