मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Business: घरच्या घरी सुरु करा फ्रोझन मटारचा व्यवसाय ; कसा? ते घ्या जाणून

Business: घरच्या घरी सुरु करा फ्रोझन मटारचा व्यवसाय ; कसा? ते घ्या जाणून

मटार

हिवाळ्यात येणारे हिरवे वाटाणे हे प्रथिनांचाही चांगला स्रोत आहे. 100 ग्रॅम वाटाण्याच्या दाण्यांमध्ये 5.4 ग्रॅम प्रथिने असतात. चवीसोबतच ते पौष्टिकतेमध्येही उत्तम आहे. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मटार हिवाळ्यात येणारे हिरवे वाटाणे हे प्रथिनांचाही चांगला स्रोत आहे. 100 ग्रॅम वाटाण्याच्या दाण्यांमध्ये 5.4 ग्रॅम प्रथिने असतात. चवीसोबतच ते पौष्टिकतेमध्येही उत्तम आहे. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

फ्रोझन मटार (Frozen Green Peas Business) हा असा व्यवसाय आहे ज्यामध्ये खूप कमी खर्चात बंपर कमाई करण्याची संधी आहे.

नवी दिल्ली, 30 डिसेंबर: अनेकांना नोकरीच्या बंधनात अडकून राहण्यापेक्षा स्वत:चा व्यवसाय (Business) करण्याची इच्छा असते. मात्र, कधी चांगल्या बिझनेस आयडियाच्या (Business Idea) अभावी तर कधी पैशांच्या अभावी त्यांना आपली इच्छा पूर्ण करता येत नाही. जर तुम्हीदेखील अशा लोकांमध्ये असाल तर आज आम्ही तुम्हा फ्रोझन मटारचाला एक अशी बिझनेस आयडिया देणार आहोत ज्यातून मोठी कमाई करू शकता. हा असा व्यवसाय आहे ज्यामध्ये खूप कमी खर्चात बंपर कमाई करण्याची संधी आहे. हा बिझनेस आहे  (Frozen Green Peas Business).

मटार (Peas ) म्हणजे हिरव्या वाटाण्याला वर्षभर मागणी असते. विविध भाज्यांमध्ये त्याचा वापर केला जाता. पण मागणी जरी वर्षभर असली तरी त्याचं उत्पादन फक्त हिवाळ्यातच होतं. पण ऑफ सिझनमध्ये फ्रोझन मटारचा वापर आपल्या दैनंदिन आहारात होतो. त्यामुळे वर्षभर मटार उपलब्ध असणं गरजेचं झालं आहे. बाजारात मात्र वर्षभर मटाराचे दाणे विकत मिळतात. त्याचाच व्यवसाय तुम्ही करू शकता. फ्रोझन मटारचा बिझनेस करण्यासाठी तुम्हाला शेतकऱ्यांकडून (Farmers) कच्चा माल म्हणजे वाटाणा खरेदी करावा लागेल. तुम्हाला किती मोठा बिझनेस करण्याची इच्छा आहे, हे निश्चित करून मटार खरेदी करा. त्यापूर्वी तुम्हाला मार्केट रिसर्च (Market Research) करावा लागेल आणि एका वर्षात किती फ्रोझन मटार विकू शकता याचा अंदाज बांधावा लागेल.

क्या बात है! 'हे' जॉब देऊ शकतात श्रीमंत होण्याची संधी; सुरु करा पार्ट टाइम जॉब्स

कसा सुरू कराल बिझनेस?

फ्रोझन मटारचा बिझनेस करण्यासाठी फार मोठ्या जागेची (Place) आवश्यकता भासत नाही. तुम्ही तुमच्या घरातील एखाद्या छोट्या खोलीतही हा बिझनेस सुरू करू शकता. पण, जर एखदम मोठ्या प्रमाणावर बिझनेस करायचा असेल तर चार हजार ते पाच हजार चौरस फूट जागेची आवश्यकता असेल. घरातून बिझनेस सुरू करायचा असल्यास हिरवे वाटाणे सोलण्यासाठी मजुरांची (Workers) मदत घेता येईल. याउलट मोठ्या बिझनेसमध्ये वाटाणा सोलण्याचं मशीन खरेदी करण्यास हरकत नाही. यामुळे कमी वेळत जास्त काम होण्यास मदत होईल. याशिवाय तुम्हाला काही सरकारी परवानेदेखील मिळवावे लागतील.

किती होईल कमाई ?

फ्रोझन मटारचा बिझनेस सुरू केल्यास किमान 50 ते 80 टक्के नफा मिळू शकतो. शेतकऱ्यांकडून साधारण 10 रुपये प्रतिकिलो या दरापर्यंत हिरवा वाटाणा तुम्हाला मिळू शकतो. बाजारभावातील चढ-उतरांप्रमाणे ही किंमत कमी-जास्त होऊ शकते. दोन किलो मटाराच्या शेंगांमधून सुमारे एक किलो दाणे मिळतात. जर बाजारात मटारची किंमत 20 रुपये किलो असेल तर तुम्ही हे दाणे प्रक्रिया करून 120 रुपये किलो दराने विकू शकता. या शिवाय जर तुम्ही फ्रोझन मटारचे पॅकेट थेट किरकोळ दुकानदारांना विकले तर तुम्हाला एका किलोमागे 200 रुपये नफा मिळू शकतो.

Career Tips: स्वतःची आवड जपून कमवा भरघोस पैसे; फोटोग्राफीमध्ये करा करिअर

कसे तयार होतात फ्रोझन मटार ?

फ्रोझन मटार बनवण्यासाठी, सर्वांत अगोदर मटाराच्या शेंगा सोलल्या जातात. त्यानंतर ते दाणे सुमारे 90 अंश सेंटिग्रेड तापमानात पाण्यात उकळले जातात आणि नंतर ते तीन ते पाच अंश सेंटिग्रेड तापमानाच्या थंड पाण्यात टाकले जातात. या प्रक्रियेमुळं त्यातील बॅक्टेरिया (Bacteria) मरतात. यानंतर मटारचे दाणे 40 अंश तापमानात ठेवतात व नंतर रेफ्रिजरेट केले जातात. शेवटी हे मटार वेगवेगळ्या वजनाच्या पॅकेटमध्ये पॅक करून बाजारात पोहोचवले जातात.

फ्रोझन मटारचा बिझनेस जास्त कठीण नाही. महिला आणि पुरुष दोघेही हा व्यवसाय सुरू करू शकतात. तुम्हीही विचार करू शकता.

First published:

Tags: Business News, Lifestyle, Small business