चेक क्लिअर होण्यासाठी फार पाहावी लागणार नाही वाट, लवकरच मिळणार ही सुविधा

चेक क्लिअर होण्यासाठी फार पाहावी लागणार नाही वाट, लवकरच मिळणार ही सुविधा

रिझर्व्ह बँकेने सप्टेंबर 2020 पर्यंत चेक ट्रँझॅक्शन सिस्टीम (CTS)लागू करण्याची घोषणा केली आहे. यामुळे अत्यंत कमी वेळेत तुमचा चेक क्लिअर होईल.

  • Share this:

मुंबई, 6 फेब्रुवारी : रिझर्व्ह बँकेने सप्टेंबर 2020 पर्यंत चेक ट्रँझॅक्शन सिस्टीम (CTS)लागू करण्याची घोषणा केली आहे. यामुळे अत्यंत कमी वेळेत तुमचा चेक क्लिअर होईल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)पूर्ण देशभरात या यंत्रणेमध्ये बदल करणार आहे. या यंत्रणेनुसार,संबंधित बँकांना चेकची प्रत्यक्ष कॉपी पाठवण्याशिवाय इलेक्ट्रॉनिक स्वरूपात त्याचा फोटो पाठवला जातो. ही व्यवस्था RBI ने 2010 मध्ये सुरू केली होती. सध्या ही सुविधा काही मोठ्या शहरांमध्येच आहे. सध्या ही यंत्रणा चांगल्या पद्धतीने काम करतेय. त्यामुळे ही CTS प्रणाली सप्टेंबर 2020 पासून लागू होईल.

चेक केला जाईल स्कॅन

या प्रणालीमध्ये चेकचा फोटो इलेक्ट्रॉनिक स्वरूपात संबंधित बँकेला पाठवला जातो. यामध्ये चेक क्लिअर होण्यासाठी कमी वेळ लागतो. भारतात डिजिटल व्यवहार वेगाने वाढतायत. त्यामुळे ही प्रक्रिया सुरळित होईल. रिझर्व्ह बँक नियमितपणे डिजिटल व्यवहारांबद्दलचा अहवाल तयार करेल. यामुळे देशभरात डिजिटल व्यवहार किती सुरळित होतात याची माहिती मिळू शकेल.

डिजिटल व्यवहारांमुळे ग्राहकांच्या हक्कांचं संरक्षण होईल आणि पैशाच्या देवाणघेवाणीत पारदर्शकता येईल. याबद्दलची रुपरेखा एप्रिल 2020 पर्यंत तयार होईल आणि सप्टेंबरपासून ही प्रणाली अस्तित्वात येऊ शकेल.

(हेही वाचा : अजब गोलमाल! ज्या हॉटेलच्या लॉबीमध्ये बसला त्यालाच 165 कोटींना विकण्याचा रचला कट)

रिझर्व्ह बँकेचा आणखी एक निर्णय

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI ) रेपो रेटमध्ये कोणतीही कपात केलेली नाही. त्यामुळे होमलोनमध्ये दिलासा मिळाला नाही. त्याचबरोबर याचा बँकांमधल्या फिक्स डिपॉझिटवरही परिणाम होणार आहे.सध्याचा रेपो रेट 5.15 टक्के इतका आहे. आता हाच रेपो रेट पुढे कायम राहणार आहे. तसंच, रिव्हर्स रेपो रेट 4.90 टक्क्यांवर कायम असणार आहे. सलग दुसऱ्यांदा रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात न केल्याने सर्वसामान्यांना मोठा धक्का बसला आहे.

याआधी 5 वेळा कपात

RBI ने याआधी सलग 5 वेळा व्याजदरात कपात केली होती. डिसेंबर 2019 मध्ये मात्र व्याजदरात बदल करण्यात आले नव्हते. त्यानंतर SBI ने ठराविक काळासाठी FD वरचे व्याजदर 15 बेसिक पॉइंटने कमी केले. 10 जानेवारी 2020 पासून SBI च्या एक वर्षाच्या एफडीवरचे व्याजदर 6.10 टक्के आहे. नोव्हेंबर 2029 मध्ये हे व्याजदर 6. 25 टक्के होते. त्याचवेळी ज्येष्ठ नागरिकांसाठी एफडीवर 6.60 टक्के व्याजदर आहे.

================================================================================

First published: February 6, 2020, 9:23 PM IST
Tags: moneyrbi

ताज्या बातम्या