नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर: कोरोना काळात (Coronavirus) बँकिंग फ्रॉडची प्रकरणं मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक भामट्यांनी बँक ग्राहकांची फसवणूक केली आहे. अशाप्रकारे बँकिंग फ्रॉडपासून वाचण्यासाठी देशातील सर्वात मोठी बँक असणारी स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) त्याच्या ग्राहकांना नेहमी सावधान करत असते. मंगळवारी देखील एसबीआय (SBI) ने एक ट्वीट शेअर करत त्यांच्या ग्राहकांना अलर्ट पाठवला आहे. एसबीआयने यामध्ये फेक मेसेजबाबत भाष्य केले आहे.
एसबीआयने त्यांच्या कोट्यवधी ग्राहकांना वेळोवेळी असे अलर्ट पाठवले आहेत की, बँकेकडून कोणतेही मेसेज त्यांच्या ग्राहकांना पाठवले जात नाहीत. त्याचप्रमाणे बनावट मेल न उघडण्याचा सल्ला देखील बँकेने दिला आहे. दरम्यान एसबीआयने नुकत्याच केलेल्या या ट्वीटमध्ये असे म्हटले आहे की, 'बँक ग्राहकांना अशी विनंती आहे की, सोशल मीडियावर त्यांनी सतर्क राहावे आणि कोणत्याही भ्रामक किंवा बनावट मेसेजना बळी पडू नये.'
याआधी एसबीआयने एक 20 सेकंदाचा व्हिडीओ देखील शेअर केला होता, त्यामध्ये एसबीआयने त्यांच्या ग्राहकांना याबाबत सावधान केले होते की, तुमची गोपनीय माहिती ऑनलाइन शेअर करू नका.
Be vigilant, be safe.
While interacting with us on social media, please check account verification and do not share confidential details online. pic.twitter.com/x2T7ImaCz6
एसबीआयने त्यांच्या ग्राहकांना अशी माहिती दिली आहे की, घरबसल्या विविध बँकिंग सेवा मिळवण्यासाठी बँकेच्या अधिकृत पोर्टलचाच वापर करा. याशिवाय YONO अॅप वापरून देखील तुम्ही विविध सेवा मिळवू शकता. SBI वेबसाइट किंवा योनो व्यतिरिक्त तुम्ही इतर कोणत्या पोर्टलचा वापर केल्यास तुम्ही फसवणुकीची शिकार होण्याची शक्यता अधिक आहे.
फसवणूक झाल्यास सायबर क्राइम पोर्टलवर दाखल करा तक्रार
तुमची फसवणूक झाल्यास तुम्ही सायबर क्राइम पोर्टलवर तक्रार दाखल करू शकता. तक्रार दाखल करण्यासाठी तुम्हाला राज्याचे नाव लॉगिन आयडी, मोबाइल नंबर आणि OTP टाकावा लागेल. तुम्ही नवीन युजर असल्यास याठिकाणी आधी तुम्हाला नोंदणी करावी लागेल. नोंदणीवेळी मोबाइल क्रमांक दिल्यानंतर मोबाइलवर आलेला ओटीपी तुम्ही प्रविष्ट केला की नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल. या पोर्टलवर तुम्ही तक्रार नोंदवू शकता.