मुंबई, 20 जून : घरी फिश टँक ठेवणं अनेकांची पसंती असते. घरच्या हाॅलमध्ये रंगीत मासे खूप आकर्षक दिसत असतात. यात सर्वात लोकप्रिय आहे गोल्ड फिश. याची किंमत 2500 रुपयांपासून 28 हजार रुपयांपर्यंत आहे. मासे पाळण्याचा शौक असलेले बरेच जण असतात. त्यामुळे हा वेगळा व्यवसाय चांगला चालू शकतो. या व्यवसायाची सुरुवात 1 लाख रुपयांपासून 2.50 लाख रुपयांपर्यंत करता येते. तुमची कमाई दर महिन्याला होईल 2 लाख रुपये. जाणून घेऊ या व्यवसायाबद्दल
सुरुवातीचा खर्च 1 ते 1.5 लाख रुपये
रंगीत माशांची शेती आणि त्याच्या व्यवसायासाठी तुम्हाला सुरुवातीला 2.50 लाख रुपयापर्यंत खर्च करावा लागेल. यात 50 हजार रुपये 100 स्क्वेअर फीट मत्सालयावर खर्च करावा लागेल आणि एवढेच पैसे इतर सामानावर. काही जातींच्या माशांचं सीड 100 रुपयांपासून 500 रुपयांपर्यंत प्रत्येक भागासाठी असतं. सीड तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे खरेदी करा. त्यासाठी मादी मासा आणि नर मासा यांचं प्रमाण 4:1 ठेवावं लागेल.
खुशखबर! येत्या 48 तासांत राज्यात मान्सून दाखल होणार, हवामान विभागाचा अंदाज
बजेटमध्ये आता लोकही होऊ शकतात सहभागी, अर्थ मंत्रालयाचा नवा प्लॅन
वेगवेगळ्या ठिकाणाहून येतं सिड
गोल्डन एरवॉन, चाईनीज फ्लॉवर हॉर्न, इंडियन फ्लॉवर हॉर्न, डिस्कन आणि पेस्ट फिश हे मासे मुख्य आहेत. यांच्यासाठी सीड चेन्नई, चीन आणि हाँगकाँगहून मागवलं जातं. भारतातही ते उपलब्ध आहे. या माशांची किंमत 2500 रुपयांपासून 28 हजार रुपयांपर्यंत आहे. सर्वात महाग मासा गोल्डन एरवाॅन असतो. तो 28 हजारापेक्षा जास्त महाग असतो.
बजेटमध्ये मिळू शकते इन्कम टॅक्सवर सवलत, मोदी सरकारची आहे 'ही' योजना
4 ते 6 महिन्यांनंतर सुरू होते कमाई
मत्सालयात सीड टाकल्यानंतर 4 ते 6 महिन्यांनी ते विकू शकतात. पण एका अॅक्वेरियममध्ये फार्मिंगसाठी एकाच प्रकारचे मासे ठेवा.
दर महिन्याला 10 मासे विकून कमवा लाख रुपये
तुम्ही फार्मिंग करून दर महिन्याल गोल्ड फिश तयार करत असाल आणि त्यातले 10 मासे विकलेत तर तुम्ही लाखो रुपये कमवू शकता. गोल्डन फिश 15 हजार रुपयांना विकलं जातं. हा व्यवसाय सुरू करण्याआधी फिश फार्मिंग तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
VIDEO: भररस्त्यात बैलांच्या झुंजीचा थरार; नागरिक हैराण