नव्या वर्षात तुमच्या PF खात्यात किती पैसे झाले जमा? घरबसल्या घ्या माहिती

तुम्ही नोकरी करत असाल तर प्रॉव्हिडंट फंड हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. एक मिस्ड कॉल देऊन तुम्ही तुमच्या पैशाबद्दलची माहिती घेऊ शकता. यासाठी EPFO ने एक नंबर जारी केलाय.

तुम्ही नोकरी करत असाल तर प्रॉव्हिडंट फंड हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. एक मिस्ड कॉल देऊन तुम्ही तुमच्या पैशाबद्दलची माहिती घेऊ शकता. यासाठी EPFO ने एक नंबर जारी केलाय.

  • Share this:
    नवी दिल्ली, 15 जानेवारी : तुम्ही नोकरी करत असाल तर प्रॉव्हिडंट फंड हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. एक मिस्ड कॉल देऊन तुम्ही तुमच्या पैशाबद्दलची माहिती घेऊ शकता. यासाठी EPFO ने एक नंबर जारी केलाय. त्याचबरोबर ऑनलाइन आणि SMS सर्व्हिसनेही तुम्ही PF बॅलन्सबदद्ल जाणून घेऊ शकता. पीएफ खात्यात पैसे जमा करायचे असतील तर एक रक्कम ठरलेली आहे. कर्मचारी आणि कंपनीला दर महिन्याला बेसिक पगार आणि डीए च्या 12 टक्के रक्कम द्यावी लागते.या रकमेच्या 8.33 टक्के रक्कम EPF किटीमध्ये जाते. तर 3.67 टक्के भाग EPF मध्ये जमा होतो. या पद्धतीने घ्या माहिती 1. मिस्ड कॉल देऊन घ्या माहिती तुम्हाला प्रॉव्हिडंट फंडच्या रकमेबद्दल जाणून घ्यायचं असेल तर एक मिस्ड कॉल द्या. EPFO ने दिलेल्या माहितीनुसार 011-22901406 या नंबरवर मिस्ड कॉल द्या. यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल. यावरून PF ची रक्कम कळू शकते. 2. SMS करून घ्या माहिती यासाठी तुमचा UAN नंबर EPFO कडे नोंद केलेला हवा. तुम्हाला 7738299899 या नंबरवर मेसेज द्यायचा आहे. तिथे EPFOHO UAN ENG लिहून पाठवा. ही सर्व्हिस इंग्रजी, हिंदी, पंजाबी यासह 10 वेगवेगळ्या भाषांमध्ये तुम्ही मेसेज लिहून पाठवू शकता. (हेही वाचा : तुमचे पैसे सुरक्षित ठेवा, RBI ने जारी केले ATM आणि क्रेडिट कार्डांचे नवे नियम) 3. अॅपच्या माध्यमातून जाणून घ्या बॅलन्स EPFO चं हे अॅप गूगल प्ले स्टोअरवर डाउनलोड करू शकता. हे अॅप डाउनलोड झाल्यावर तुम्ही बॅलन्स किंवा पासबुक सेक्शनमध्ये जाऊ शकता. उमंग मोबाइल अॅपच्या माध्यमातून तुम्हाला PF ची माहिती मिळू शकेल. तुम्ही EPFO पेजवर जाऊन एम्प्लॉयी सेंट्रिक सर्व्हिस, एम्प्लॉयर सेंट्रिक सर्व्हिस,जनरल सर्व्हिस या सेवांचा लाभ घेऊ शकता. बॅलन्स आणि एंट्री चेक करण्यासाठी पासबुक अकाउंट डिटेल सेक्शनमध्ये जाऊन क्लिक करा. पासबुक अकाउंट डिटेल सेक्शनमध्ये तपशीलवार माहिती दिली आहे. (हेही वाचा : मोठी बातमी : या तारखेला बँकांचा 2 दिवसांचा संप, तुमची कामं करा पूर्ण) ==========================================================================================
    Published by:Arti Kulkarni
    First published: