नवी दिल्ली, 20 जानेवारी: EPFO कर्मचाऱ्यांना लवकरच मोठा झटका लागण्याची शक्यता आहे. कारण पीएफ खात्यावरील व्याजदर कमी होण्याची शक्यता आहे. चालू आर्थिक वर्षात व्याजदर 15 ते 25 बेसिक पॉईंट्सनं कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं त्याचा लाखो PF धारकांना फटका बसण्याची शक्यता आहे. लाखो पीएफ खातेधारकांना फटका पीएफ खातेधारकांना नवं वर्षात मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळं लाखो पीएफ धारकांना या वर्षी कमी व्याज मिळू शकते. देशभरातून लाखो कर्मचाऱ्यांचा मग ते खासगी असो की सरकारी आपल्या पगारातील एक हिस्सा EPFO खात्यात जमा होतो. भविष्यासाठी जमा होणाऱ्या पैशाला वर्षाच्या अखेरेस व्याज मिळतो. मात्र यंदा व्याजदर कमी झाल्यास खातेधारकांना कमी रक्कम मिळू शकते. 31 मार्च 2020 पासून कमी व्याज दर मिळण्याची शक्यता आहे. 2018-2019 साली ईपीएफओकडून खातेधारकांना 8.65 टक्के व्याज मिळालं होतं. मात्र या वर्षी ते व्याज कमी होण्याची शक्यता आहे. का होणार व्याजदर कमी? सध्या देशात आर्थिक मंदी आहे. त्यामुळं देशाचा जीडीपी खाली आला आहे. त्याचा परिणाम ईपीएफओ खातेधारकांवरही झाल्याची माहिती अर्थतज्ज्ञांनी दिली आहे. देशाची अर्थव्यवस्थाही फारशी चांगली नाहीये. शेअर मार्केटमध्येही मोठी मंदी आहे. या सर्व कारणांचा परिणाम ईपीएफओवर झाल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळं पीएफ खातेदारांना यंदा 12 ते 25 बेसिक पॉईंट कमी व्याज दर मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. महिन्याच्या शेवटी होऊ शकते व्याजदराची घोषणा या महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात ईपीएफओकडून नव्या व्याज दराची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळं यंदा किती व्याजदरात कमी होतो हे पाहावं लागणार आहे. गेल्या वर्षी ईपीएफओकडून खातेधारकांना 8.65 टक्के व्याजदर देण्यात आला होता. खातेधारकांना व्याज देऊनही ईपीएफओकडे तब्बल 151 कोटी क्षिल्लक राहिले होते. तर 2017-18 या वर्षात ईपीएफओकडे 586 कोटी रुपये बाकी होते. त्यामुळं वाढीव व्याज दर देऊनही ईपीएफओला फायदा होतोय. मग व्याज दरात कपात का केली जाते असा प्रश्न अर्थतज्ज्ञ विचारत आहेत. —————————– अन्य बातम्या तुम्ही LIC पॉलिसी घेतली असेल तर सावधान! बनावट फोन कॉलमुळे बसू शकतो फटका सामान्य माणसांना धक्का, फोनवर बोलणं यावर्षी होणार महाग नव्या वर्षात तुमच्या PF खात्यात किती पैसे झाले जमा? घरबसल्या घ्या माहिती
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.