मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Meesho : FACEBOOK ने पहिल्यांदाच केली भारतात गुंतवणूक; पैसे कमावणं शिकवणाऱ्या या Startup ची चर्चा

Meesho : FACEBOOK ने पहिल्यांदाच केली भारतात गुंतवणूक; पैसे कमावणं शिकवणाऱ्या या Startup ची चर्चा

सोशल मीडियावर अधिराज्य गाजवणाऱ्या फेसबुकने पहिल्यांदाच एका भारतीय स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करायचा निर्णय घेतला आहे आणि त्यासाठी निवडला आहे meesho हा स्टार्टअप. भारतीयांना पैसे कमावणाऱ्या शिकवणाऱ्या हे तरुणांचं जुगाड अॅपची चर्चा जगभरात सुरू आहे.

पुढे वाचा ...
मुंबई, 14 जून : सोशल मीडियावर अधिराज्य गाजवणाऱ्या फेसबुकने पहिल्यांदाच एका भारतीय स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करायचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी निवडला आहे मेशो Meesho हा स्टार्टअप. आम्ही भारतीयांना पैसे कमवायला शिकवतो, अशी या अॅपची जाहिरात केली जाते. Meesho हे ऑनलाईन खरेदी-विक्रीचं एक अॅप आहे. ज्वेलरीपासून मोबाईल फोनपर्यंत नव्या- जुन्या वस्तूंची खरेदी विक्री या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून होत असते. 20 लाख छोटे उद्योजक या अॅपचा वापर करतात. या अॅपच्या माध्यमातून 80 कोटींची रोजगार निर्मिती होते आणि 1 कोटी लोक हे अॅप वापरतात असा मेशोचा दावा आहे. IIT मधून शिक्षण घेतलेल्या दोन तरुणांनी 2015 मध्ये हे स्टार्टअप उभं केलं. IIT आणि IIM मधून शिक्षण घेतलेली तरुण, हुशार आणि उद्योजकतेने भारलेली मंडळी सध्या Meesho चं काम पाहात आहेत. फेसबुकने या तरुणाईमधलं टॅलेंट ओळखूनच या कंपनीत रस घेतला आणि या भारतीय कंपनीत पैसे गुंतवले. Meesho चा किती शेअर Facebook ने घेतला आहे किंवा नेमकी किती गुंतवणूक केली आहे, याबाबत अद्याप जाहीरपणे काही सांगण्यात आलेलं नाही. पण भारतीय स्टार्टअप साठी आणि Make In India मोहिमेसाठी ही चांगली गोष्ट असल्याचं बोललं जात आहे. तब्बू समोर ढसाढसा रडला होता सलमान खान, स्वतःनेच सांगितलं कारण फेसबुकच्या गुंतवणुकीतून Meesho ला आता नवीन उद्योजकांना पाठबळ द्यायला मदत होईल आणि आणखी नव्या उद्योगांना सोशल मीडियाच्या माध्यमातून कस्टमर बेस निर्माण करून देणं सोपं जाईल. Meesho काय आहे? ऑनलाईन खरेदी विक्री करायची सोय देणारं हे अॅप आहे. या अॅपला लॉगइन केल्यावर व्हॉट्सअॅपसारख्या माध्यमातून तुम्ही ग्राहकांशी संपर्क साधू शकता. ग्राहकांसाठीही हा पर्याय उपयुक्त ठरतो. बुमराहला या अभिनेत्रीने केलंय क्लीन बोल्ड? पाहा कोण आहे ती! 20 लाख विक्रेते सध्या या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून आपल्या वस्तू विकत आहेत. दागिन्यांपासून, कपडे, घड्याळं, मोबाईल, गॅजेट्सपर्यंत अनेक वस्तू या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून  विकता येतात. VIDEO : रुग्णालयात बाळाची काळजी घ्या, धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद!
First published:

Tags: Facebook, Startup

पुढील बातम्या