नवी दिल्ली, 18 सप्टेंबर: केंद्र सरकारच्या विविध योजनांसंदर्भात (Central Government Scheme) सोशल मीडियावर अनेक अफवा पसरत असतात. सध्या देखील एक मेसेज अशाचप्रमारे व्हायरल होत आहे. ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, मोदी सरकार (Modi Government) देशातील सर्व महिलांच्या खात्यामध्ये 1,24,000 रुपये जमा करत आहे. मेसेजमध्ये असा दावा केला जात आहे की, सरकार सर्व महिलांच्या खात्यामध्ये ‘स्त्री स्वाभिमान योजने’अंतर्गत हे पैसे ट्रान्सफर करत आहे. या मेसेजच्या माध्यमातून नागरिकांकडे त्यांचे वैयक्तिक आणि बँक डिटेल्स देखील मागण्यात येत आहेत. PIB ने पडताळली सत्यता पीआयबी फॅक्ट चेकने (PIB Fact Check) या व्हायरल मेसेजमागची सत्यता पडताळून पाहिली आहे आणि त्यांनी असे स्पष्टीकरण दिले आहे की, हा मेसेज पूर्णपणे बनावट आहे. भारत सरकारची अशी कोणतीच योजना नाही आहे की ज्यानुसार महिलांच्या खात्यामध्ये 1,24,000 रुपये जमा केले जात आहेत. (हे वाचा- लक्ष्मी विलास बँकेपाठोपाठ महाराष्ट्रातील या बँकेवर RBI चे निर्बंध, वाचा सविस्तर ) पीआयबीने हा मेसेज पूर्णपणे खोटा असल्याचे म्हटले आहे शिवाय नागरिकांनी या अशा फसव्या मेसेजना फसून त्यांची वैयक्तिक किंवा बँकिंग माहिती शेअर न करण्याचे आवाहन पीआयबीने केले आहे. पीआयबीने त्यांच्या ट्विटर हँडलवरून एका युट्यूब व्हिडीओ (YouTube Video) चा स्कीनशॉट शेअर केला आहे.
दावा: एक #YouTube वीडियो में यह दावा किया जा रहा है कि केंद्र सरकार सभी महिलाओं के बैंक खातों में 'स्त्री स्वाभिमान योजना' के तहत 1 लाख 24 हज़ार रूपए की राशि जमा कर रही है। #PIBFactCheck: यह दावा फर्जी है। केंद्र सरकार द्वारा ऐसी कोई योजना नहीं चलाई जा रही है। pic.twitter.com/WxSdmPiNsm
— PIB Fact Check (@PIBFactCheck) November 17, 2020
अशाप्रकारे जर तुम्ही कुणाला बँकिंग डिटेल्स दिले तर तुमचे खाते रिकामे होण्याची भीती आहे. त्यामुळे सतर्क राहणे गरजेचे आहे. केंद्र सरकारकडून जर एखादी योजना अंमलात आणली जात असेल तर त्याबाबत संबंधित मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटवर माहिती दिलेली असते. त्यामुळे तुम्हाला एखाद्या योजनेबद्दल जाणून घ्यायचे असेल तर त्याबाबत योग्य माहिती या वेबसाइटवर मिळेल. कुठे अर्ज करावा, काय लाभ आहेत इ. सर्व माहिती तुम्हाला संबंधित वेबसाइटवर मिळेल. (हे वाचा- 42 कोटी ग्राहकांना SBI ने पाठवला अलर्ट! दुर्लक्ष केल्यास होईल मोठे नुकसान ) PIB Fact Check सरकारच्या पॉलिसी/स्कीम्स/विभाग/मंत्रालयं यासंदर्भातील चुकीच्या सूचनांचा लोकांमध्ये प्रसार होऊ नये याकरता काम करते. सरकारसंबंधित कोणतीही बातमी खरी आहे की खोटी हे जाणून घेण्यासाठी तुम्ही PIB Fact Check ची मदत घेऊ शकता. कोणतीही व्यक्ती PIB Fact Check ला संशयास्पद बातमीचा किंवा पोस्टचा स्क्रीनशॉट, ट्वीट, किंवा फेसबुक पोस्ट 918799711259 या WhatsApp क्रमांकावर पाठवू शकता. त्याचप्रमाणे pibfactcheck@gmail.com या मेल आयडीवर मेल करून देखील तुम्ही सविस्तर माहिती घेऊ शकता.