Home /News /money /

भारतात लॉकडाऊन! बिग बास्केट-ग्रोफर्सने केलं दुकान बंद, अ‍ॅमेझॉनही घेणार नाही ऑर्डर

भारतात लॉकडाऊन! बिग बास्केट-ग्रोफर्सने केलं दुकान बंद, अ‍ॅमेझॉनही घेणार नाही ऑर्डर

कोरोना व्हायरस (Coronavirus) मुळे देशभरात 14 एप्रिलपर्यंत लॉक डाऊन करण्यात आला आहे. त्यामळे अ‍ॅमेझॉनसारख्या अनेक ऑनलाइन कंपन्यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

    नवी दिल्ली, 25 मार्च : कोरोना व्हायरस (Coronavirus) मुळे देशभरात 14 एप्रिलपर्यंत लॉक डाऊन करण्यात आला आहे. त्यामळे अ‍ॅमेझॉनसारख्या अनेक ऑनलाइन कंपन्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. या मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांनी त्यांच्या काही सेवा अस्थायी स्वरूपात बंद करण्याचा निर्ण य घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसचे संक्रमण नियंत्रणात आणण्यासाठी भारतामध्ये 21 दिवसांसाठी लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. (हे वाचा-मुंबईत कोरोनाचा धोका वाढला, संकटकाळात बिग बझारची खास ऑफर) त्यांनंतर अ‍ॅमेझॉनने सध्याच्या परिस्थितीत कमी महत्त्वाच्या प्रोडक्ट्सची अनिश्चित काळासाठी ऑर्डर घेणे बंद केले आहे. मात्र स्वच्छता आणि इतर महत्त्वाच्या कामासाठी आवश्यक असणाऱ्या प्रोडक्ट्सची विक्री त्यांनी सुरू ठेवली आहे. ग्रोफर्स-बिग बास्केटने सुद्धा घेतला हा निर्णय एवढच नव्हे तर ग्रोफर्स आणि बिग बास्केट सारख्या शॉपिंग वेबसाइट्सने सुद्धा त्यांच्या सेवा बंद केल्या आहेत. ग्रोफर्सने त्यांच्या पेजवर ‘Notify Me’चा पर्याय दिला आहे. याचा अर्थ असा की, जेव्हा त्यांची सुविधा सुरू होईल त्यावेळी ग्राहकांना नोटिफेकशन पाठवण्यात येईल. त्याचप्रमाणे बिग बास्केटने त्यांची सेवा फक्त त्यांच्या सध्याच्या ग्राहकांसाठी सुरू ठेवली आहे. (हे वाचा-या कर्मचाऱ्यांना बसणार कोरोनाची मोठी झळ, मार्च महिन्याचा पगार कापणार) Licious ने सुद्धा मागणी वाढल्यामुळे फूड डिलिव्हरी बंद केली आहे.ऑनलाइन डिलीव्हरी सर्व्हिस मिल्कबास्केट (Milkbasket) ने सुद्धा गुड़गांव, नोएडा आणि हैदराबादमधील ग्राहकांना माहिती दिली आहे की, काही दिवसांसाठी डिलिव्हरी देण्यात येणार नाही Flipkart ने सुद्धा केली सर्व्हिस बंद फ्लिपकार्टने सुद्धा बुधवारी भारतातील सेवा अनिश्चित काळासाठी बंद केली आहे. फ्लिपकार्टने त्यांच्या वेबसाइटवर बॅनर पोस्ट करून लिहिलं आहे की, ‘आम्ही अनिश्चित काळासाठी आमची सेवा बंद केली आहे. आमच्यासाठी तुमच्या गरजा अधिक महत्त्वाच्या आहेत. आम्ही वचन देतो की, आम्ही लवकर परत येऊ. सध्या कठीण काळ सुरू आहे, हे याआधी कधी झालेले नाही. असंही कधी झालेले नाही, मात्र सुरक्षित राहण्यासाठी एकमेकांपासून वेगळे राहणे आवश्यक आहे. आम्ही तुम्हाला विनंती करतो की घरामध्ये सुरक्षित राहा. आम्ही लवकर परत येऊ आणि एकत्रित येऊन हा परिस्थितीतून बाहेर पडू.’
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या