जाहिरात
मराठी बातम्या / मनी / 'या' कारणांसाठी Personal Loan घेत असाल तर सावधान! येऊ शकतात अडचणी

'या' कारणांसाठी Personal Loan घेत असाल तर सावधान! येऊ शकतात अडचणी

'या' कारणांसाठी घेऊ नका पर्सनल लोन

'या' कारणांसाठी घेऊ नका पर्सनल लोन

पर्सलन लोन घेणे जेवढे सोपे आहे. अनेकदा ते फेडणे देखील तितकेच कठीण होते. कठीण परिस्थिती येऊ नये यासाठी विचार करुनच पर्सनल लोन घ्यायला हवे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 11 फेब्रुवारी: आजच्या काळात Personal Loan मिळवणे खूप सोपे झाले आहे. तुम्ही बँकेच्या अटींची पूर्तता केल्यास तुमचा कर्जाचा अर्ज काही तासांत मंजूर केला जाऊ शकतो. होम आणि कार लोन बँकेकडून काही तारण ठेवून दिले जाते, परंतु पर्सनल लोन हे असे लोन आहे, जे बँका ग्राहकांना त्यांच्या क्रेडिट स्कोअरच्या आधारे देतात. यामुळे अनेक लोक कोणतीही मोठी गरज नसतानाही पर्सनल लोन घेतात. यामुळे तुम्ही कर्जाच्या जाळ्यात अडकू शकता. पर्सनल लोन घेताना व्यक्तीने कोणत्या कारणासाठी कर्ज घेतले आहे याची विशेष काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून कर्जाच्या जाळ्यात अडकण्यासारखी परिस्थिती टाळता येईल. असे तज्ञ सांगतात.

क्रेडिट कार्डचे बिल भरण्यासाठी

तुम्ही पर्सनल लोन फक्त तुमच्या क्रेडिट कार्डचे बिल भरण्यासाठी घेतले असेल. तर त्यामुळे तुमच्यावरील ईएमआयचा भार वाढतो. पर्सनल लोनवर उच्च व्याजदर असतो, ज्यामुळे ईएमआयच्या स्वरूपात मोठी रक्कम द्यावी लागते. यामुळे तुम्ही अधिकच कर्जाच्या जाळ्यात अडकतात.

चैनीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी

जर तुम्ही महागडा मोबाईल किंवा कपडे खरेदी करण्यासाठी पर्सनल लोन घेत असाल तर असे करणे तुम्हाला खूप महागात पडू शकते. कारण कार आणि होम लोन घेऊन तुम्ही मालमत्ता खरेदी करता. कर्ज न भरल्यास बँक ते विकून त्याची रक्कम वसूल करू शकते. मोबाईल किंवा कपड्यांची किंमत खरेदी केल्यानंतर कमी होते आणि तुम्ही वेळेवर हप्ता भरला नाही तर तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते.

शेअर्स खरेदी करण्यासाठी

शेअर बाजारात नेहमीच चढ-उतार होत असतात. कोणता स्टॉक वाढेल हे कधीच कळत नाही. हे कोणीही खात्रीने सांगू शकत नाही. अशा परिस्थितीत शेअर्स खरेदी करण्यासाठी तुम्ही कधीही पर्सनल लोन कर्ज घेऊ नये.

प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी

प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी खूप पैसा लागतो आणि पर्सनल लोन वरील व्याज खूप जास्त असते. अशा परिस्थितीत तुम्ही डाऊनपेमेंटसाठी किंवा मालमत्ता खरेदी करण्यासाठी वैयक्तिक कर्ज घेता. त्यामुळे जास्त व्याजामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता. याऐवजी तुम्ही होम लोन घेऊ शकता. कारण यावर व्याज पर्सनल लोनच्या तुलनेत कमी लागते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: loan
  • First Published :
जाहिरात
जाहिरात