मराठी बातम्या /बातम्या /मनी /फेस्टीव्ह सीझनमध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांना मोदी सरकार देतंय गिफ्ट, मिळणार Advance Salary!

फेस्टीव्ह सीझनमध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांना मोदी सरकार देतंय गिफ्ट, मिळणार Advance Salary!

केरळ आणि महाराष्ट्रातील केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना (Central Government Employees) केंद्र सरकार सणासुदीच्या दिवसात गिफ्ट देणार आहे.

केरळ आणि महाराष्ट्रातील केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना (Central Government Employees) केंद्र सरकार सणासुदीच्या दिवसात गिफ्ट देणार आहे.

केरळ आणि महाराष्ट्रातील केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना (Central Government Employees) केंद्र सरकार सणासुदीच्या दिवसात गिफ्ट देणार आहे.

नवी दिल्ली, 19 ऑगस्ट: केरळ आणि महाराष्ट्रातील केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना (Central Government Employees) केंद्र सरकार सणासुदीच्या दिवसात गिफ्ट देणार आहे. या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांना आगाऊ पगार आणि पेन्शनचं गिफ्ट मिळू शकतं. केरळ आणि महाराष्ट्रामध्ये अॅडव्हान्स सॅलरी (Advance Salary) रीलीज करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आता उर्वरित राज्यांना देखील लवकरच खूशखबर मिळू शकते.

सणासुदीच्या काळात विशेष खरेदी केली जाते. त्यामुळे यावेळी आगाऊ पगार आणि पेन्शन देऊन अर्थव्यवस्थेला चालना देण्याची सरकारची तयारी आहे. सुरुवातीला केंद्र सरकारने केरळ आणि महाराष्ट्रातील आपल्या कर्मचाऱ्यांचे आगाऊ वेतन देण्याचे आदेश जारी केले आहेत. ओणम आणि गणपती उत्सवासारखे मोठे उत्सव ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात साजरे केले जातात. यावेळी सणसमारंभासाठी आवश्यक विविध गोष्टींची खरेदी केली जाते. अशावेळी ग्राहकांच्या हातात अधिक पैसे असतील तर विशेष खरेदी केली जाते. त्यामुळे येत्या काळात इतर राज्यांसाठीही असेच आदेश जारी केले जाऊ शकतात.

हे वाचा-खूशखबर! खाद्यतेल होणार स्वस्त, मोदी सरकारची 11,040 कोटींची नवी योजना

मनीकंट्रोलच्या वृत्तानुसार, केरळमध्ये 19 ऑगस्ट आणि महाराष्ट्रात 18 सप्टेंबर रोडी सॅलरी देण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. यामुळे या कर्मचाऱ्यांना सणासुदीच्या काळात खर्च करता येईल. पेन्शनर्सना देखील आगाऊ पेमेंट केलं जाईल. याकरता बँकांना निर्देश जारी करण्यात आले आहेत. सरकारच्या या निर्णयाचा फायदा डिफेन्स, पोस्ट, टेलिकॉम कर्मचाऱ्यांना होईल. अर्थ मंत्रालयाने यावर त्वरित अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर लवकरत बंगाल, यूपी, बिहारसाठी देखील निर्देश जारी केले जाऊ शकतात.

First published:

Tags: Money