दरमहा PF खात्यात ट्रान्सफर केले जातात पैसे कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात दरमहा पैसे जमा केले जातात. ही एक फिक्स्ड रक्कम असते. ज्याचा एक हिस्सा तुमच्या पगारातून कापला जातो आणि तेवढंच कॉन्ट्रीब्युशन कंपनी भरते. हे वाचा-Petrol Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं डिझेल, काय आहेत लेटेस्ट भाव दरम्यान तुम्हाला तुमच्या पीएफ खात्यातील रक्कम तपासायची असेल तर काही सोप्या पद्धती वापरून तुम्ही ही रक्कम तपासून शकता. अगदी घरबसल्या एसएमएस पाठवून देखील तुम्ही तुमचा पीएफ बॅलन्स जाणून घेऊ शकता. याकरता तुम्हाला तुमचा यूनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) माहित असणं आवश्यक आहे. तुम्हा रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावरुन मेसेज पाठवून PF Balance तपासता येईल. जाणून घ्या घरबसल्या पीएफ तपासण्याच्या पद्धती कोणत्या आहेत. 1. SMS च्या माध्यमातून जाणून घ्या पीएफ बॅलन्स SMS च्या माध्यमातून तुमच्या पीएफ खात्यातील रक्कम तपासण्यासाठी तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून 7738299899 या नंबरवर मेसेज करावा लागेल. EPFOHO UAN ENG असे लिहून तुम्हाला हा मेसेज करावा लागेल. ENG म्हणजे इंग्रजी भाषेमध्ये तुम्हाला माहिती मिळेल. परंतू तुम्हाला अन्य कोणत्या भाषेत माहिती हवी असेल तर ENG ऐवजी तुम्हाला हव्या असलेल्या भाषेची पहिली तीन अक्षरं तुम्हाला टाकावी लागतील. हिंदी, पंजाबी, गुजराती, मराठी, कन्नड, तेलुगु, तमिळ, मलयाळम आणि बंगाली भाषेमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. या क्रमांकावर मेसेज करण्यासाठी ईपीएफओ मध्ये तुमचा नंबर रजिस्टर्ड असणे अनिवार्य आहे. 2. Missed Call च्या माध्यमातून जाणून घ्या PF Balance यूएएन पोर्टलवर नोंदणीकृत सदस्यांना मिस्ड कॉल देऊन त्यांच्या खात्यातील शिल्लक जाणून घेता येईल. आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून 011-22901406 वर एक मिस कॉल करावा लागेल. यानंतर पीएफचा तपशील तुम्हाला ईपीएफओच्या मेसेजद्वारे प्राप्त होईल. दोन रिंगनंतर हा कॉल स्वयंचलितपणे डिस्कनेक्ट होईल. या सेवेसाठी कोणतेही पैसे आकारले जाणार नाहीत. ईपीएफओ UAN सेवा प्रदान करते, ज्याद्वारे खातेदार त्यांच्या पीएफ खात्यातील शिल्लक पाहू शकता हे वाचा-Gold Price Today: सोन्याचांदीच्या दरात घसरण, अद्यापही सोनं 47 हजारांपेक्षा जास्त 3. Umang App च्या माध्यमातून याकरता तुमचे उमंग App (Unified Mobile Application for New-age Governance) उघडा आणि ईपीएफओवर क्लिक करा. तुम्हाला एका वेगळ्या पेजवर इम्प्लॉयी-सेंट्रिक सर्विस (employee-centric services) वर क्लिक करावे लागेल. याठिकाणी व्ह्यू पासबुकवर क्लिक करा आणि तुमचा यूएएन नंबर आणि पासवर्ड (OTP) प्रविष्ट करा. ओटीपी तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड क्रमांकावर येईल. यानंतर तुम्ही तुमचा बॅलन्स तपासू शकता. याठिकाणी तुम्ही पासबुक पाहण्याव्यतिरिक्त क्लेम देखील करू शकता. हे एक सरकारी App आहे. तुम्ही विविध सुविधांचा फायदा या अॅपमधून घेऊ शकता. 4. वेबसाइटच्या माध्यमातून तपासा पीएफमधील शिल्लक याकरता तुम्हाला Epfindia.gov.in वर लॉग इन करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला ई-पासबुकवर क्लिक करावं लागेल. त्यावेळी तुम्ही passbook.epfindia.gov.in या नवीन पेजवर याल. याठिकाणी युजर नेम, तुमचा UAN क्रमांक, पासवर्ड आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करून ई-पासबुकवर क्लिक करा. याठिकाणी एक नवीन पेज ओपन होईल. याठिकाणी मेंबर आयडीवर क्लिक करा आणि अशाप्रकारे तुम्ही खात्याचील रक्कम वेबसाइटच्या माध्यमातून तपासू शकता.The process is in pipeline and may be shown there very shortly. Whenever the interest will be credited, it will be accumulated and paid in full. There would be no loss of interest. Please maintain patience.
— EPFO (@socialepfo) August 10, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Epfo news, Pf, PF Amount, Pf news, PF Withdrawal