नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी: देशात ऑनलाइन फ्रॉडचे धोके झपाट्याने वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या ग्राहकांना ऑनलाइन फसवणुकीचा इशारा दिलाय. फसवणूक करणारे कर्मचाऱ्यांकडून त्यांची वैयक्तिक माहिती विचारत असल्याची माहिती ईपीएफओने दिली आहे. EPFO ने ट्विट केले की, EPFO ने ट्विट केले की, जर स्वत:ला संस्थेचा सदस्य म्हणून विचारणाऱ्या व्यक्तीने तुमच्या खात्याशी संबंधित किंवा इतर गोपनीय माहिती विचारली तर ती अजिबात देऊ नका. ईपीएफओने सांगितले की, संस्था ग्राहकांना फोन कॉल किंवा सोशल मीडियाद्वारे आधार, पॅन, यूएएन, बँक अकाउंट किंवा ओटीपी यांसारखी माहिती विचारत नाही. यासोबतच EPFO ने सबस्क्राइबर्स सुरक्षित कसे राहू शकतात हे सांगितले. एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (EPFO) ने आपल्या सदस्यांना ऑनलाइन फसवणुकीच्या संभाव्य धोक्यापासून वाचवण्यासाठी इशारा दिलाय आणि बचावाच्या टिप्स देखील दिल्या आहेत. ट्विटरवर पोस्ट शेअर करत EPFO ने आपल्या सदस्यांना ‘फेक कॉल्स/मेसेजपासून सावध राहण्यास’ सांगितले आहे.
ATM मधून कॅश काढताना ‘या’ लाइटकडे ठेवा लक्ष, अन्यथा रिकामे होईल अकाउंट!फसवणूकीपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे
EPFO ने आपल्या सदस्यांना UAN/पासवर्ड/PAN/आधार सारखी महत्वाची माहिती कोणासोबतही शेअर करू नये असा इशारा दिलाय. ईपीएफओ सदस्यांनी हे डिटेल्स फोन किंवा सोशल मीडियावर कोणाशीही शेअर करू नये, जरी इतर पक्षाने ईपीएफओचा प्रतिनिधी असल्याचा दावा केला असला तरी देखील आपली माहिती शेअर करु नये असे सांगण्यात आले आहे.
‘या’ कारणांसाठी Personal Loan घेत असाल तर सावधान! येऊ शकतात अडचणीनोकऱ्या बदलणाऱ्या कर्मचाऱ्यांवर सायबर हल्ल्याचा धोका सर्वाधिक असल्याचे भविष्य निर्वाह निधी संघटनेने म्हटलेय. त्यामुळे त्यांना जास्त सतर्क राहावे लागेल. जर सदस्यांना कोणताही फिशिंग कॉल किंवा मॅसेज आला तर त्याची त्वरित तक्रार करा. EPFO च्या सेवांसाठी घेतलेले चार्जेज ऑफिशियल चॅनेलद्वारेच भरा. पैसे देण्याची कोणतीही अनधिकृत मागणी ही सायबर गुन्हेगारांकडूनच केली जाईल. यामुळे तुम्हाला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते.