मराठी बातम्या /बातम्या /मनी /EPFO Alert : PF खातेधारकांना ऑनलाईन फसवणुकीचा धोका, काय खबरदारी घ्याल?

EPFO Alert : PF खातेधारकांना ऑनलाईन फसवणुकीचा धोका, काय खबरदारी घ्याल?

फ्रॉडस्टर्सकडून वेगवेगळ्या प्रकारे फसवणूक केली जात असून कोणत्याही जाळ्यात अडकल्यास तुमची कमाई, बँक अकाउंट रिकामं होऊ शकतं. त्यामुळे अनोळखी कॉल, मेसेज आल्यास सावध व्हा.

फ्रॉडस्टर्सकडून वेगवेगळ्या प्रकारे फसवणूक केली जात असून कोणत्याही जाळ्यात अडकल्यास तुमची कमाई, बँक अकाउंट रिकामं होऊ शकतं. त्यामुळे अनोळखी कॉल, मेसेज आल्यास सावध व्हा.

EPFO ने सांगितले की, संस्था फोन कॉल्स किंवा सोशल मीडियाद्वारे ग्राहकांकडून आधार, पॅन, UAN, बँक खाते किंवा OTP सारखी माहिती विचारत नाही. तसेच EPFO ​​ने सबस्क्राइबर्स सुरक्षित कसे राहू शकतात हे सांगितले.

मुंबई, 1 नोव्हेंबर : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ऑर्गनायझेशनने (Employees Provident Fund Organisation) ऑनलाईन फसवणुकीच्या धोक्याबाबत सदस्यांना अलर्ट जारी केला आहे. EPFO ने ट्वीट केले आहे की, पेन्शन फंड संस्थेचा सदस्य असल्याचे दाखवून कोणत्याही व्यक्तीने तुमच्या खात्याशी संबंधित किंवा अन्य गोपनीय माहिती मागितली तर ती अजिबात देऊ नका. EPFO ने सांगितले की, संस्था फोन कॉल्स किंवा सोशल मीडियाद्वारे ग्राहकांकडून आधार, पॅन, UAN, बँक खाते किंवा OTP सारखी माहिती विचारत नाही. तसेच EPFO ​​ने सबस्क्राइबर्स सुरक्षित कसे राहू शकतात हे सांगितले.

पीएफ खात्यांवर फिशिंग हल्ले होतात

EPFO ने म्हटले आहे की, कोणताही सदस्य संस्थेच्या कोणत्याही सेवेसाठी व्हॉट्सअॅप किंवा इतर कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे पैसे जमा करण्याची मागणी करू शकत नाही. तसेच सदस्यांनी वैयक्तिक आणि गोपनीय माहिती मागणाऱ्या कॉल्स किंवा मेसेजकडे लक्ष देऊ नये किंवा कोणत्याही EPFO ​​सदस्याला पैसे हस्तांतरित करू नयेत, असेही म्हटले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की बहुतेक वेळा पीएफ खाती फिशिंग हल्ल्यांना (Phishing Attck) बळी पडतात. यामध्ये गुन्हेगार वैयक्तिक माहिती मिळवून पेन्शन फंडवर डल्ला मारतात.

New IPO : नोव्हेंबरमध्ये कमाईच्या अनेक संधी; Paytm सह अनेक कंपन्यांचे IPO येणार

मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागेल

भविष्य निर्वाह निधी संघटनेने सांगितले की, नोकरी बदलणारे कर्मचारी सायबर हल्ल्यांना सर्वाधिक बळी पडतात. त्यामुळे त्यांना नक्कीच अधिक सावध राहण्याची गरज आहे. सदस्यांना कोणतेही फिशिंग कॉल किंवा संदेश प्राप्त झाल्यास, त्यांची त्वरित तक्रार करा. EPFO च्या सेवांचे शुल्क फक्त अधिकृत चॅनेलद्वारे भरा. पैसे देण्याची कोणतीही अनधिकृत मागणी ही सायबर गुन्हेगारांची कृती असेल. यामुळे तुम्हाला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागू शकतो.

दिवाळीआधी महागाईचा जोरजार झटका, LPG Gas Cylinder च्या दरात वाढ

Epfo warns pf account holders beware of online fraud know how to stay safe from cyber attack achs

केंद्राकडून कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट

या आठवड्यात, केंद्र सरकारने 2020-21 या आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर 8.5 टक्के दराने पीएफ व्याजदरांना मान्यता दिली आहे. दिवाळीपूर्वी EPFO च्या 5 कोटींहून अधिक ग्राहकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. यापूर्वी मार्च 2020 मध्ये केंद्र सरकारने पीएफवरील व्याजदर 7 वर्षांच्या नीचांकी पातळीवर आणून 8.5 टक्के केला होता. 2018-19 या आर्थिक वर्षात पीएफवरील व्याजदर 8.65 टक्के करण्यात आला.

First published:

Tags: Investment, Money, Share market