नवी दिल्ली, 9 नोव्हेंबर : फेसबुकची मूळ कंपनी मेटा आजपासून कर्मचाऱ्यांसाठी धोक्याची घंटा सुरू होत आहे. आज, बुधवारपासून, मेटा प्लॅटफॉर्म इंक मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात कपात सुरू करणार आहे. यासंबंधित जाणकारांचे म्हणणे आहे की, कंपनीच्या निराशाजनक निकाल आणि खर्चात कपात करण्याच्या योजनेचा भाग म्हणून हे घडत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्या कर्मचाऱ्यांना याचा फटका बसणार आहे, त्यांना बुधवारपासून याबाबतची माहिती देण्यात येणार आहे. या प्रकरणाची माहिती असलेल्या लोकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मार्क झुकरबर्ग यांनी मंगळवारी अधिकाऱ्यांना कर्मचारी कपातीसाठी तयार राहण्यास सांगितले. वॉल स्ट्रीट जर्नलने वृत्त दिलेले असे की, अधिकार्यांसह कॉलवर, झुकेरबर्गने सांगितले की कंपनीच्या "चुकीसाठी" त्यांना जबाबदार धरण्यात आले आहे.
सप्टेंबरमध्ये दिले होते संकेत -
झुकेरबर्गने सप्टेंबरच्या अखेरीस कर्मचाऱ्यांना चेतावनी दिली की, खर्च कमी करण्याचा आणि टीमची पुनर्रचना करण्याचा मेटाचा हेतू आहे. मेटा, फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप सारख्या अॅप्सचा पोर्टफोलिओ असलेली कंपनी मेटाने सांगितले होते की, नवीन नियुक्ती थांबविली जात आहे आणि 2023 मध्ये कंपनी आताच्या (2022) पेक्षा लहान असेल.
हेही वाचा - NEFT आणि IMPS मध्ये फरक काय? कोणता पर्याय सर्वांत चांगला
ट्विटरप्रमाणे नाही होणार कपात -
Meta द्वारे टाळेबंदी आजपासून सुरू होत आहे, तर ट्विटर इंकमधील 50 टक्के कर्मचाऱ्यांना आतापर्यंत घरी पाठवण्यात आले आहे. ट्विटरमध्ये अचानक कर्मचारी कपात झाली. तर मेटा तसे करणार नाही. ट्विटरवर काम करणाऱ्या लोकांच्या म्हणण्यानुसार, त्यांना यापूर्वी याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. अचानक त्यांचे ईमेल आणि स्लॅक (मेसेजिंग अॅप) अधिकार काढून घेण्यात आले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Business News, Facebook, Instagram, Job, Unemployment