मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Amazon Prime Membership उद्यापासून महागणार! कमी किंमतीत खरेदी करण्याचा आज शेवटचा दिवस

Amazon Prime Membership उद्यापासून महागणार! कमी किंमतीत खरेदी करण्याचा आज शेवटचा दिवस

अ‍ॅमेझॉन प्राइम मेंबरशिप (Amazon Prime Membership) ची किंमत मंगळवार (14 डिसेंबर 21) पासून वाढवणार आहे. त्यामुळे 129, 329 आणि 999 रुपयांच्या जुन्या किंमतीत मेंबरशिप घेण्याची आज शेवटची संधी आहे.

अ‍ॅमेझॉन प्राइम मेंबरशिप (Amazon Prime Membership) ची किंमत मंगळवार (14 डिसेंबर 21) पासून वाढवणार आहे. त्यामुळे 129, 329 आणि 999 रुपयांच्या जुन्या किंमतीत मेंबरशिप घेण्याची आज शेवटची संधी आहे.

अ‍ॅमेझॉन प्राइम मेंबरशिप (Amazon Prime Membership) ची किंमत मंगळवार (14 डिसेंबर 21) पासून वाढवणार आहे. त्यामुळे 129, 329 आणि 999 रुपयांच्या जुन्या किंमतीत मेंबरशिप घेण्याची आज शेवटची संधी आहे.

मुंबई, 13 डिसेंबर: अ‍ॅमेझॉन प्राइम मेंबरशिप (Amazon Prime Membership) ची किंमत मंगळवार (14 डिसेंबर 21) पासून वाढवणार आहे. त्यामुळे 129, 329 आणि 999 रुपयांच्या जुन्या किंमतीत मेंबरशिप घेण्याची आज शेवटची संधी आहे. नवीन अपडेटनंतर उद्यापासून अ‍ॅमेझॉन प्राइम मेंबरशिपचा 999 रुपयांचा प्लॅन 1499 रुपयांना होईल. ज्याची मुदत 12 महिन्यांची असणार आहे. तर, 329 रुपयांच्या तिमाही प्लॅनची किंमत 459 रुपये होईल आणि 129 रुपयांच्या मासिक प्लॅनची किंमत 179 रुपये होईल.

अ‍ॅमेझॉनने त्यांच्या सपोर्ट पेजवर नवीन किंमतीची माहिती दिली आहे, त्यामुळे जर तुम्हाला तुमचे पैसे वाचवायचे असतील, तर तुम्हाला कमी किंमतीमध्ये प्लॅन घेण्याची आज शेवटची संधी असणार आहे. या प्लॅनच्या किंमत वाढली असली तरी सध्या जे प्राइम मेंबर्स आहेत, त्यांना त्याचा कोणताही फटका बसणार नाही. त्यांच्या प्राइम मेंबरशिप प्लॅनची मुदत संपल्यानंतरच त्यांच्यासाठी ही नवीन किंमत लागू होईल.

हे वाचा-गुगलवर फक्त तुम्हाला हवं तेच सापडेल; Google Search करताना ही ट्रिक एकदा वापराच

अ‍ॅमेझॉन प्राइमने आपल्या वेबसाइटवर याबाबत माहिती देताना म्हटले आहे की, 'किंमतीत वाढ झाल्याचा परिणाम सध्याच्या प्राइम मेंबर्सवर होणार नाही. मात्र, प्राइम मेंबरशिप समाप्त झाल्यानंतर पुन्हा मेंबरशिपसाठी अधिक पैसे द्यावे लागतील.' अ‍ॅमेझॉन प्राइम केवळ अ‍ॅमेझॉनच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर फास्ट डिलिव्हरी आणि प्राइम सेल ॲक्सेस प्रदान करत नाही, तर प्राइम व्हिडिओ, ऑडिबल, प्राइम म्युझिक अशा अ‍ॅमेझॉनच्या अ‍ॅप्लिकेशन्ससह विविध सर्व्हिसेसचा ॲक्सेस देते.

अ‍ॅमेझॉन प्राइम कॅटलॉग (Amazon Prime Catalog) अनलिमिटेड ॲक्सेस शिवाय युजर्सला अ‍ॅमेझॉन म्युझिक (Amazon Music) मध्ये अ‍ॅड फ्री तब्बल 70 दशलक्ष गाणी देखील मिळतात.

हॉटस्टारनेही वाढवली किंमत

दरम्यान, Disney+ Hotstar ने देखील नवीन प्लॅन्स सादर केले होते. याचा परिणाम प्रीपेड प्लान्सवर देखील झाला आहे. कंपनीने 399 रुपयांचा प्लॅन बंद केला असून, आता नवीन प्लॅन्सची सुरुवाती किंमत 499 रुपये आहे. तर नेटफ्लिक्सच्या बेसिक मेंबरशिप ची किंमत 200 रुपयांपासून सुरू होते. नेटफ्लिक्सची वार्षिक मेंबरशिप 2000 रुपये आहे.

हे वाचा-जबरदस्त! आता आरशात पाहा आणि फिट व्हा; Fitness साठी खास Smart Mirror

महागाईमुळे एकीकडे नागरिक वैतागले असताना रिचार्ज प्लॅन्स, ओटीटी सबस्क्रिप्शन देखील महाग झाले आहे. अ‍ॅमेझॉन प्राइमची मेंबरशिप घेणेही आता उद्यापासून महाग होणार आहे. ही किंमत जवळपास 50 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. वर्षभराच्या मेंबरशिप प्लानची किंमत 999 रुपयांऐवजी 1499 रुपये होणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर 500 रुपयांची बचत करायची असल्यास आजच मेंबरशिप घ्यावी लागेल.

First published:

Tags: Amazon, Amazon subscription