नवी दिल्ली, 25 मार्च : कोरोना व्हायरसमुळे भारतात लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र या लॉकडाऊनमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा तोटा सहन करावा लागणार आहे. 120 अब्ज डॉलर्स अंदाजे 9 लाख कोटी किंवा जीडीपीच्या 4 टक्के एवढं नुकसान सहन करावं लागणार आहे. त्यामुळे विश्लेषकांनी आर्थिक पॅकेज जाहीर करण्याच्या मागणीवर भर दिला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) 3 एप्रिल रोजी पहिल्या द्वि-मासिक धोरणाचा आढावा घेणार आहे. त्याचप्रमाणे विश्लेषकांच्या मते या दरामध्ये कपात करणार आहे त्याचप्रमाणे वित्तिय तूट देखील वाढण्याची शक्यता आहे. (हे वाचा- भारतात लॉकडाऊन!बिग बास्केट-ग्रोफर्सने केलं दुकान बंद,अॅमेझॉनही घेणार नाही ऑर्डर ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात 3 आठवड्याच्या लॉक डाऊनची घोषणा केली आहे. आधीच धोक्यात असलेले इक्विटी मार्केट्स बुधवारी 0.47 टक्क्यांनी घसरले आहेत. ब्रिटिश ब्रोकरेज बार्कलेजने म्हटले आहे की, “आमच्या अंदाजानुसार या शटडाउनची किंमत अंदाजे 120 अब्ज डॉलर किंवा जीडीपीच्या 4 टक्क्यांपर्यंत आहे.” (हे वाचा- मुंबईत कोरोनाचा धोका वाढला, संकटकाळात बिग बझारची खास ऑफर ) त्यांनी सांगितलं की, ‘केंद्र सरकारच्या या बंदीमुळे सुमारे 90 अब्ज डॉलरचं नुकसान होणार आहे. त्याआधीच महाराष्ट्रासारख्या राज्याने आधीच लॉकडाऊन घोषित केला होता, त्यामुळे त्याचं नुकसान वेगळं आहे. बार्कलेजने हे सुद्धा सांगितले आहे की, एप्रिलमध्ये रिझर्व्ह बँक रेपो दरात 0.65 टक्के कपात करेल आणि पुढील वर्षी सुद्धा यामध्ये आणखी एक टक्के कपात करेल. (हे वाचा- या कर्मचाऱ्यांना बसणार कोरोनाची मोठी झळ, मार्च महिन्याचा पगार कापणार ) रिसर्च अँड एडवाइजरी कंपनी एमकेच्या मते सरकारने लॉकडाऊन करण्याआधी यामुळे होणाऱ्या आर्थिक दुष्परिणामांवर काय उपाय करायचे याबाबत विचार केलेला नाही आहे. नोटबंदी, जीएसटी आणि आता या गोष्टीचा परिणाम असंघटित क्षेत्रांवर अधिक प्रमाणात होणार आहे, असं या कंपनीचं म्हणणं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.