• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • PF खात्यातून पैसे काढण्यापूर्वी जाणून घ्या हे महत्त्वाचे नियम; अन्यथा भरावा लागेल टॅक्स

PF खात्यातून पैसे काढण्यापूर्वी जाणून घ्या हे महत्त्वाचे नियम; अन्यथा भरावा लागेल टॅक्स

जर एखाद्या कर्मचाऱ्याने 5 वर्षांच्या कालावधीत आपला पीएफ काढला, तर त्याला ईपीएफ काढण्याच्या वेळी टॅक्स भरावा लागू शकतो. पण त्यासाठी काही अटी लागू आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली, 9 नोव्हेंबर : नोकरदार वर्गातील कर्मचारी आपली मोठी कमाई EPF मध्ये टाकतात. अनेकदा पैसे काढताना त्यावर टॅक्स लावला जातो. त्यासाठी टॅक्ससंबधित काही नियम जाणून घेणं महत्त्वाचं आहे. अन्यथा, पीएफ अकाउंटमधील पैसे कट होऊ शकतात. जर एखाद्या कर्मचाऱ्याने 5 वर्षांच्या कालावधीत आपला पीएफ काढला, तर त्याला ईपीएफ काढण्याच्या वेळी टॅक्स भरावा लागू शकतो. पण त्यासाठी काही अटी लागू आहेत. कधी काढाल EPF चे पैसे - टॅक्स एक्सपर्ट गौरी चढ्ढा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या EPF मधून 5 वर्षांनंतरच पैसे काढले पाहिजेत. जर 5 वर्षांआधीच 50 हजारहून अधिक रक्कम काढल्यास, त्यावर 10 टक्के TDS भरावा लागेल. कसा वाचवाल TDS - TDS आणि टॅक्सेबिलिटीपासून वाचायचं असल्यास, 5 वर्षांहून अधिक सर्व्हिस करावी लागेल. 5 वर्षांनंतर पैसे काढल्यास, कोणतीही टॅक्सेबिलिटी लागत नाही. का लागतो TDS - 5 वर्षाआधी पैसे काढल्यास, एंप्लॉयरचं कॉन्ट्रिब्यूशन इनकम फ्रॉम सॅलरीमध्ये येतं. आणि एंप्लॉईचं कॉन्ट्रिब्यूशन इनकम फ्रॉम अदर सोर्सेजमध्ये जातं. त्यामुळे दोघांचं जे व्याज मिळतं, ते टॅक्सेबल होतं. या फॉर्ममुळे वाचू शकतो TDS - जर तुमचं इनकम 2.5 लाखांहून कमी आहे आणि तुम्ही PF मधून पैसे काढले असल्यास, फॉर्म 15GH सबमिट करू शकता. यामुळे TDS वाचवला जाऊ शकतो. महत्त्वाच्या गोष्टी - - 5 वर्षांआधीच EPF खात्यातून पैसे काढल्यास टॅक्स - 5 वर्ष पूर्ण होण्याआधी 50 हजारहून अधिक रक्कम काढल्यास 10 टक्के TDS - TDS वाचवण्यासाठी, 5 वर्षानंतरच PF खात्यातून पैसे काढावेत - PF योगदानात चार कंपोनंट : कंपनी योगदान, कर्मचाऱ्याकडून जमा केली जाणारी रक्कम आणि दोघांवरील व्याज (वाचा - 100 रुपये बचतीतूनही करू शकता मोठी गुंतवणूक; चांगल्या रिटर्न्ससह सरकारी गॅरंटीही) कधी टॅक्स लागणार नाही - - कर्मचाऱ्याची नोकरी गेल्यास - कंपनी बंद होण्याच्या परिस्थितीत - कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास - नवीन ज्वाइनिंगवेळी PF ट्रान्सफर केल्यास नोकरी नसल्यास, PF चे पैसे काढण्याचा नियम - EPF नियमांनुसार, कोणत्याही सदस्याची नोकरी गेल्यास, नोकरीदरम्यान जमा केलेल्या एकूण रकमेच्या 75 टक्के रक्कम, जॉब सोडल्यापासून एक महिन्यानंतर काढू शकतो. जर व्यक्ती दोन महिन्यांहून अधिक काळ बेरोजगार असेल, तर तो पीएफ अकाउंटमधून संपूर्ण रक्कम काढू शकतो. तुमच्या PF मधील गुंतवणूकीवरील टॅक्सची मोजणी, तुम्ही त्यावर्षात आयटीआर फाईल करताना इनकम टॅक्स कायद्याच्या कलम 80 C अंतर्गत कपातीचा लाभ घेतला आहे की नाही, त्यावर अवलंबून आहे.
  Published by:Karishma Bhurke
  First published: