जाहिरात
मराठी बातम्या / मनी / नोकरदारांसाठी खुशखबर! EPFO मध्ये जास्त पेन्शन निवडण्याची अंतिम मुदत वाढणार?

नोकरदारांसाठी खुशखबर! EPFO मध्ये जास्त पेन्शन निवडण्याची अंतिम मुदत वाढणार?

ईपीएफओ

ईपीएफओ

EPFO मध्ये जास्त पेन्शन मिळावं यासाठी अर्ज देण्याची आज अंतिम मुदत आहे. मात्र ही मुदत वाढण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : नोकरी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची आणि चांगली बातमी म्हणायला हवी. तुमचं जर EPFO खातं असेल आणि तुम्ही पेन्शनचा विचार करत असाल तर तुम्हाला EPFO खात्यावरच अधिक पेन्शन जमा करण्याची सुविधा उपलब्ध आहे. यासाठी अर्ज करण्याची मुदत 3 मे आहे. ही  मुदत आता वाढवण्यात येऊ शकते असं सांगितलं जात आहे. तरीही तुम्ही अजूनही अर्ज केला नसेल तर लगेच करू घ्या. तुमच्याकडे पीएफ खाते असल्यास आणि त्यात दरमहा योगदान देत असल्यास, तुम्ही ३ मे नंतरही उच्च पेन्शनचा पर्याय निवडू शकता. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने सूचित केले आहे की कर्मचारी पेन्शन योजना (EPS) अंतर्गत उच्च निवृत्ती वेतनाचा पर्याय 3 मे नंतरही वाढवली जाण्याची शक्यता आहे.

EPFO : पासबुक पाहण्यात अडचणी, एका SMS वर चेक करा खात्यावरील बॅलन्स

CNBC-TV18 नुसार, पेन्शनशी संबंधित काही नियम सोपे करणे आवश्यक आहे, जेणेकरून ते कर्मचार्‍यांना सहज समजेल. यामुळेच जास्त पेन्शन निवडण्याची अंतिम मुदत ३ मेच्या पुढे वाढवली जाऊ शकते. CNBC-TV18 शी बोलताना इंडस्लॉ पार्टनर वैभव भारद्वाज म्हणाले, सध्याची परिस्थिती पाहता, जास्त पेन्शन निवडण्याची अंतिम मुदत वाढवणे फार महत्वाचे आहे. पोर्टलवर जास्त पेन्शनचा पर्याय निवडताना केवळ तांत्रिक त्रुटींना सामोरे जावे लागत आहे असे नाही तर त्याच्या अनेक नियमांबाबतही स्पष्टता नाही.

News18लोकमत
News18लोकमत

जे लोक नोकरी सोडतील किंवा ज्यांनी सोडली आहे त्यांना हे पेन्शन कसं दिलं जाणार याबाबतही अनेक संभ्रम आहेत. नव्या नियमानुसार अनेक संभ्रम मनात निर्माण होतात. प्रत्येक नियमात स्पष्टता नसल्याने ते कसं भरायचं हा प्रश्न देखील अनेकांच्या मनात आहे.

लग्नासाठी सहज काढता येईल EPFO चा पैसा, फक्त लक्षात ठेवा ‘या’ अटी

फेब्रुवारीमध्ये EPFO ने नोकरदारांना जास्त पेन्शन निवडण्याचा पर्याय दिला. जवळपास दोन महिन्यांची मुदत देण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, नियोक्ता आणि कर्मचार्‍यांना पेन्शनसाठी एकत्रितपणे ईपीएसचे सदस्य बनविण्याची प्रक्रिया सुरू झाली. सुरुवातीला त्याची मुदत ३ मार्च ठेवण्यात आली होती, मात्र नंतर ती २ महिन्यांनी वाढवून ३ मे करण्यात आली. पुन्हा एकदा ही मुदत वाढवली जाऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात