मराठी बातम्या /बातम्या /मनी /केवळ एका मिस्ड कॉल आणि SMS ने जाणून घ्या किती आहे तुमचा PF बॅलेन्स

केवळ एका मिस्ड कॉल आणि SMS ने जाणून घ्या किती आहे तुमचा PF बॅलेन्स

अनेकांना पीएफ अकाउंटबाबत खास माहिती नसते. त्यामुळे आपल्या अकाउंटमध्ये किती रक्कम जमा आहे याबाबतही अनेकांना माहित नसतं. परंतु पीएफ अकाउंटचा बॅलेन्स तपासणं अतिशय सोपं आहे.

नवी दिल्ली, 27 डिसेंबर : कोरोना काळात आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या देशातील बहुसंख्य लोकांनी आपल्या प्रोविडेंट फंडमधून पैसे काढले होते. त्यामुळे आता किती रक्कम बाकी आहे याची माहिती असणं गरजेचं आहे. अनेकांना पीएफ अकाउंटबाबत खास माहिती नसते. त्यामुळे आपल्या अकाउंटमध्ये किती रक्कम जमा आहे याबाबतही अनेकांना माहित नसतं. परंतु पीएफ अकाउंटचा बॅलेन्स तपासणं अतिशय सोपं आहे.

या नंबरवर द्या मिस्ड कॉल -

पीएफ अकाउंटचा बॅलेन्स केवळ एका मिस्ड कॉलवर जाणून घेता येतो. त्यासाठी पीएफ अकाउंटमध्ये रजिस्टर्ड असलेल्या नंबरवरून 011-22901406 या नंबरवर मिस्ड कॉल द्यावा लागेल. त्यानंतर ईपीएफओकडून एक एसएमएस येईल, ज्यात पीएफ अकाउंटमध्ये जमा असेलल्या रकमेची माहिती मिळेल.

(वाचा - नवीन वर्षात 'या' गोष्टी बदणार; सामन्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम)

SMS -

मिस्ड कॉलशिवाय SMS करूनही पीएफ अकाउंटचा बॅलेन्स तपासता येतो. त्यासाठी UAN नंबर माहिती असावा लागतो, तसंच तो ऍक्टिव्ह स्थितीतही असावा. SMS द्वारे सर्वात आधी EPFOHO UAN टाईप करून 7738299899 वर पाठवावा लागेल. त्यानंतर एक मेसेज येईल, त्यात पीएफच्या बॅलेन्सची माहिती दिलेली असेल.

10 भाषांमध्ये मिळेल सेवेचा लाभ -

SMS द्वारे 10 भाषांमध्ये पीएफ अकाउंटची माहिती मिळवू शकता. त्यासाठी EPFOHO UAN HIN टाईप करा आणि त्यानंतर 7738299899 वर पाठवावा लागेल. त्यानंतर ईपीएफओकडून त्याच भाषेत एक मेसेज येईल, त्यात संपूर्ण माहिती मिळेल. इंग्रजीमध्ये माहिती मिळवण्यासाठी कोणत्याही कोडची आवश्यकता नाही.

>>हिंदी- HIN

>>पंजाबी - PUN

>>गुजराती - GUJ

>>मराठी - MAR

>>कन्नड - KAN

>>तेलुगू - TEL

>>तमिल - TAM

>>मल्याळम - MAL

>>बंगाली - BEN

First published:
top videos

    Tags: Pf, PF Amount, PF Withdrawal