तब्बू समोर ढसाढसा रडला होता सलमान खान, स्वतःनेच सांगितलं कारण

भारत सिनेमा प्रेक्षकांना आवडतोय ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. सगळ्यांच्या कामाचं कौतुक होत आहे. सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीही मी कधी सिनेमाचं एवढं प्रमोशन केलं नव्हतं जे आता करत आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 14, 2019 03:01 PM IST

तब्बू समोर ढसाढसा रडला होता सलमान खान, स्वतःनेच सांगितलं कारण

मुंबई, 14 जून- सलमान खानचा भारत सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान कामगिरी करत आहे. सध्या सिनेमा सुपरहिट झाल्यामुळे सलमानही आनंदात आहे. नुकतंच एका मुलाखतीत सलमानने तो तब्बूसमोर ढसाढसा रडण्याचं मान्य केलं होतं. सलमान म्हणाला की, ‘भारत सिनेमात एक फार हृदयद्रावस सीन होता. हा सीन मला तब्बूसोबत करायचा होता. या दरम्यान मी ग्लिसरीनशिवायच रडलो होतो.’ रडता रडता मी ‘कोई भी चीजें ठीक की जा सकती हैं बातचीत से...’ हा डायलॉगही बोललो होतो.’

हेही वाचा- विराटसाठी काहीपण! त्याला भेटता यावं म्हणून अनुष्का करतेय तारेवरची कसरत

यासोबतच सलमान पुढे म्हणाला की, ‘मला वाटतं की आतापर्यंत मी ज्या लोकांसोबत काम केलं त्यांच्यात सुनील ग्रोवर सर्वाधिक प्रतिभावान आहे. जेव्हा तो व्यक्तिरेखेत असतो तेव्हा तो मिमिक्री करत नाही किंवा कोणता विनोदही करत नाही. तो फार गंभीर असतो पण तरीही लोकांना हसवण्यात तो यशस्वी होतो.’

भारत सिनेमाच्या यशाबद्दलही सलमान म्हणाला की, ‘भारत सिनेमा प्रेक्षकांना आवडतोय ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. सगळ्यांच्या कामाचं कौतुक होत आहे. सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीही मी कधी सिनेमाचं एवढं प्रमोशन केलं नव्हतं जे आता सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर करत आहे. ज्यांना माझा सिनेमा आवडला त्यांचे मी मनापासून आभार मानतो.’


Loading... 

View this post on Instagram
 

Aaj Bharat ki Eid hai.


A post shared by Tabu (@tabutiful) on

हेही वाचा- ब्रेकअप होताच सलमानची अभिनेत्री पडली एकटी

भारतच्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर सात दिवसांमध्ये सिनेमाने १५० कोटींहून अधिक कमाई केली आहे. भारत हा सिनेमा ओड टू माय फादर या कोरियन सिनेमाचा अधिकृत रिमेक होता. अली अब्बास दिग्दर्शित या सिनेमात सलमान खान आणि कतरिना कैफसोबत जॅकी श्रॉफ, सुनील ग्रोवर, दिशा पाटनी, नोरा फतेही, तब्बी आणि आसिफ शेख यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

हेही वाचा- आदित्यची पत्नी म्हणाली, ‘माझ्या नवऱ्याला डेट करायची कंगना, तिला मुलगी कशी मानू?’


VIDEO : नानांना क्लीन चिट; तनुश्री म्हणते, पोलीसच भ्रष्टाचारी!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 14, 2019 02:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...