मराठी बातम्या /बातम्या /मनी /Gold Price Today: सोन्याचांदीच्या दरात घसरण, अद्यापही सोनं 47 हजारांपेक्षा जास्त

Gold Price Today: सोन्याचांदीच्या दरात घसरण, अद्यापही सोनं 47 हजारांपेक्षा जास्त

Gold Rate Today

Gold Rate Today

Gold and Silver Rate Today: सोन्याच्या दरात आज घसरण पाहायला मिळते आहे, सोन्यापाठोपाठ चांदीचे दरही आज कमी झाले आहेत. जाणून घ्या काय आहेत आजचे लेटेस्ट भाव

नवी दिल्ली, 19 ऑगस्ट: सोन्याच्या दरात (Gold Rate Today) आज घसरण पाहायला मिळते आहे, सोन्यापाठोपाठ चांदीचे दरही (Silver Rate Today) आज कमी झाले आहेत. दरम्यान मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Multi Commodity Exchange MCX) ऑक्टोबरच्या डिलिव्हरीच्या सोन्याचे दर आज जरी कमी झाले असले तरी अद्यापही 47 हजार रुपये प्रति तोळापेक्षा जास्त आहेत. ऑक्टोबरच्या डिलिव्हरीच्या सोन्याच्या दरात आज 0.29 टक्क्यांची घसरण झाली आहे. तर सप्टेंबरच्या डिलिव्हरीच्या चांदीच्या दरातही घसरण झाली , आज दर 62 हजारांपेक्षा जास्त आहेत. चांदीच्या दरात आज एमसीएक्सवर 01.26 टक्क्यांची घसरण झाली आहे.

काय आहे आजचा सोन्याचांदीचा भाव?

MCX वर आज सोन्याच्या दरात 0.29 टक्क्यांची घसरण झाली आहे. यानंतर सोन्याचे दर 139 रुपयांनी कमी झाले आहेत. यामुळे सोन्याचे दर 47,141 रुपये प्रति तोळा आहेत. तर चांदीच्या दरात 1.26 टक्क्यांची घसरण झाली आहे. यामुळे चांदीचे दर 794 रुपयांनी कमी होऊन 62,432 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत.

हे वाचा-Petrol Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं डिझेल, काय आहेत लेटेस्ट भाव

सोन्याचे दर गाठणार 50000 चा टप्पा

तज्ज्ञांच्या मते, सोन्याचे दर लवकरच 50000 रुपये प्रति तोळावर पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या गुंतवणुकीसाठी योग्य काळ आहे. सध्या दर तुलनेने कमी असल्याने गुंतवणूकदार यात गुंतवणूक करू शकतात. आधीपासून सोन्यात गुंतवणूक करत असाल तर आता देखील होल्ड ठेवणं फायदेशीर ठरू शकेल.

 

First published:

Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold bond, Gold price, Gold prices today, Silver, Silver prices today