मुंबई, 25 मार्च : कोरोनाचा (Coronavirus) सामना करण्यासाठी भारतीयांनी चंग बांधले आहेत. सर्वतोपरी कोरोनाला हरवण्याचा निर्धार सर्वांनीच केला आहे. अशा परिस्थितीत अनेकांनी जीवनावश्यक वस्तुंचा साठा करून घेतला आहे. मात्र तरीही अनेकांकडे जीवनावश्यक वस्तुंचा साठा नाही आहे. अनेकांकडे काही गरजेच्या वस्तूंचा साठा नाही आहे. या परिस्थितीमध्ये अनेक दुकानांकडून होम डिलिव्हरीची सोय उपलब्ध करून दिली आहे. बिग बझार या सुपर मार्केटने देखील होम डिलिव्हरीचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. मुंबईतील विविध भागांमध्ये त्यांनी ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. (हे वाचा- या कर्मचाऱ्यांना बसणार कोरोनाची मोठी झळ, मार्च महिन्याचा पगार कापणार ) बिग बझारने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी विले पार्ले, विरार, कांदिवली, वसई, गोरेगाव, ठाणे अशा मुंबईतील 16 भागांमध्ये बिग बझारकडून ही सुविधा सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू किंवा गरजेच्या वस्तूंचा तुटवडा जरी भासला, तरी मुंबईकर बिग बझारमधून त्यांची ऑर्डर देऊ शकतात.
We have initiated Doorstep Delivery services in Mumbai. Get your daily needs delivered at your doorstep.
— Big Bazaar (@BigBazaar) March 24, 2020
✅Call the nearest store and place your order
✅Delivery at your doorstep.
✅Pay at home.
Pass this information to your friends & relatives in Mumbai. pic.twitter.com/UekOZFUWyG
कोरोनाच्या संकटकाळात मुंबईकरांवर मोठं संकट आहे. या परिस्थितीत घराबाहेर न पडता देशाच्या हितासाठी काम करणं आवश्यक आहे. मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाचे 4 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 116 वर गेला आहे.