जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Gold Price Today: पुन्हा 47 हजारांच्या जवळपास पोहोचलं सोनं, चांदीही 1200 रुपयांनी महागली

Gold Price Today: पुन्हा 47 हजारांच्या जवळपास पोहोचलं सोनं, चांदीही 1200 रुपयांनी महागली

Gold-Silver Price Today

Gold-Silver Price Today

Gold Silver Price, 29 July 2021: सोन्याच्या किंमतीत गुरुवारी तेजी पाहायला मिळाली आहे. तर चांदीच्या किंमतीही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 29 जुलै: भारतीय बाजारात गुरुवारी 29 जुलै रोजी सोन्याच्या दरात (Gold Price Today) मोठी वाढ झाली आहे. यामुळे सोन्याचे दर प्रति तोळा 47000 रुपयांच्या जवळपास पोहोचले आहेत. तर आज चांदीच्या किंमतीतही (Silver Rates Today) 1200 रुपयांपेक्षा जास्त वाढ पाहायला मिळाली आहे. यामुळे चांदीचे दर 66 हजार रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहेत. आधीच्या सत्रात दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर (Gold Rates) 46,610 रुपये प्रति तोळा होते. तर चांदीचे दर (Silver Rates)  64,994 रुपये प्रति किलो होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचांदीच्या दरात तेजी पाहायला मिळाली आहे. सोन्याचे नवे दर (Gold Rates on 29th July 2021) दिल्लीतील सराफा बाजारात गुरुवारी सोन्याच्या दरात आज 382 रुपयांची वाढ झाली आहे. यानंतर सोन्याचे दर 47 हजारांच्या जवळपास पोहोचले आहेत. दिल्लीमध्ये 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचे दर  46,992 रुपये प्रति तोळा झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात किरकोळ वाढ होऊन दर 1,817 डॉलर प्रति औंस झाले आहेत. हे वाचा- ICICI बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाचे, या सेवांसाठी द्यावं लागणार अधिक शुल्क चांदीचे नवे दर (Silver Rates on 29th July 2021) चांदीच्या दरात आज मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. दिल्लीतील सराफा बाजारात आज चांदीमध्ये 1,280 रुपयांची तेजी पाहायला मिळाली आहे. या वाढीनंतर चांदीचे दर 66,274  रुपये प्रति किलो झाले आहेत आंतरराष्ट्रीय बाजारातही आज चांदीचे दर वधारले आहेत. या वाढीनंतर चांदी 25.42 डॉलर प्रति औंस झाली आहे. हे वाचा- 1000 रुपयांपासून गुंतवणूक करून मिळवा चांगला नफा, 30 जुलैपासून मिळेल संधी का वाढले सोन्याचे दर? एचडीएफसी सिक्‍योरिटीज (HDFC Securities) चे सीनिअर अनालिस्‍ट (कमोडिटीज) तपन पटेल यांच्या मते यूयॉर्क स्थित कमोडिटी एक्‍सचेंजमध्ये किंमती वाढल्यामुळे सोन्याचे दर वाढले आहेत. मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे व्हीपी कमोडिटीज रिसर्च नवनीत दमानी यांच्या मते, अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या दरात वाढ झाल्यामुळे डॉलरवर दबाव आहे. यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यात गुंतवणूक वाढली आहे, परिणामी सोन्याचे दर वाढले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात