Home /News /money /

सावधान! या बँकेच्या नावे नोकरी देण्याच्या बहाण्याने दिला जातोय धोका, ग्राहकांना पाठवला अलर्ट

सावधान! या बँकेच्या नावे नोकरी देण्याच्या बहाण्याने दिला जातोय धोका, ग्राहकांना पाठवला अलर्ट

IDBI Bank customer's Alert: नोकरीच्या आमिषांना बळी पडण्याच्या घटना वारंवार घडत असतात. आता IDBI बँकेच्या नावाखाली ही फसवणूक केली जात आहे. या संदर्भात बँकेने त्यांच्या ग्राहकांना अलर्ट पाठवला आहे.

    नवी दिल्ली, 22 मार्च: नोकरीच्या आमिषांना (Fake Job Offer) बळी पडण्याच्या घटना वारंवार घडत असतात. आता आयडीबीआय बँकेच्या (IDBI Bank) नावाखाली ही फसवणूक (Job Fraud) केली जात आहे. या संदर्भात बँकेने त्यांच्या ग्राहकांना अलर्ट (IDBI Bank's Alert) पाठवला आहे. बँकेने ग्राहकांना याबाबात सावधान केले आहे की, त्यांनी नियुक्ती किंवा लोकांकडून पैसे घेण्यासाठी कोणत्याही एजन्सीकडून सेवा सुरू केली नाही आहे. याबाबत बँकेने एक ट्वीट जारी करत माहिती दिली आहे. आयडीबीआय बँकेने या ट्वीटमध्ये असं म्हटलं आहे की फसवणूक करणारी लोकं/ नियुक्ती करणाऱ्या एजन्सी आयडीबीआयच्या नावाने बनावट नियुक्ती पत्र जारी करून नोकऱ्या देत आहेत. आयडीबीआय बँक ही एलआयसीच्या नियंत्रणातील बँक आहे. आयडीबीआय बँकेची स्थापना 1964 मध्ये करण्यात आली होती. आयडीबीआयचे नियंत्रण एलआयसीच्या (LIC) हातात आहे. बँकेने केलं असं आवाहन बँकेने ग्राहकांना असा सल्ला दिला आहे की, अशाप्रकारे फसवणूक करणारी लोकं किंवा एजन्सींपासून सावध राहा. बँकेच्या माहितीनुसार त्यांच्याकडे नियुक्ती करण्यात येणार असेल तर त्याची अधिसुचना त्यांची वेबसाइट www.idbibank.in वर दिली जाते. (हे वाचा-दिलासादायक बातमी! होळीपूर्वी खाद्यतेलाच्या किमतीत होणार घट, वाचा किती होणार फरक) अनेक ग्राहकांनी केल्या आहेत तक्रारी आयडीबीआय बँकेच्या ग्राहकांना काही अनोळखी व्यक्तींनी फोन करून स्वत:ची आयडीबीआयशी संबंधिक एजन्सीचा कर्मचारी अशी ओळख करून दिली. त्यावेळी ग्राहकांना समोरच्या व्यक्तीकडून नोकरीची ऑफर देखील देण्यात आली. याबाबत माहिती मिळताच बँकेने ट्वीट करत या नोकरीबाबतच्या दाव्यांचं खंडन केलं आहे. तसंच या बनावट लोकांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Bank, Fake, Fake news, Financial fraud, Job, Job alert, Money fraud, Security alert

    पुढील बातम्या