मराठी बातम्या /बातम्या /मनी /Explained: म्युचअल फंड KYC अपडेट करायचं आहे? अशी आहे प्रक्रिया

Explained: म्युचअल फंड KYC अपडेट करायचं आहे? अशी आहे प्रक्रिया

बॅंकिंग किंवा अन्य अर्थिक व्यवहारांसाठी केवायसी (KYC) ही अत्यंत महत्वाची आणि बंधनकारक प्रक्रिया आहे. यामुळे संबंधित संस्थेला आपली केवायसी प्रक्रिया ही पूर्ण करावीच लागते. तसंच म्युचअल फंड गुंतवणूकदारांना खातं उघडण्यापूर्वी केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितलं जातं.

बॅंकिंग किंवा अन्य अर्थिक व्यवहारांसाठी केवायसी (KYC) ही अत्यंत महत्वाची आणि बंधनकारक प्रक्रिया आहे. यामुळे संबंधित संस्थेला आपली केवायसी प्रक्रिया ही पूर्ण करावीच लागते. तसंच म्युचअल फंड गुंतवणूकदारांना खातं उघडण्यापूर्वी केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितलं जातं.

बॅंकिंग किंवा अन्य अर्थिक व्यवहारांसाठी केवायसी (KYC) ही अत्यंत महत्वाची आणि बंधनकारक प्रक्रिया आहे. यामुळे संबंधित संस्थेला आपली केवायसी प्रक्रिया ही पूर्ण करावीच लागते. तसंच म्युचअल फंड गुंतवणूकदारांना खातं उघडण्यापूर्वी केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितलं जातं.

पुढे वाचा ...

  नवी दिल्ली, 1 मार्च : बॅंकिंग किंवा अन्य अर्थिक व्यवहारांसाठी केवायसी (KYC) ही अत्यंत महत्वाची आणि बंधनकारक प्रक्रिया आहे. यामुळे संबंधित संस्थेला आपली केवायसी प्रक्रिया ही पूर्ण करावीच लागते. तसंच म्युचअल फंड (Mutual Fund) गुंतवणूकदारांना खातं उघडण्यापूर्वी केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितलं जातं. त्यामुळं ही केवायसी प्रक्रिया कशी असते हे जाणून घेऊया...

  केवायसी बदलण्याची गरज का आहे?

  अनेक जण कामाच्या निमित्ताने एका शहरातून दुसऱ्या शहरात स्थायिक होतात. अनेकदा त्यामागे बदली हे कारण देखील असू शकतं. तसंच रोजगारासाठी अन्य देशांमध्येही स्थलांतर केलं जातं. त्यामुळे केवायसी दस्तावेजात नाव, पत्ता किंवा वास्तव्याचं ठिकाण नमूद करणं हे बंधनकारक आहे. एकदा केवायसीचे तपशील पूर्ण झाले की ते विहित प्रक्रियेचं पालन करुन बदलले जाऊ शकतात.

  माझ्याकडे म्युचअल फंडाच्या गुंतवणूकीशिवाय डिमॅट खातं (Demat Account) आणि काही बॅंक खातीही आहेत. केवायसीमधील बदलाचा माझ्या या अन्य खात्यांवर परिणाम होऊ शकतो का?

  नाही. कारण तुमच्या म्युचअल फंडाच्या पोलिओमधूनच केलेला बदल दिसून येतो. जेव्हा तुम्ही आपल्या म्युचअल फंडाची केवायसी बदलता तेव्हा हा बदल बॅंकांमधील किंवा डिमॅट खात्यांमध्ये होत नाही. कारण एकाधिक नियमकांच्या देखरेखीखाली असलेल्या सर्व वित्तीय उत्पादनांमधील केंद्रीय केवायसी प्रक्रियेस अजून प्रारंभ झालेला नाही.

  (वाचा - LPG Gas Cylinder: सामान्यांना फटका, 3 महिन्यात 200 रुपयांनी महागला गॅस सिलेंडर)

  केवायसीसाठी कोणता अर्ज असतो आणि कोणती कागदपत्रे लागतात?

  म्युचअल फंडासाठी केवायसी अपडेट करण्याकरता केवायसी डिटेल्स चेंज (KYC Details Change) नावाचा अर्ज असतो. तुम्ही हा अर्ज म्युचअल फंड, रजिस्ट्रार किंवा सीएएमस, के-फिन अशा हस्तांतरण एजंटसच्या (RTA) वेबसाईटवरुन घेऊ शकता. स्व-साक्षांकित पॅनकार्डची कॉपी केवायसी अपडेशन फॉर्मसाठी आवश्यक असते. नाव आणि पॅन क्रमांक ही बेसिक माहिती भरल्यानंतर तुम्हाला ज्या माहितीत बदल किंवा अपडेशन करायचं आहे ते तुम्ही निवडू शकता. उदा. पत्ता बदलासाठी पासपोर्ट, रेशन कार्ड, वीज बिल, ज्यावर नाव व पत्ता ठळक असेल, लेटेस्ट बॅंक स्टेटमेंटची स्व-साक्षांकीत कॉपी आवश्यक असते. जर तुमचा कम्युनिकेशनचा आणि कायमचा पत्ता वेगळा असेल तर त्याअनुषंगाने कागदपत्रं सबमिट करावी लागतात.

  संपूर्ण भरलेला फॉर्म म्युचअल फंड कंपनी किंवा आरटीएच्या कार्यालयात सबमिट करावा. यावेळी जी कागदपत्रं तुम्ही स्व-साक्षांकित (self-attested) केली आहेत, त्याच्या मूळ प्रती व्हेरिफिकेशनसाठी जवळ ठेवाव्यात. इन्स्ट्रक्शन पेजवर नमूद केल्याप्रमाणे एखाद्या सक्षम अधिकाऱ्याकडून देखील तुम्ही कागदपत्रं साक्षांकीत करुन घेऊ शकता.

  (वाचा - घरातलं सोनं तुम्हाला मिळवून देईल दुप्पट कमाई, जाणून घ्या काय आहे योजना)

  केवायसीत ऑनलाईन बदल करता येतो का?

  नाही. पण जर तुम्ही प्रथमच केवायसी प्रक्रिया करत असाल, तर ती प्रक्रिया ऑनलाईन (Online) होऊ शकते. या प्रक्रियेत तुम्ही तुमचा तपशील असलेली कागदपत्रं म्युचअल फंडाच्या वेबसाईटवर अपलोड करू शकता. तुम्ही हयात आहात आणि ही कागदपत्रं तुमचीच आहेत हे संबंधित व्यक्तीकडून व्हेरिफाय होण्यासाठी व्हिडीओ कॉलव्दारे व्हेरिफिकेशन होतं. परंतु जर तुम्हाला केवायसीत बदल किंवा ती अपडेट करायची असेल, तर तुम्हा सर्व प्रक्रिया ऑफलाईनच करावी लागते. केवायसी अपडेशनसाठी अर्ज सबमिट केल्यानंतर 7 ते 8 दिवसांत प्रक्रिया पूर्ण होते.

  (वाचा - Aadhaar Card हरवलं आहे? जाणून घ्या नवीन कार्ड मिळवण्यासाठी सोपी पद्धत)

  समजा मी एका म्युचअल फंडाची केवायसी अपडेट केली तर अन्य कंपन्यांच्या फंडांसाठीही ती अपडेट होते का?

  जेव्हा आपण आपल्या एका कंपनीच्या म्युचअल फंडाची केवायसी कंपनी किंवा आरटीएच्या माध्यमातून अपडेट करता, तेव्हा हा बदल तुमच्याशी संबंधित अन्य कंपन्यांच्या म्युचअल फंडांमध्येही दिसून येतो.

  First published:

  Tags: Bank, Money, Personal banking