जाहिरात
मराठी बातम्या / मनी / NEFT आणि IMPS मध्ये फरक काय? कोणता पर्याय सर्वांत चांगला

NEFT आणि IMPS मध्ये फरक काय? कोणता पर्याय सर्वांत चांगला

NEFT आणि IMPS मध्ये फरक काय? कोणता पर्याय सर्वांत चांगला

NEFT किंवा IMPS हा पर्याय वापरतात. या दोन्हींमध्ये फरक काय आणि कोणता पर्याय सर्वांत चांगला आहे, त्याबद्दल जाणून घेऊयात.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई : पैशांशी संबंधित व्यवहार ऑनलाइन करण्याचं प्रमाण खूप वाढलंय. पैसे ट्रान्सफर करायचे असतील, बिल भरायचं असेल तर ते घरबसल्या करता येतं. बँकेचे बऱ्यापैकी व्यवहार ऑनलाइन करता येतात, पण ऑनलाइन बँकिंगला काही मर्यादा आहेत. त्यामुळे बँकेने घालून दिलेल्या लिमिटपेक्षा जास्त रक्कम आपण ऑनलाइन ट्रान्सफर करू शकत नाही. त्यासाठी NEFT किंवा IMPS हा पर्याय वापरतात. या दोन्हींमध्ये फरक काय आणि कोणता पर्याय सर्वांत चांगला आहे, त्याबद्दल जाणून घेऊयात. NEFT म्हणजे काय? NEFT म्हणजेच नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर हे ऑनलाइन पेमेंटचं एक साधन आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2005 पासून भारतीय ग्राहकांना हे साधन उपलब्ध करुन दिली आहे. हे ग्राहकाला देशात कुठेही थेट वन-टू-वन पेमेंट करण्याची सुविधा देतं. याचा वापर करून, तुम्ही एनईएफटी सुविधा असलेल्या इतर कोणत्याही व्यक्तीला पैसे पाठवू शकता. तसंच तुमचं बँक खातं नसेल तर तुम्ही जवळच्या एखाद्या बँकेच्या शाखेत जाऊन तिथं रोख पैसे भरु शकता आणि ते पैसे मग तुम्ही सांगितलेल्या खात्यात NEFTच्या माध्यमातून ऑनलाइन जमा होतील. तुमचं खातं नसेल तर तुम्ही कमाल 50 हजार रुपये ट्रान्सफर करू शकता. IMPS म्हणजे काय? IMPS म्हणजे इमिडिएट पेमेंट सर्व्हिस होय. आयएमपीएस ही पैसे ट्रान्सफर करण्याची सर्वांत सोपी प्रक्रिया मानली जाते. IMPS द्वारे पैसे कधीही, कुठेही आणि त्वरित ट्रान्सफर करता येतात. हे RTGS प्रमाणेच कार्य करते. ही सुविधा वर्षाचे 365 दिवस सुरू असते. तुम्हाला लवकरातलवकर पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर त्यासाठी IMPS च्या माध्यमातून करता येतात. तुम्ही मोबाईल बँकिंग, एसएमएस, नेट बँकिंग किंवा एटीएम अशा अनेक माध्यमांद्वारे IMPS अॅक्सेस करू शकता. तसेच तुम्ही मोबाईल नंबर आणि MMID किंवा अकाउंट नंबर आणि IFSC कोड वापरून पैसे पाठवू शकता.

    बँक ऑफ महाराष्ट्रचे हे सिक्रेट डेबिट कार्ड माहिती आहेत का?

    NEFT व IMPSमध्ये फरक काय? NEFT सेवेचा लाभ घेण्यापूर्वी तुम्हाला लाभार्थी खातेदारांबद्दलची माहिती ऑनलाइन का असेना, रजिस्टर करावी लागते. NEFTच्या नोंदणीसाठी खातेदाराचा खाते क्रमांक, बँकेचा IFSC कोड अशी माहिती ऑनलाइन अर्जात द्यावी लागते, त्याची पडताळणी झाल्यावर तुमचा अर्ज स्वीकारला जातो आणि मग व्यवहार पूर्ण होतो. दुसरीकडे IMPS सेवा मोबाईलवर अॅपच्या सहाय्याने बँकिंग व्यवहार करणाऱ्यांसाठी बनवली आहे. IMPSच्या नोंदणीसाठी मोबाईल मनी आयडेंटिफायर क्रमांक लागतो. हा सात अंकी क्रमांक बँक नोंदणी करताना देते. यावरून तुम्ही लगेचच पैसे ट्रान्सफर करू शकता.

    बँक ऑफ महाराष्ट्रने ग्राहकांसाठी आणलीय ‘महा कॉम्बो लोन स्कीम’

    कोणती सुविधा जास्त चांगली? NEFT मध्ये तुम्हाला लाभार्थी माहिती असावा लागतो, तसंच अर्ज करण्याची प्रक्रिया थोडी मोठी असते, त्या तुलनेत IMPS सेवा मोबाईलवर अॅपच्या सहाय्याने पूर्ण करता येते. त्यामुळे तुलनेने IMPS सेवा जास्त लोकप्रिय आहे. दोन्ही सेवांसाठी बँका शुल्क आणि जीएसटी आकारतात. त्या शुल्काची रक्कम ही पाठवलेले पैसे, बँक खात्याचा प्रकार आणि बँकेचे नियम यानुसार बदलतात. त्या शुल्कावर जीएसटी लागू होतो.

    News18लोकमत
    News18लोकमत

    दोघांची वैशिष्ट्यं वेगवेगळी आहेत, त्यामुळे तुम्ही पैसे ट्रान्सफर करताना तुमच्यासाठी कोणता पर्याय जास्त सोईचा आहे, ते बघून निर्णय घ्यायला हवा.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात