मराठी बातम्या /बातम्या /मनी /

EPFO: तुमच्या PF खात्यामध्ये UAN क्रमांक अ‍ॅक्टिव्ह नसल्यास काय कराल? ही आहे सोपी प्रक्रिया

EPFO: तुमच्या PF खात्यामध्ये UAN क्रमांक अ‍ॅक्टिव्ह नसल्यास काय कराल? ही आहे सोपी प्रक्रिया

EPFO: पीएफ खात्यातील पैसे तपासण्यासाठी प्रत्येक सब्सक्रायबरला यूनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN)दिला जातो. या क्रमांकाच्या साहाय्याने तुम्ही बॅलन्स तपासू शकता, पीएफ खातं ऑपरेट करू शकता.

EPFO: पीएफ खात्यातील पैसे तपासण्यासाठी प्रत्येक सब्सक्रायबरला यूनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN)दिला जातो. या क्रमांकाच्या साहाय्याने तुम्ही बॅलन्स तपासू शकता, पीएफ खातं ऑपरेट करू शकता.

EPFO: पीएफ खात्यातील पैसे तपासण्यासाठी प्रत्येक सब्सक्रायबरला यूनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN)दिला जातो. या क्रमांकाच्या साहाय्याने तुम्ही बॅलन्स तपासू शकता, पीएफ खातं ऑपरेट करू शकता.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 30 जुलै: तुम्ही जर नोकरदार वर्गापैकी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सध्याच्या काळात UAN क्रमांक अत्यंत आवश्यक आहे. पीएफ खात्यातील पैसे तपासण्यासाठी प्रत्येक सब्सक्रायबरला यूनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN)दिला जातो. या क्रमांकाच्या साहाय्याने तुम्ही बॅलन्स तपासू शकता, पीएफ खातं ऑपरेट करू शकता. अन्य काही सुविधांचा लाभ देखील या क्रमांकाच्या साहाय्याने घेता येतो. तुमच्या संपूर्ण आयुष्यभरातील नोकरीच्या कालावधीत एकच यूएएन क्रमांक दिला जातो. हा एक 12 अंकी क्रमांक आहे जो EPFO कडून जारी केला जातो. तुम्ही नोकरी करण्याच्या कालावधीत कितीही वेळा नोकरी बदलली तरी हा क्रमांक सारखा राहतो. नवीन सदस्य ईपीएफओशी जोडला गेल्यानंतर त्याला नवीन UAN दिला जातो.

दरम्यान काही पीएफ खातेधारक असे आहेत की ज्यांना UAN मिळाला नाही आहे किंवा तो अ‍ॅक्टिव्ह करण्यात आलेला नाही. नोकरदार वर्गासाठी UAN हा एक अत्यंत आवश्यक क्रमांक आहे. या माध्यमातूनच प्रोव्हिडेंट फंड अकाउंटबाबतची माहिती मिळते. तुम्हाला यूएएन माहित नसेल तर तुम्ही ईपीएफओच्या वेबसाइटवरुन त्याबाबत माहिती मिळवू शकता.

हे वाचा-दररोज 130 रुपयांची बचत करुन मुलीच्या लग्नासाठी मिळवा 27 लाख, काय आहे LIC योजना

EPFO वर अशाप्रकारे करा UAN अ‍ॅक्टिव्हेट

>>सर्वात आधी तुम्हाला EPFO च्या अधिकृत वेबसाइट https://epfindia.gov.in/site_en/ ला भेट द्यावी लागेल

>>याठिकाणी our services वर क्लिक करा

>>यानंतर For Employees वर क्लिक करा

>>यानंतर Member UAN/online services वर क्लिक करा

>>या प्रक्रियेनंतर तुम्ही UAN पोर्टलवर जाल, तिथे तुम्हाला मोबाइल क्रमांक आणि पीएफ मेंबर आयडी प्रविष्ट करावा लागेल

>> यानंतर तुम्हाला Get authorization PIN वर क्लिक करावे लागेल

>>आता पिन क्रमांक रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर पाठवला जाईल, त्यानंतर ओटीपी प्रविष्ट करा

>> Validate OTP वर क्लिक केल्यानंतर तुमचं UAN अ‍ॅक्टिव्हेट होईल

अशाप्रकारे मिळवाल माहिती

यूएएन पोर्टलवर नोंदणीकृत सदस्यांना मिस्ड कॉल देऊन त्यांच्या खात्यातील शिल्लक जाणून घेता येईल. आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून 011-22901406 वर एक मिस कॉल करावा लागेल. यानंतर पीएफचा तपशील तुम्हाला ईपीएफओच्या मेसेजद्वारे प्राप्त होईल. दोन रिंगनंतर हा कॉल स्वयंचलितपणे डिस्कनेक्ट होईल. या सेवेसाठी कोणतेही पैसे आकारले जाणार नाहीत. ईपीएफओ UAN सेवा प्रदान करते, ज्याद्वारे खातेदार त्यांच्या पीएफ खात्यातील शिल्लक पाहू शकता.

हे वाचा-पुन्हा 47 हजारांच्या जवळपास पोहोचलं सोनं, चांदीही 1200 रुपयांनी महागली

SMS च्या माध्यमातून तुमच्या पीएफ खात्यातील रक्कम तपासण्यासाठी तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून 7738299899 या नंबरवर मेसेज करावा लागेल. EPFOHO UAN ENG असे लिहून तुम्हाला हा मेसेज करावा लागेल. ENG म्हणजे इंग्रजी भाषेमध्ये तुम्हाला माहिती मिळेल. परंतू तुम्हाला अन्य कोणत्या भाषेत माहिती हवी असेल तर ENG ऐवजी तुम्हाला हव्या असलेल्या भाषेची पहिली तीन अक्षरं तुम्हाला टाकावी लागतील. हिंदी, पंजाबी, गुजराती, मराठी, कन्नड, तेलुगु, तमिळ, मलयाळम आणि बंगाली भाषेमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. या क्रमांकावर मेसेज करण्यासाठी ईपीएफओ मध्ये तुमचा नंबर रजिस्टर्ड असणे अनिवार्य आहे.

First published:

Tags: Epfo news, Pf, PF Amount, Pf news, PF Withdrawal