मुंबई, 23 जानेवारी: नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे पीएफ अकाउंट असते. दर महिन्याला पीएफ खात्यात आपले काही पैसे जमा होत असतात. या पीएफ अकाउंटविषयीच महत्त्वाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टी लवकरच 2022-23 या आर्थिक वर्षासाठी भविष्य निर्वाह निधीच्या व्याजदरांबाबत निर्णय घेऊ शकते. पीएफ व्याजदरांवर विचार करण्यासाठी बोर्डाची बैठक या महिन्याच्या शेवटी किंवा मार्चच्या सुरुवातीला होण्याची शक्यता आहे. यामुळे आता पीएफ अकाउंट असणाऱ्यांना याचा फायदा होणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. यात व्याजदर किती असू शकतात याविषयी माहिती घेऊया.
तुमचा PF जमा होत असेल तर सावधान! फक्त एक चूक आणि अकाउंट होईल रिकामं
एका रिपोर्टनुसार, सरकार 2022-2023 साठी पीएफ जमावर मागील व्यावसायिक वर्षाच्या बरोबरीने म्हणजे सुमारे 8 टक्के व्याजदर निश्चित करू शकते. सरकारने 2021-2022 या आर्थिक वर्षासाठी पीएफ ठेवींवर 8.1 टक्के व्याजदर निश्चित केला होता, जो चार दशकांतील सर्वात कमी होता. यापूर्वी, मार्च 2021 मध्ये, EPFO च्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने 2020-2021 साठी EPF ठेवीवर (PF व्याज दर) 8.5 टक्के व्याजदर निश्चित केला होता.
- 2016-2017 या आर्थिक वर्षात बोर्डाने 8.65 टक्के जास्त पीएफ व्याजदर निश्चित केला होता. 2017-2018 मध्ये व्याजदर 0.10 टक्क्यांनी कमी करून -8.55 टक्के करण्यात आला
-2018-19 मध्ये पुन्हा एकदा 8.65 टक्के व्याजदर निश्चित करण्यात आला
-2019-20 मध्ये त्याचा आकडा 8.50 टक्के
-2020-21 मध्ये 8.50 टक्के
-2021-22 मध्ये 8.10 टक्के व्याजदर होता.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि मिसलेनियस प्रॉव्हिजन अॅक्ट, 1952 अंतर्गत EPF ही अनिवार्य बचत योजना आहे. त्याचे व्यवस्थापन कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ईपीएफओ करते. यामध्ये 20 किंवा त्याहून अधिक कर्मचारी असलेल्या प्रत्येक कंपनीचा समावेश होतो. या अंतर्गत, कर्मचार्यांना भविष्य निर्वाह निधीसाठी निश्चित योगदान द्यावे लागेल आणि तेवढीच रक्कम पगार देणाऱ्यांकडूनही घेतली जाते.
LIC च्या 'या' पॉलिसीत मिळताय मोठ्या सुविधा, दुप्पट मिळेल रिटर्न!
रिटायरमेंटच्या शेवटी किंवा सेवेदरम्यान (विशिष्ट परिस्थितीत) कर्मचाऱ्याला पीएफ योगदानावरील व्याजासह एकरकमी रक्कम मिळते. सरकारी डेटा नुसार की सप्टेंबर 2017 ते नोव्हेंबर 2021 दरम्यान, सुमारे 4.9 कोटी नवीन सदस्य कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) योजनेत सामील झाले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.