Home /News /money /

EPFO कर्मचाऱ्यांच्या खात्यात पाठवणार इतकी रक्कम? 1 जानेवारीपर्यंत मोठा बदल होण्याची शक्यता

EPFO कर्मचाऱ्यांच्या खात्यात पाठवणार इतकी रक्कम? 1 जानेवारीपर्यंत मोठा बदल होण्याची शक्यता

कामगार मंत्रालयाने, अर्थ मंत्रालयाला 2019-20 साठी ईपीएफमध्ये एकदा 8.5 टक्के व्याज देण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. हा प्रस्ताव याच महिन्यात पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावावर अर्थ मंत्रालयाची काही दिवसात मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे खात्यात याच महिन्यात 1 जानेवारीपूर्वी व्याज येण्याची शक्यता आहे.

पुढे वाचा ...
  नवी दिल्ली, 28 डिसेंबर : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी EPFO 2019-20 साठी जवळपास सहा कोटी कर्मचारी भविष्य निधी खात्यात 31 डिसेंबरपर्यंत 8.5 टक्के व्याज देणार आहे. यापूर्वी सप्टेंबरमध्ये कामगार मंत्री संतोष गंगवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ईपीएफओने 8.15 टक्के आणि 0.35 टक्के अशा दोन हप्त्यांमध्ये व्याज देण्याचा निर्णय घेतला होता. मिळालेल्या माहितीनुसार, कामगार मंत्रालयाने, अर्थ मंत्रालयाला 2019-20 साठी ईपीएफमध्ये एकदा 8.5 टक्के व्याज देण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. हा प्रस्ताव याच महिन्यात पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावावर अर्थ मंत्रालयाची काही दिवसात मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे खात्यात याच महिन्यात 1 जानेवारीपूर्वी व्याज येण्याची शक्यता आहे. दरम्यान, ईपीएफओच्या बैठकीत आर्थिक वर्ष 2019-20 साठी व्याजदरांबाबत निर्णय घेण्यात आला होता. कर्मचारी भविष्य निधी EPF वर 2019-20 साठी 8.5 टक्के व्याज निश्चित करण्यात आलं. परंतु EPFO कडून केवळ 8.15 टक्के व्याज दिलं जाईल. इतर 0.35 टक्के व्याज डिसेंबर महिन्यात दिलं जाईल.

  (वाचा - PF खात्यातून पैसे काढण्यापूर्वी जाणून घ्या हे महत्त्वाचे नियम; अन्यथा भरावा लागेल टॅक्स)

  ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने 5 मार्च रोजी झालेल्या बैठकीत ईपीएफवर 2019-20 साठी व्याजदर 8.50 टक्के ठेवण्याची शिफारस केली होती, जी आधीच्या 0.15 टक्के कमी आहे. ईपीएफचा हा प्रस्तावित दर 7 वर्षातील किमान दर आहे. त्यामुळे आता किती व्याज येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  (वाचा - केवळ एका मिस्ड कॉल आणि SMS ने जाणून घ्या किती आहे तुमचा PF बॅलेन्स)

  लॉकडाऊन काळात केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना Employee Provident Fund (EPF) मधून ऍडव्हान्स रक्कम काढण्याची परवानगी दिली होती. EPFOकडून जारी करण्यात आलेल्या आकड्यांनुसार, मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून 38,71,664 लोकांनी 44,054.72 कोटी रुपये या खात्यातून काढले आहेत. महाराष्ट्रातून 25 मार्च ते 31 ऑगस्ट आणि त्यानंतर 7,23,986 कर्मचाऱ्यांनी जवळपास 8,968.45 कोटी रुपये पीएफ अकाऊंटमधून काढले आहेत.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Pf, Pf news

  पुढील बातम्या