जाहिरात
मराठी बातम्या / मनी / लग्नासाठी सहज काढता येईल EPFO चा पैसा, फक्त लक्षात ठेवा 'या' अटी

लग्नासाठी सहज काढता येईल EPFO चा पैसा, फक्त लक्षात ठेवा 'या' अटी

पीएफ अकाउंटमधून कसे काढावे पैसे

पीएफ अकाउंटमधून कसे काढावे पैसे

पीएफ खात्याची देखरेख करणारी संस्था EPFO ​​या संस्थेकडून कर्मचाऱ्यांना गरज पडेल तेव्हा पैसे काढण्याची सुविधा दिली जाते.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 19 मार्च: पीएफ खात्याची देखरेख करणाऱ्या EPFO ​​या संस्थेकडून कर्मचाऱ्यांना गरज पडेल तेव्हा पैसे काढण्याची सुविधा दिली जाते. शिक्षणापासून लग्नापर्यंत सर्व गोष्टींसाठी तुम्ही त्यातून पैसे काढू शकता. दर महिन्याला तुमची नियुक्ती करणारी कंपनी आणि तुमचा हिस्सा तुमच्या पीएफ खात्यात जमा होतो. सरकारने खातेदाराला आपत्कालीन परिस्थितीमध्ये या निधीतील काही भाग काढण्याची परवानगी दिलेली आहे. यासाठी तुम्ही ऑनलाइन अर्जही करू शकता. मात्र नियमांनुसार, तुम्ही केवळ आंशिक रक्कम काढू शकता. EPFO कडून ट्विट करून ही माहिती देण्यात आली आहे. यानुसार कोणताही सदस्य त्याच्या/तिच्या मुलाच्या/मुलीच्या किंवा भाऊ/बहिणीच्या लग्नासाठी सहज पैसे काढू शकतो. पैसे काढण्याची रक्कम व्याजासह एकूण योगदानाच्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त राहत नाही. मात्र, यासाठी काही अटी आहेत. पैसे काढणाऱ्या सदस्यांना या अटीचे पालन करणं गरजेचं आहे.

तुमचा PF जमा होत असेल तर सावधान! फक्त एक चूक आणि अकाउंट होईल रिकामं

या आहेत अटी

यासाठी तुम्हाला EPFO ​​मध्ये किमान 7 वर्षांची सदस्यत्व असायला हवी. याआधी तुम्ही लग्न आणि शिक्षणासाठी तीनपेक्षा जास्त वेळा पैसे काढलेले नसावेत.

News18लोकमत
News18लोकमत

या स्टेप्स करा फॉलो

  1. सर्वात पहिले https://unifiedportalmem.epfindia.gov.in/memberinterface वर जा.
  2. लॉगइनसाठी आपला यूएएन नंबर आणि पासवर्ड टाका.
  3. लॉगिननंतर ऑनलाइन सर्व्हिसच्या ऑप्शनवर क्लिक करा.
  4. येथे तुम्हाला क्लेम सिलेक्ट करावा लागेल.
  5. यानंतर एक नवीन स्क्रीन ओपन होईल. येथे आपल्या बँक खात्याच्या अखेरचे 4 डिजिट टाकून यसवर क्लिक करा.
  6. यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट साइन करण्यास सांगितलं जाईल.
  7. साइन केल्यानंतर प्रोसिड टू ऑनलाइन क्लेमवर जा.
  8. ड्रॉप डाउन मेनूमध्ये काही पर्याय दिसतील.
  9. आता तुम्हाला काढायची असलेली रक्कम एंटर करा आणि चेकची स्कॅन केलेली कॉपी लावा.
  10. यानंतर तुमचा पत्ता टाका आणि Get Aadhaar OTP वर क्लिक करा.
  11. तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक OTP येईल, तो एंटर करा आणि क्लेम वर क्लिक करा.
  12. तुमच्या नियोक्त्याने रिक्वेस्ट मंजूर केल्यानंतर, पैसे तुमच्या खात्यात येतील.
होम इन्शुरन्स घेणं फायदेशीर? चोरी झाली तरी कंपनी देते भरपाई? जाणून घ्या सर्व काही
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात